बॉलिवूडमधील नाही तर ‘ह्या’ दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत आलियाला जायचे आहे “डेट” वर?

तरुणांमध्ये लोकप्रिय असलेली आणि सध्याची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आलीय भट आपला दमदार अभिनय आणि फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतीच आलीय भटने मुंबईमध्ये पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती. यावेळी तिला सर्वात स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेता कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने जे नाव घेतले ते ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
तुम्ही नक्कीच विचार केला असेल की आलिया बॉलीवूडमधील एखाद्या अभिनेत्याचं नाव घेईल! पण, त्या प्रश्नाचे उत्तर देताना आलिया म्हणाली की, अभिताभ बच्चन हे माझ्यासाठी नेहेमीच स्टायलिश अभिनेता आहेत आणि मला ‘विजय देवरकोंडाची’ स्टाइल्स आणि ग्लॅमरस लूक आवडतो. अलियाने दक्षिणात्य अभिनेत्याचे नाव घेतल्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या, कारण सर्वांनी असे अपेक्षित केले होते की, आलिया भट बॉलीवूडमधील एखाद्या अभिनेत्याचं नाव घेईल.
विजय देवरकोंडा हा दक्षिणात्य अभिनेता आहे, त्याचा ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. तेव्हापासूनच तो तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. नुकतीच आलीय आणि विजय यांची भेट झाली होती. त्यावेळी आलियाने विजय देवरकोंडाचा ग्लॅमरस लूक पाहिला.