भारतातील या 5 प्राचीन विद्यापीठांबद्दल, या मनोरंजक गोष्टी तुम्हाला अजूनही माहिती नसतील…पहा

भारतातील या 5 प्राचीन विद्यापीठांबद्दल, या मनोरंजक गोष्टी तुम्हाला अजूनही माहिती नसतील…पहा

भारत हा असा देश आहे जिथे जगातील सर्वात प्राचीन विश्वविद्यालय स्थापन झाले. प्राचीन काळी भारतात बरीच विश्वविद्यालय होती, जिथे परदेश व परदेशातील विद्यार्थी-विद्यार्थीनी शिक्षण घेत असत. चौथ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत बरीच विश्वविद्यालय स्थापन झाली, ती अजूनही भारताच्या इतिहासात नोंदली गेलेली आहेत. या विश्वविद्यालय इतर विषयांसह वैदिक शिक्षणही दिले जात असे. त्यांच्या राजवटीत अनेक राजांनी  काहे अशीचही मनोरंजक माहिती आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत. तर मग चला बघुयात अजून काही माहिती

1) तक्षशिला विश्वविद्यालय :
तक्षशिला हे असे भारतातील पहिले व सर्वात जुने विश्वविद्यालय म्हणून संबोधले जाते. इतिहासात असे म्हटले जाते की हे विश्वविद्यालय सुमारे 27000 वर्षांपूर्वी बांधले गेले होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज हे विद्यापीठ पाकिस्तानात आहे पण भारत- पाक फाळनीपूर्वी ते भारतातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक होते. जगातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थी या विद्यापीठात शिक्षण घेत असत. येथे नितीशास्त्रासारखे अनेक विषय शिकवले जात होते. असे पण म्हणले जाते की या विश्वविद्यालयात अनेक देशातील राजकुमार शिक्षण घेण्यासाठी येत असत.

2) नालंदा विश्वविद्यालय :
तक्षशिला नंतर सर्वात जुने आणि सर्वात मोठे विद्यापीठाचे नाव घेतले जाते ते नालंदा विश्वविद्यालय. हे विश्वविद्यालय बिहार राज्यात आहे. हे विद्यापीठ 450-470 इस्वी सना दरम्यान गुप्त वंश घराण्याचे तत्कालीन शासक कुमारगुप्त यांनी बनवले होते. यावेळी केवळ भारतच नव्हे तर चीन, जपान, तिबेट, कोरिया, इंडोनेशिया आणि तुर्की यासारख्या बड्या देशांमधील विद्यार्थी या विद्यापीठात शिक्षण घेत असत. या विश्वविद्यालया
बद्धल असे पण बोलले जाते की या विश्वविद्यलयात 300 पेक्षा जास्त क्लास रूम होते. आणि येथील शिक्षकांसाठी 9 मजल्यांची मोठी लायब्ररी देखील होती.

3) विक्रमशिला विश्वविद्यालय :
नालंदा आणि तक्षशिला विश्वविद्यालय नंतर विक्रमशीला विद्यापीठ हे भारतातील सर्वात प्राचीन विद्यापीठाचे नाव आहे. आपल्या माहितीसाठी, सांगतो की विक्रमशिला विद्यापीठ बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यात आहे. हे विद्यालय पाल वंशाचे राजा धर्मपाल यांनी बांधले होते. या विद्यापीठातील इतर शाळांप्रमाणेच भारत तसेच परदेशातील विद्यार्थीही अभ्यासासाठी येत होते. विक्रमशिला विश्वविद्यालय हे बिहार राज्यातही एक प्रमुख विद्यालय आहे, जेथे दूरदूर वरून पर्यटक भेट देण्यासाठी येतात.

4) वल्लभी विश्वविद्यालय :
हे विश्वविद्यालय गुजरातमध्ये आहेत. अनेक इतिहासाच्या पुस्तकांमध्ये असे म्हटले आहे की हे विद्यापीठ 470 इसवी सनाच्या आसपास बांधले गेले आहे. त्या काळात अभ्यासाच्या दृष्टीने नालंदा, तक्षशिला आणि विक्रमशिला या विध्यालयाशी याची समतुल्य तुलना केली जात होती. हे विद्यालय बौद्ध शिक्षणाचे एक प्रमुख केंद्र होते. या विद्यालया बद्दल असेही म्हटले जाते की त्यावेळी हे विद्यालय कलेचे एक उदाहरण होते, जी हळूहळू नष्ट होत गेली. येथे अजूनही पर्यटक फिरायला म्हणून येतात.

5) पुष्पगिरी विश्वविद्यालय :
पुष्पगिरी विश्वविद्यालय भारताच्या ओरिसा राज्यात आहे. हे तिसऱ्या शतकाच्या आसपास बांधले गेले. त्यावेळी हे विद्यापीठ ओरिसाच्या डोंगराच्या मध्यभागी बांधले गेले होते. त्याच्या बांधकामाविषयी असे म्हणतात की हे सम्राट अशोकाने बांधले होते. या विश्वविद्यालय बद्दल असेही म्हटले जाते की सुमारे 700 ते 800 वर्षांपासून हे भारतातील शिक्षणाचे एक प्रमुख केंद्र होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12