काय सांगता ? ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीच्या सौंदर्यावर अल्लू अर्जुन फिदा ! म्हणाला; तिच्या इतकी सुंदर आणि हॉ’ट..

काय सांगता ? ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीच्या सौंदर्यावर अल्लू अर्जुन फिदा ! म्हणाला; तिच्या इतकी सुंदर आणि हॉ’ट..

पुष्पा या सिनेमाला प्रदर्शित होऊन आता जवळपास दीड महिना झाला आहे. असं असलं तरीही अजून देखील या सिनेमाची क्रेज काही कमी नाही झाली. त्याउलट सगळीकडेच दिवसेंदिवस, या सिनेमाची क्रेज वाढतच चालल्याची दिसत आहे. सिनेमासोबतच सगळीकडे सिनेमाच्या कलाकारांचे देखील चांगलेच कौतुक होत आहे.

खास करून सिनेमाचा अभिनेता अल्लू अर्जुनची सगळीकडेच चर्चा सुरु आहे. दक्षिण सिनेसृष्टीतील एक उमदा आणि अष्टपैलू कलाकार म्हणून अभिनेता अल्लू अर्जुनला ओळखलं जात. स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनच्या अनेक सिनेमाने देशभरात यापूर्वी देखील चर्चा रंगवली होती. आर्या, सन ऑफ सत्यमूर्ती, रेस गुर्रम, डीजे सारख्या सुपरहिट सिनेमामध्ये त्याने काम केले होते.

हे सिनेमा हिंदी डब करण्यात आले होते. हिंदी डब सिनेमा देखील चांगेलच सुपरहिट ठरले. या सिनेमामुळे अल्लू अर्जुनाचा एक खास असा चाहतावर्ग निर्माण झाला होता. मात्र, पुष्पा या सिनेमाने त्याला केवळ दाक्षिणात्य सुपरस्टार नाही तर देशातील सुपरस्टार बनवले. या सिनेमाच्या भरगोस यशानंतर सगळीकडेच त्याचे तोंडभरून कौतुक होत आहे.

त्यानंतर त्याने वेगवेगळ्या मीडिया हाऊसला अनेक मुलाखती देखील दिल्या. त्यातील एक खास मुलाखत आता चांगलीच चर्चेत आली आहे. यामध्ये त्याने एका बॉलीवूड अभिनेत्रीच खूप कौतुक केले आहे, मुलाखती दरम्यान, तुझी आवडती बॉलीवूड अभिनेत्री कोण आहे असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर त्याने या बॉलीवूड अभिनेत्रीच कौतुक केलं.

त्याचे उत्तर देत असताना तो म्हणाला, ‘बॉलीवूडमध्ये अनेक सुंदर अभिनेत्री आहेत. साऊथमध्ये जशा खूप सुंदर आणि आकर्षक अभिनेत्री आहेत, तशाच बॉलीवूड मध्ये देखील आहे. मात्र एका अभिनेत्रीने कायमच मला खूप जास्त आकर्षित केले. दीपिका पदुकोण एक अष्टपैलू अभिनेत्री आणि सौंदर्यवती आहे. मीच काय साऊथ इंडस्ट्रीमध्येच काय, तर देशात अनेकांची ती आवडती अभिनेत्री आहे.

ग्लॅमर आणि व्यावसायिक सिनेमाचा जरी विचार केला तरी, दीपिका सर्व अभिनेत्रींना माघे टाकते. ती खूप सुंदर आणि उत्तम अभिनेत्री आहे.’ त्याच्या उत्तरावरून दीपिकाची साऊथमध्ये देखील चांगलेच लोकप्रिय असल्याचे समोर येते. यापूर्वी देखील जेव्हा एका मुलाखतीमध्ये एस राजामौली यांना बॉलीवूडच्या कोणत्या अभिनेत्री सोबत काम करायला आवडेल असं विचारण्यात आले होते, तेव्हा त्यांनी दीपिका पदुकोणचेच नाव घेतले होते.

त्याशिवाय महेश बाबू, ज्युनियर एनटीआर, सूर्या सारख्या दाक्षिणात्य अभिनेत्यांनी देखील तिच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आता, दीपिका जर एखादया साऊथच्या सिनेमामध्ये झळकली तर ते काही आश्चर्य ठरणार नाही.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.