या व्यक्तीने अभिनेत्री अमिषा पटेल ची चप्पलाने मारून ने केली होती धुलाई, कारण वाचून हैराण व्हाल…

या व्यक्तीने अभिनेत्री अमिषा पटेल ची चप्पलाने मारून ने केली होती धुलाई, कारण वाचून हैराण व्हाल…

बॉलीवुड मध्ये आपण आजपर्यंत बरेच किस्से ऐकले व वाचलेही असतील. बऱ्याच वेळा बॉलीवुड मधील लव्ह केमिस्ट्री च्या बाबत आपल्याला नेहमी वेगळ्या वेगळ्या बातम्या ऐकायला मिळतात. मग त्यात विवाहित स्टार्स, अविवाहित स्टार्स यांचा सर्वांचा समावेश असतो.

स्टार किड्स देखील या चर्चेत आपल्याला नेहमीच दिसून आलेले आहेत. या सर्व गोष्टीची बॉलीवुड मधील लोकांना सवय देखील झालेली असते. म्हणून त्यात त्यांना फारसे वावगे काही वाटत नाही. कोणाचे कोणाशी कधी सूट जुळतील व कधी तुटतील हे कोणीही सांगू शकत नाही.

त्यापैकी काही स्टार्स त्यांचे प्रेमाचे संबंध लग्नापर्यंत पोहचवत असतात तर बरेच असे स्टार्स आहेत ज्यांना प्रेम सबंध टिकवता आले नाही. काहींनी प्रेम विवाह करून देखील घटस्फोट घेतला आहे. तर काहींनी पहिले विवाह संपुष्टात येण्यापूर्वीच दुसरे लग्न केले आहेत.

बॉलीवुड मध्ये असे काही स्टार्स होऊन गेले ज्यांना सुरुवातीच्या काळात प्रसिध्दी मिळून देखील त्यांची ती प्रसिध्दी फार काळ टिकली नाही. अनेक असे स्टार्स आहेत ज्यांचे प्रेमभंग झाल्याचे परिणामाने देखील त्यांचे कामावरील दुर्लक्ष झाल्याने करीयर बरबाद झाले आहे.

बॉलीवुड मध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांना बॉलीवुड मध्ये पदार्पण करण्यास त्यांच्या घरच्यांचा सक्त विरोध होता. तरी देखील घरच्यांचा विरोध स्वीकारून असे काही स्टार्स बॉलीवुड मध्ये पदार्पण करून यशाचे शिखर गाठू शकले. असेही काही स्टार्स आहेत ज्यांनी कुटुंबाचा विरोध करून बॉलीवुड मध्ये पाय ठेवला. परंतु त्यांना बॉलीवुड मधून लवकरच पायउतार व्हावे लागले.

आज आपण अश्या अभिनेत्री
बद्धल बोलणार आहोत जिने घरच्यांचा विरोध स्वीकारून बॉलीवुड मध्ये पदार्पण केलेले आहे. सुरुवातीच्या काळात भरघोस प्रसिद्धीस सिद्ध झालेली ही अभिनेत्री आजकाल फ्लॉप झालेली दिसत आहे. तर ती अभिनेत्री दुसरी कोणी नसून तीच नाव आहे अमिषा पटेल.

अमेषा पटेलने बॉलिवूडमध्ये घरच्यांचा विरोध असताना देखील पदार्पण केले होते हे सर्वांना चांगलेच ठाऊक आहे, पण ती दिर्गकाळ यशस्वी होऊ शकली नाही. ‘कहो ना प्यार है’ या पहिल्या चित्रपटाच्या अपार यशानंतर तिला बॉलिवूड ने डोक्यावर उचलून धरले होते, पण तिच्या बाहेर ख्याली अफेअर्समुळे तिला तिचे करिअर ज्या पात्रतेस पाहिजे होते त्या उंचीवर नेणे शक्य झाले नाही. तीच्या फॅमिली बरोबरच्या तीच्या विचित्र वागण्याची सुरुवातही बॉलीवूडमध्ये आल्यापासूनच सुरू झाली होती.

वास्तविक, अमीषाने बॉलिवूड मध्ये एंट्री करू नये अशी तिच्या कुटुंबाची इच्छा होती. कुटुंबाच्या या विरोधामुळे तीने तीच्या फॅमिली पासून देखील वेगळ राहण्याचा निर्णय घेतला होता, नंतर ती तिच्या कुटूंबापासून विभक्त झाली. पण हे देखील खरं आहे की इंडस्ट्रीमध्ये अमीषा एकमेव नाही जी तिच्या कुटुंबापासून विभक्त झाली आहे.

तिच्याव्यतिरिक्त असे बरेच सेलेब्स आहेत जे आपल्या आईवडिलांपासून विभक्त राहतात. कधीकधी आई- वडिलांशी भांडण झाल्यामुळे, कधीकधी परस्पर विवादामुळे, तारे आपल्या पालकांशी वाद घालून विभक्त होतात. परंतु कधीकधी हा संघर्ष खूप गंभीर स्वरुपाचा असतो, जसे अमीषा पटेल यांच्याबरोबर झाला होता.

अमीषा पटेलचे तिच्या वडिलांशी इतके वाद झाले होते की अमीषाने तिच्या वडिलांकडून 12 कोटी रुपयांची भरपाईची मागणी केली होती. यावेळी अमिषाने तिच्या वडिलांनी तिच्या पैशांचा गैरवापर करीत असल्याचा आरोपही तिच्या कुटुंबियांवर केला.

अमिषाने माध्यमांसमोर असे काही सांगितले की तेथून पुढे या प्रकरणाला आग लागली, ज्याचा कोनीही विचार करू शकत नाही. होय, अमीषाने तिची आई आशा पटेल यांचेवर असे आरोप लावले की तिला घराबाहेर काढताना चप्पलने मारहाण केल्याचा आरोप केला होता, जो तो कधीही विसरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12