‘झुंड’ चित्रपटातील आकाश ठोसरच्या भूमिकेबद्दल आमिरचे वक्तव्य, म्हणाला; मला तुला असं बघायचं नव्हतं..

‘झुंड’ चित्रपटातील आकाश ठोसरच्या भूमिकेबद्दल आमिरचे वक्तव्य, म्हणाला; मला तुला असं बघायचं नव्हतं..

आमिर खान बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. आपला कोणताही सिनेमा असो, तो बनवताना तो प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारकाईने लक्ष देतो. सर्व काही अगदी परफेक्ट असावं अशी त्याची इच्छा असते. आणि त्याच्या सिनेमामध्ये ते बघायला देखील मिळते. आमिर खान सध्या त्याच्या आगामी लाल सिंग चड्ढा सिनेमासाठी कमालीचा च’र्चेत आहे.

हॉलीवूडचा अत्यंत लोकप्रिय ठरलेला सिनेमा फॉरेस्ट ग्रँप या सिनेमाचा लाल सिंग चड्डा रिमेक आहे. सिनेमा रिमेक असला तरीही तो उत्तम असावा याकडे त्याचे खास लक्ष असते. कोणत्याही सिनेमाचे कथानक नवीन आणि हटके असेल तर आमिर खान त्याचे देखील तोंडभरून कौतुक करतो. सध्या बॉलीवूड मध्ये देखील एका खास हटके सिनेमाची जोरदार च’र्चा रंगली आहे.

सैराट या मराठी सिनेमाने बॉलीवूडमध्ये देखील आपल्या नावाचा डंका वाजवणाऱ्या नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ सिनेमा ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमामध्ये महानायक अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहेत. त्याचबरोबर पुन्हा एकदा सैराटची टीम एकत्र आली आहे.

म्हणून झुंड सिनेमाचे केवळ मराठी इंडस्ट्रीमध्येच नाही तर बॉलीवूडमध्ये देखील चांगलीच च’र्चा रंगली आहे. रिंकू राजगुरू या सिनेमामध्ये अगदी हटके अशा भूमिकेत बघायला मिळणार आहे. तर सैराट मधून ल’व्हर-बॉय अशी ओळख निर्माण करणारा आकाश ठोसरने या चित्रपटात निगे’टिव्ह भूमिकेत दिसणार आहे. सैराट सिनेमातून आकाश केवळ राज्यातीलच नाही तर देशातील घराघरात पोहोचला.

सैराटमध्ये त्याने प्रेमात वे’ड असणाऱ्या तरुणाची म्हणजेच परशाची भूमिका साकारली होती. त्याच्या भूमिकेला भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आणि आता तोच परशा उर्फ आकाश झुंड मध्ये नका’रात्मक भूमिका साकारत आहे. झुंड सिनेमाने प्रदर्शित होण्यापूर्वीच सगळीकडे प्रसिद्धी मिळवली आहे.

या सिनेमाची चर्चा ऐकून अभिनेता आमिर खानला देखील हा सिनेमा बघण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे आमिर खानसाठी नुकतंच स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आल होत. या सिनेमाच्या खाजगी स्पेशल स्क्रीनिंग मिळालेला प्रतिसाद खूप उत्तम होता. सिनेमातील आकाशचे पात्र आमिरला सगळ्यात जास्त आवडले. सिनेमाची टीम आमिरच्या घरी गेली होती.

त्यावेळी आकाश देखील त्याच्यासोबत होता. आकाशला बघून आमिरने थेट त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं. ‘तुझा अभिनय मला खूप आवडतो. सैराट मध्ये तुझा अभिनय बघून मी चकित झालो होतो.

त्यामुळे तुला अशा नका’रत्मक भूमिकेत बघायला भेटेल असं मला वाटलंच नव्हतं. I Love You म्हणून तुला असं बघयाची माझी इच्छा नव्हती. पण खूप छान अभिनय केला आहेस. तू नक्कीच खूप मोठा कलाकार होशील यावर मला खात्री आहे.’ असं म्हणत आमिरने आकाशला जणू त्याच्या कामाची पोचपावतीच दिली.

पुढे सिनेमा बद्दल बोलताना आमिर म्हणाला, ‘झुंड बघताना मी गुंग झालो होतो. सिनेमातील काही क्षण खरोखर भावुक करणारे होते. सोबतच या सिनेमाला स्टँडिंग विश भेटली आहे. खाजगी स्क्रीनिंग च्या दरम्यान असं उठून टाळ्यांचा गडगडाट खूप कमी सिनेमासाठी बघायला मिळतो. हा सिनेमा नक्कीच मोठा विक्रम बनवणार.’

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.