भाजपच्या या माजी आमदाराचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश…!

भाजपच्या या माजी आमदाराचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश…!

भाजपने यावेळी केलेले राजकारण, आणि इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना भाजप मध्ये घेऊन त्यांना उमेदवारी दिल्यामुळे माझ्या अनेक जुने कार्यकर्ते नाराज होते. त्यामुळे आता भाजप कधील अनेक कार्यकर्ते भाजपाला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत आहेत.

dnaindia.com

भाजप मधील नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे निकटवर्तीय आणि धुळ्याचे भाजपचे माजी आमदार अनिल गोटे आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे माजी आमदार अनिल गोटे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. आज शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस असल्यामुळे ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, आणि राष्ट्रवादीचे मुंबईत असलेल्या कार्यालयात हा प्रवेश होणार आहे.

एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आणि त्यांच्या गटातील अनिल गोटे आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना झाले आहेत. त्याचबरोबर शिरपूर मधील भाजपचे जितेंद्र ठाकूर यांनी याआधीच असे निश्चित केले होते की, ते राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार आहेत. म्हणून आज जितेंद्र ठाकूर अनिल गोटेसोबत आज मुंबई मध्ये राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार आहे.

एकनाथराव खडसेही राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होत्या. पण त्यांनी पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु एकनाथ खडसे यांनी दिल्लीमध्ये शरद पवार यांची भेट घेतली होती त्यानंतच या चर्चा सुरू झाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12