Video : पहिल्यांदाच अमृता फडणवीस यांनी दाखवली डान्सची झलक, पहा पूर्ण गाण्यात वेगवेगळ्या ड्रेसवर….

Video : पहिल्यांदाच अमृता फडणवीस यांनी दाखवली डान्सची झलक, पहा पूर्ण गाण्यात वेगवेगळ्या ड्रेसवर….

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या राजकारणामुळे सध्या चर्चेत आहे. पण त्याहूनही जास्त चर्चा त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांची होताना दिसत आहे. कारण राजकारणाव्यतिरिक्त अमृता फडणवीस मनोरंजन क्षेत्रात सध्या कार्यरत आहे. पण त्या अधून मधून काही सामाजिक मुद्द्यांवर आपले मत मांडत असतात.

अमृता फडणवीस या स्वतः एक उत्तम गायिका आहेत. मागील काही काळापासून आपल्या वेगवेगळ्या गाण्याने त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दिवाळीच्या मुहूर्तावरती आता अमृता फडणवीस यांचा नवीन गाणं प्रदर्शित झाले होते. महालक्ष्मीची आराधना करत असतांना या गाण्यांमध्ये अमृता फडणवीस दिसल्या होत्या.

या गाण्याला सोशल मीडिया वरती चांगला प्रतिसाद मिळाला होता. काही महिन्यांपूर्वी त्यांनी स्त्रीभ्रू’ण ह’त्येवर देखील एक गाणे सादर केले होते. हे गाणे देखील मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले होते. या गाण्यावरून देखील त्यांच्यावर टी’केची झोड उठवली होती. मुळातच अमृता फडणवीस यांचा आवाज चांगला नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे.

असे असले तरी त्या गाणे गात असतात. अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील त्यांनी एका अल्बम मध्ये डान्स करून गाणे शेअर केले होते. त्यानंतर अनेकांनी त्यांना टार्गट केले होते. अमृता फडणवीस अनेक लाईव्ह कार्यक्रमत देखील आपली कला सादर करत असतात. काही बिग बॉस शोमध्ये देखील हजेरी लावली होती.

त्यानंतरही त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. मुळात गाणी गाणे त्यांचा पिंड नाही, असे अनेक जणांचे म्हणणे होते. असे असले तरी त्या अनेकांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. दरम्यान, त्यांचे आणखी एक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. त्यामुळे अमृता फडणीवस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी आपल्या नविन गाण्याचे पोस्टर रिलीज केले होते. यानंतर अमृता यांनी त्यांच्या गाण्याचा टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या गाण्यात अमृता फडणवीस यांचा भन्नाट डान्स देखील चाहत्यांना पहायला मिळणार आहे. या टिझरने सध्या सोशल मिडावर धुमाकूळ घातला आहे.

अमृता फडणवीस यांच्या गाण्यासह त्यांचा डान्स पाहण्याची प्रतिक्षा प्रेक्षकांना लागली आहे. आणि पहिल्यांदाच अमृता फडणवीस आपल्याला डान्स करताना दिसणार आहे. “अज मैं मूड बना लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!!” असे या गाण्याचे बोल आहेत. हे एक पार्टी साँग आहे.

An electrifying , Biggest Bachelorette Anthem of the Year …… अस कॅप्शन देत अमृता यांनी या गाण्याचं पोस्टर रिलीज केल होत. यानंतर आता त्यांनी #JoinTheBrideTribe ! असं म्हणत या गाण्याचा टिझर शेअर केला आहे.

पहिल्यांदाच अशा प्रकारचा डान्स अमृता फडणवीस यांनी केला आहे. या गाण्यामध्ये त्यांनी ३-४ वेस्टर्न प्रकारचे ड्रेस परिधान केले असून ते अतिशय सुंदर असा डान्स करताना दिसत आहेत. त्यांचे हे गाणं पार्टी सोंग असून चांगलेच व्हायरल जाऊ शकते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12