‘मी ले’स्बि’यन आहे’ हे समजले तर ? मुलीने अनुरागला विचारला हा लैं’गि’क प्रश्न, ऐकून अनुरागणे दिले ‘हे’ धक्कादायक उत्तर.!..

‘मी ले’स्बि’यन आहे’ हे समजले तर ? मुलीने अनुरागला विचारला हा लैं’गि’क प्रश्न, ऐकून अनुरागणे दिले ‘हे’ धक्कादायक उत्तर.!..

नुकताच जगभरात पितृदिवस म्हणजेच फादर्स डे साजरा करण्यात आला आहे. सर्व सामान्यांसोबत, सेलेब्रिटीजने देखील फादर्स डे आपल्या वेगळ्या आणि हटके स्टाईल मध्ये साजरा केला. मात्र बॉलीवूड कर यामध्ये सर्वात पुढे होते. सोनम कपूर ने यावेळी, अनिल कपूरचा एक व्हिडियो शेअर केला.

तर अनुष्का शर्माने आपल्या वडिलांचा आणि पती विराटचा फोटो शेअर करत, जगातील सर्वोत्तम डॅड असं कॅप्शन दिले. त्याचबरोबर करन जोहर ने मात्र, आलिया भट्टला टॅग करत तुझ्यामुळेच मी वडील बनलो असं कॅप्शन टाकलं. फादर्स डे पासून आलिया चांगल्याच चर्चेमध्ये आहे. मात्र हि आलिया भट्ट नसून दिग्दर्शक अनुराग कश्यप याची मुलगी आलिया कश्यप आहे.

अनुराग ची मुलगी आलिया खूपच क्युट आणि सुंदर आहे. मात्र चर्चेचा विषय, तिचा क्युटनेस किंवा सुंदरपणा नाहीये तर एक व्हिडियो आहे. फादर्स डेच्या निमित्त तिनं आपल्या सोशल मीडियावरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडियोमध्ये आलियाने आपल्या वडिलाला म्हणेजच, अनुरागला अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवरून काही प्रश्न विचारले.

आणि त्यांचा हाच व्हिडियो सगळीकडे चांगलाच वा’यरल होत आहे. आलियानं लैंगिक संबंध, लग्नाआधी ग’र्भधा’रणा यासारखे विषय आणि त्याबद्दलचे प्रश्न या व्हिडियोमध्ये केले होते. मात्र सुरुवातीलाच तिने असे काही विचारले की खुद्द अनुराग सुद्धा च’कित झाला.

या व्हिडीओच्या सुरुवातीला, आलियाने अनुरागला विचारले, ‘की जर मी ले’स्बि’यन आहे हे तुम्हाला समजले तर, तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असेल?’ यावर प्रतिक्रिया व्यक्त करत अनुरागनं सर्व पालकांना एक संदेश देखील दिला आहे. तो तिच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाला- ‘मी म्हणेल की तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल कळत नाही त्याबद्दल घाबरू नका.

या गोष्टीची ज्या पालकांना भीती वाटते, ते अश्या वेळी गोंधळून जातात, घाबरतात. मात्र अश्या वेळी, नेहमीच मागे वळून पाहा आणि त्या वयात आपण कसे होतो आणि आपल्याला कसं वाटायचं याचा विचार करा. आपले आई-वडिल आपल्याला समजून घेत नव्हते, आणि त्यामुळे असं सर्व काही आपल्या पालकांना सोबत शेअर करायला आपण घाबरत होतो.

मात्र घाबरून काहीच साध्य होत नाही.’ सध्या आलिया कश्यप २० वर्षांची आहे. शेन ग्रेगोअर सोबत सध्या ती रिलेशनशिपमध्ये आहे. ते दोघं एका डे’टिंग अ‍ॅ’पद्वारे भेटले होते. आलिया नेहमीच शेनबरोबर आपलं प्रेम व्यक्त करत असते. अनेक वेळा ती त्याच्यासोबत आणि त्याच्यासाठी नवनवीन पोस्ट शेअर करते. शेनबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल आलिया अगदी मोकळी आहे. अनुरागसुद्धा शेनला भेटला आहे.

तिच्या व्हिडीओमध्ये आलियानं हा प्रश्न देखील विचारला आहे की, अनुरागला तिचा प्रियकर शेन आवडतो का? या प्रश्नाला उत्तर देताना अनुराग म्हणाला- ‘मला शेन आवडतो. तुझी मुलांबद्दलची निवड मला सहसा आवडतेच. तो खूप शांत आहे आणि त्याच्यात असे गुण आहेत जे ४० वर्षांच्या पुरुषमध्येसुद्धा असणं अवघड आहे.’ आलिया कश्यप बद्दल बोलायचच झालं तर, ती सोशल मीडियावर खूपसाज अ‍ॅक्टिव आहे. इन्स्टाग्रामवर तिचे तब्ब्ल २ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. यूट्यूबवर देखील ती आपले व्हिडीओ शेअर करत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12