‘दुनियेशी मला घेणदेणं नाही’; टिका करणार्यांना उत्तर देत सु’शांतच्या एक्स गर्लफ्रेंडनं केली लग्नाची घोषणा, ‘या’ व्यक्तीशी करणार लग्न…

सध्या संपूर्ण देशातील प’रिस्थि’ती गं’भी’र आहे. अश्या प’रस्थि’ती मध्ये, सगळीकडे ठरलेले लग्न पुढे ढकलण्यात येत आहेत. बरेच लोकं, कोणताही नवीन उत्सव किंवा पार्टी साजरी न करता देशातील लोकांची मदत करत आहेत. ह्यामध्ये, समाजातील सर्वच स्तरातून मदत केली जात आहे.
आपल्या चाहत्यांमुळे आपले अस्तित्व टिकून आहे, हे भान ठेवत बरेच कलाकार, सेलेब्रिटीज आपला धर्म आणि मानवता लक्षात घेऊन सर्व सामान्य लोकांची सढळ हाताने मदत करत आहेत. सं’कटाच्या ह्या वेळेत सगळेच पुढे येऊन आपल्या लोकांची, देशाची म्हणजेच आपल्या देशातील लोकांची आपल्या परीने मदत करत आहेत.
बरेच कलाकार सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करत आपले लग्न उरकून घेत आहेत. परंतु त्यातही रुचिता जाधव सारखे सेलेब्रिटीज आहेत जे आपल्या लग्नासाठी जमवलेला पै’से दा’न करून एक उदाहरण मांडत आहेत. तर काही कलाकार असेही आहेत, ज्यांनी आपले लग्न पुढे ढकलले आहे.
ह्या दुःख’द प’रिस्थतीमध्ये कोणाचेही लग्न, आणि नवीन आयुष्य सुरुवात करण्याची इच्छा नाही म्हणून कलाकार देखील तसेच करत आहेत. मात्र, काही आपल्या वैयक्तिक आयुष्यात बदल घडवून आणता सुरु आहे तसेच जगत आहेत. अर्थातच हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण ह्याबद्दल सेलिब्रिटीज जेव्हा समोर येऊनकाही वक्तव्य करतात तेव्हा ते खूप स्वार्थी समजले जातात.
कारण त्यांचा चाहत्यांचा मोठा वर्ग असतो, आणि त्यामुळे त्यांच्या कडून अपेक्षा असते. जेव्हा त्या चाहत्यांचा हिरमोड होतो तेव्हा त्याच सेलिब्रिटीज ला त्यांचा रा’गाला देखील सामोरे जावे लागते. असेच काही घडले, दिवंगत अभिनेता सु’शांत सिंग रा’जपूतची पूर्व प्रेयसी आणि प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्याबद्दल…
अंकिता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतेच अंकिताने एक मुलाखत दिली आणि तिने स्वतःच ह्याबद्दल खुलासा केला आहे. सु’शांत सिं’ग राजपूत सोबत ब्रेकअप झाल्यानंतर काही वर्ष अंकिता सिंगल होती. अतिशय जास्त मा’न’सि’क त्रा’स तिने ह्या काळात सहन केला असे ती सांगते, हे ब्रेकअप तिच्यासाठी खूप मोठे होते आणि त्यामुळे काही काळ तिने स्वतःला एकटे ठेवले होते. २०१६ मध्ये त्या दोघांनि एकमेकांपासून विभ’क्त होण्याचा निर्णय घेतला होता.
तब्बल सहा वर्षे एकमेकांना डे’ट केल्यानंतर सुशांत-अंकिता लग्न करणार असेच जणू नक्की होते,मात्र काही कारणाने ते वेगळे झाले होते. काही काळ सिंगल राहिल्यानंतर अंकिता हिच्या आयुष्यात विकी जैन नावाचा व्यक्ती आला आणि ती त्याला डे’ट करू लागली. विकी हा एक मोठा उद्योजक आहे
ह्या दोघांच्याही नात्याला आता बरीच वर्षे उलटली आहेत. आता त्या दोघांनी विवाह करून नवीन आयुष्य सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिने स्वतः हा खुलासा केला आहे. “प्रेम ही माझी गरज आहे. जसं जेवन ही गरज असते तसच प्रेम ही माझी गरज आहे.”असे तिने सांगितले आहे.
अंकिताने त्या दोघांच्या नात्याविषयी अजूनही काही गोष्टी सांगितल्या आहेत. ती म्हणाली, “मी कुठेही जाऊ, काम करू मला माझा पार्टनर माझ्या सोबत पाहिजे, बाकी दुनियेशी मला घेणदेणं नाही. आम्ही दोघे एकत्र बसून चहा जरी पित असू तरी ते माझ्यासाठी खूप आहे. माझ्या प्रियकरासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी मौल्यवान आहे.”
आपल्या लग्नाविषयी बोलत असताना ती म्हणाली, “आमचं लग्न जोधपूर किंवा जयपूर मध्ये होईल. मला राजस्थानी पद्धतीने लग्न करायचं आहे.” अखेरीस अंकिताने एक्स बॉयफ्रेंड सु’शांत ह्याचाही उल्लेख केला. ती म्हणाली, “सुशांत माझा फेवरेट स्टार आहे. पवित्र रिश्ता मध्ये आम्ही एकत्र काम केलं आहे. आणि तो माझा आवडता अभिनेता आहे.”