“डाव मांडते भीती”..अमृता फडणवीस यांच हे नवीन गाणं ऐकून प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध, ऐकून नेटकर्यांनीही दिली दाद, पहा विडीयो

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आपल्या राजकारणामुळे कायम चर्चेत असतात. मात्र, काही वर्षापासून अनेकांचे त्यांनी पत्ते कट केल्याने त्यांच्या नावाची चांगलीच चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रकांत बावनकुळे यांच्यासह अशिष शेलार यांना साईडला केल्याने देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना फ्रीहँड दिला आहे. त्यामुळे ते राज्यामध्ये त्यांना हवे तसे कारभार चालवत असतात. शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरून पंचवीस वर्षापासून असलेली युती संपुष्टात आली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थाने अ’स्वस्थ झाले.
देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या पत्नी देखील अनेकदा पाठिंबा देतात. ट्विटरवर शिवसेनेला अनेकदा त्यांनी प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. त्यावरूनही अनेक जण टीका करत असतात. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी या सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत. तसेच अनेकदा त्या व्हिडिओ शेअर करून आपले गीत सादर करत असतात.
मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजने’चा प्रचारासाठी एक गीत तयार केले होते. या गीतामध्ये ते पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह गाणे गात होते. या गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या गाण्यावरून अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली होती आणि त्यांना ट्रो’ल देखील केले होते.
काही महिन्यांपूर्वी त्यांनी स्त्रीभ्रू’णह’त्येवर देखील एक गाणे सादर केले होते. हे गाणे देखील मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले होते. या गाण्यावरून देखील त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मुळातच अमृता फडणवीस यांचा आवाज चांगला नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे.
असे असले तरी त्या गाणे गात असतात. अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील त्यांनी एका अल्बम मध्ये डान्स करून गाणे शेअर केले होते. त्यानंतर अनेकांनी त्यांना टा’र्गे’ट केले होते. अमृता फडणवीस अनेक लाईव्ह कार्यक्रमत देखील आपली कला सादर करत असतात. काही वर्षांपूर्वी झालेल्या पोलीस रजनी या कार्यक्रमात देखील त्यांनी आपली कला दाखवली होती.
त्यानंतरही त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. मुळात गाणी गाणे त्यांचा पिं’ड नाही, असे अनेक जणांचे म्हणणे होते. असे असले तरी त्या अनेकांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. आता त्यांनी पुन्हा एक गाणे गायले आहे. एका चित्रपटासाठी त्यांनी गाणी गायली आहे.
या चित्रपटाचे नाव अंधार असे आहे. सामाजिक प्रश्नावर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटांमध्ये सागरिका घाडगे आणि गुलशन देवया यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटातील गाणे ‘डाव मांडते भीती’ असे आहे. हे गाणे देखील मोठ्या प्रमाणात ट्रो’ल होत आहे आणि अमृता फडणवीस यांच्यावर टी’का होत आहे. असे असले तरी त्या टी’केकडे दुर्लक्ष करून आपली कला जोपासत आहेत.
त्यामुळे त्यांचे काही स्तरातून कौतुक देखील होत आहेत. भाजप कार्यकर्ते त्यांचे खूप कौतुक करत असतात. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेकदा आपल्या पत्नीचे समर्थन करताना दिसत असतात. ते म्हणतात की, माझी पत्नी ही तरुण आहे, त्यामुळे तिला अनेकजण टा’र्गे’ट करत असतात आणि तिला व्यक्तिमत्व असल्यामुळे ती तिचे विचार, आवड जोपासू शकते.
Presenting my new Jazz song for upcoming @zeemusicmarathi suspense thriller movie- ‘अंधार’! A song of fear,indecisiveness beautifully composed by @jeetmusic . Listen to it 👉 https://t.co/Iig1WOyKNF
मराठी चित्रपट ‘अंधार‘ मधील @jeetmusic यांनी संगीतबद्ध केलेले माझे गीत नक्की ऐका☝️ pic.twitter.com/xcF4f9tGdf— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 7, 2021
मात्र, अमृता फडणवीस भाजप साठी काम करत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. आता या व्हिडिओ वरून देखील अनेकांनी वाद घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अमृता फडणवीस यांना चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. दरम्यान, आपण यापुढेही गीत गात राहू असे देखील त्यांनी आवर्जून सांगितले आहे.