लग्नाचे इतक्या वर्षांनंतर अक्षय ने केला धक्कादायक खुलासा, म्हणाला लग्नाचे पहिल्याच रात्री समजले की ट्विंकलचे…

लग्नाचे इतक्या वर्षांनंतर अक्षय ने केला धक्कादायक खुलासा, म्हणाला लग्नाचे पहिल्याच रात्री समजले की ट्विंकलचे…

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना १७ जानेवारी २००१ मध्ये लग्नबंधनात अडकले. अभिनेता राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या मुलीला अक्षयने प्रपोज केलं होतं. राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया वेगळे झाले होते, मात्र आपल्या मुलीच्या लग्नासाठी हे दोघेही एकत्र आले होते. अक्षय-ट्विंकलची पहिली भेट फिल्मफेयर मॅगझिनच्या शूटदरम्यान झाली होती. पहिल्या भेटीतच ट्विंकलला पाहताच अक्षय तिच्या प्रेमात पडला होता.

त्यानंतर या दोघांची पुन्हा एकदा ‘इंटरनॅशनल खिलाडी’च्या शूटिंगदरम्यान भेट झाली. त्यानंतर मात्र दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये, अक्षयने त्यांच्या लग्नाबाबत एक किस्सा सांगितला होता. अक्षयने ट्विंकलला लग्नासाठी प्रपोज केलं त्यावेळी ट्विंकलचा ‘मेला’ चित्रपट प्रदर्शित होणार होता. ट्विंकल या चित्रपटासाठी अतिशय उत्साही होती.

ट्विंकलने त्यावेळी अशी अट ठेवली की, जर ‘मेला’ हिट झाला तर ती अक्षयशी लग्न करणार नाही. आणि चित्रपट फ्लॉप झाला तर ती लग्न करणार…पण ‘मेला’ फ्लॉप झाला आणि दोघांचं लग्न झालं. दोघांच्या लग्नाबाबत बोलताना, अक्षयने एका मुलाखतीत सांगितलं की, ज्यावेळी तो डिंपल कपाडिया यांच्याकडे ट्विंकलसोबत लग्नासाठी विचारणा करण्यासाठी गेला, त्यावेळी डिंपल कपाडिया अक्षयला समलैंगिक समजत होत्या.

पण त्यानंतर अक्षयने डिंपल कपाडिया यांना ट्विंकलची योग्य ती काळजी घेण्याबाबत आश्वास्त केल्यानंतर, त्याचं लग्न पार पडलं. पण कायम चर्चेत असलेला बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा याच विषयांमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. वास्तविक ‘लक्ष्मी’ या चित्रपटाचे प्रमोशन खूप जोरात चालू आहे. आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो आपली को-स्टार कियारा अडवाणी हिच्या समवेत ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये आला. तिथे त्याने खूप मजा केली.

या दरम्यान त्यांनी आपल्या जीवनाशी संबंधित अनेक खुलासेही केले. शो दरम्यान अर्जना पूरन सिंगने अक्षयला काही प्रश्न विचारले. अक्षयने या प्रश्नांची मजेदार उत्तरे दिली आहेत. आपल्याला माहित असेल की अक्षय त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये येतो. आज पर्यंत तो शो मध्ये 25 वेळा दिसला आहे. यावेळी ‘द कपिल शर्मा शो’ च्या टीमने अक्षय कुमार यांना भेटवस्तू दिल्या. कपिल शर्मा यांनी अक्षय कुमारला नोट मोजणीची मशीन दिली आहे.

यावर अक्षय कुमारने कपिलची खूपच चेष्टा केली आणि तो म्हणाला की, ‘कपिल आपल्या घरातुन ही नोट मोजण्याची मशीन घेऊन आला आहे असे मजेदार उत्तर त्याने दिले. तथापि अक्षयचा हा चित्रपट नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट नोव्हेंबरला डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. चित्रपटाचे नाव अनेक वादांनंतर ‘लक्ष्मी बॉम्ब’ वरुन ‘लक्ष्मी’ असे करण्यात आले आहे.

हा तमिळ चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे. पण शोमध्ये अर्चना पूरनसिंगने लाइफ किंग सारखी जगणे अनिवार्य आहे का असे विचारले? त्याला त्याने उत्तर दिले की ‘नाही’ तो म्हणाला की मी असे आयुष्य जगत नाही. यावर अर्चनाने दुसरा प्रश्न विचारला की भांडण चालू असताना तुझ्यात आणि ट्विंकल खन्ना यांच्यात कोण जिंकतो? प्रत्युत्तरात अक्षय म्हणाला अक्षय लगेच म्हणला ट्विंकल नेहमी जिंकते.

मग अर्चना म्हणते की तुला कधी कळले की आपण कधीच जिंकू शकत नाही? अक्षय तातडीने म्हणतो की लग्नाच्या पहिल्याच रात्री हा खुलासा झाला होता. अक्षय कुमार म्हणाला आमच्या लग्नाचे पहिल्या रात्रीच मला कळाले की ट्विंकल बरोबर मी कधीही जिंकू शकत नाही. सर्व गोष्टीवर तिचीच मर्जी चालते हे ऐकून सर्वच जण आश्चर्यचकित झाले.

आता तुम्ही असा पण विचार करू शकता कि त्यारात्री काय झालं असेल नक्की? पण या मजेदार उत्तरांमधून या दोघांच्या मध्ये असलेले प्रेम आपल्याला दिसून येते. आपल्याला कदाचित माहित नसेल पण लग्नानंतर ट्विंकल खन्ना अभिनय क्षेत्रापासून दूरच राहिली. सध्या ट्विंकल लेखक आणि इंटिरियर डेकोरेटर म्हणून काम सांभाळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12