अक्षय कुमारच्या डेब्युवेळी ‘या’ ७ अभिनेत्रींचा जन्म देखील झाला नव्हता, आज अक्षयसोबत करताय रो’मान्स, नंबर ३च्या अभिनेत्रीसोबत तर अक्षयने..

अक्षय कुमारच्या डेब्युवेळी ‘या’ ७ अभिनेत्रींचा जन्म देखील झाला नव्हता, आज अक्षयसोबत करताय रो’मान्स, नंबर ३च्या अभिनेत्रीसोबत तर अक्षयने..

बॉलिवूड असो वा अन्य चित्रपटसृष्टी सगळ्यांनाच इंडस्ट्रीमध्ये आपले नाव कमविण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. खडतर प्रवासांना सामोरे जावे लागते; तर काहीक कलाकारांची जीवनशैली तर फारच वेगळी असते. काहींनी चित्रपटसृष्टी मध्ये येण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहे, तेव्हा कुठे जाऊन त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालेले आहे.

त्यातलेच एक अभिनेते म्हणजे अक्षय कुमार. अक्षय कुमारला त्याच्या पदार्पणाच्या वेळी अनेक स’मस्यांना सामोरे जावे लागले होते. परंतु त्यांना आज संपूर्ण जग उत्तम अभिनेता म्हणून ओळखते व त्यांनी आतापर्यंत सगळ्या अभिनेत्रींसोबत चित्रपटात काम केलेल आहे. अक्षय कुमारचे मूळ नाव राजीव हरिओम भाटिया हे आहे. त्यांची धर्मपत्नी ट्वींकल खन्ना ही आहे.

दोघांची ही उत्तम जोडी अशी आहे. अक्षय कुमार उत्तम अभिनेते तर आहेतच पण सोबतच उत्तम निर्माते, स्टं’ट व मार्शल आर्टस म्हणून सुद्धा त्यांना ओळखले जाते. अक्षय ने आतापर्यंत १२५ च्या अधिक चित्रपटात काम केलेले आहे तसेच ते काही चित्रपटांसाठी फिल्म फेयर अवॉर्डस साठी सुद्धा नामांकित आहेत.

आणि त्यांना बॉलिवूडच्या दुनियेत ‘खिलाडी कुमार’ ह्या नावाने ओळखले जाते. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण ‘सौगंध’ ह्या चित्रपटून घेतले. आज ह्या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला विचारात पाडणारी माहिती देणार आहोत. अक्षय कुमार ह्यांनी नावाजलेल्या अश्या अभिनेत्रींसोबत काम केले आहे, ज्यांचा जन्म अक्षय कुमारच्या पहिल्या चित्रपटाच्या वेळी सुद्धा झाला नव्हता.

१. क्रीती सेनोन – क्रिती सेनोन एक उत्तम मॉडेल व उत्तम अभिनेत्री म्हणून नावाजलेली आहे. क्रीती सेनोनने तेलुगू चित्रपटसृष्टीमध्ये एका रहस्यमय चित्रपटामधून पदार्पण केले. त्यानंतर बॉलिवूडमध्ये त्यांनी हिरोपंती ह्या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांना आपली ओळख दाखवली.

त्यांना अनेक फिल्म फेअर अवॉड्स सुद्धा मिळाले. अक्षय कुमार ह्यांनी जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले तेव्हा क्रीती सेनोन लगभग १ वर्षाची होती. ह्या दोन्ही कलाकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरहिट चित्रपट ‘ हाऊसफुल्ल ४ ‘ मध्ये एकत्र काम केलेले आहे. तसेच चाहत्यांना ह्या जोडीकडून अजून नव – नवीन चित्रपटांची आशा आहे.

२. कियारा अडवाणी – कियारा आडवाणी सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील जास्तीत जास्त फेम मिळवणारी अभिनेत्री म्हणून नावाजलेली आहे. कियारा अडवाणी ने २०१४ साली हिंदी चित्रपट ‘ फगली ‘ ह्या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर २०१६ मध्ये हिंदी बायोपिक ‘ एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी ‘ ह्या चित्रपटात सुद्धा काम केले आहे. त्यानंतर तिने नेटफ्लिक्स मधील लस्ट स्टोरीज ह्या चित्रपटातून नेटफ्लिक्स मध्ये सुद्धा चांगला कम बॅक दिला.

त्यानंतर कलंक, कबीर सिंग सारख्या नावाजलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले. कियाराचा जन्म अक्षय कुमारच्या पदार्पणाच्या एक वर्षानंतर म्हणजे १९९२ साली झाला. अक्षय आणि कियाराने ‘ गुड न्यूज ‘ आणि नुकतीच प्रदर्शित झालेली ‘ लक्ष्मी ‘ ह्या चित्रपटात एकत्र काम केलेले आहे. तसेच तुम्ही हे वाचून चकित व्हाल कि, कियारा अक्षय कुमारच्या २५ वर्ष लहान आहे, तरीही त्यांची जोडी नावाजलेली आहे.

३. वाणी कपूर – वाणी कपूरने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण यशराज फिल्म्सच्या माध्यमातून केले. तिने आपल्या करिअरची सुरुवात लहान पडद्यापासून केली. वाणी हिंदी चित्रपट ‘ शुद्ध देसी रोमान्स ‘ ह्या हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यानंतर तिने रणवीर सिंग, हृतिक रोशन सारख्या नामवंत अभिनेत्यासोबत सुद्धा चित्रपटात काम केले आहे.

वाणी कपूर फ्लिम फेअर अवॉर्डसने नामांकित आहे. पहिल्यांदा वाणी कपूर आणि अक्षय कुमार एकत्र त्यांचा आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ‘ बेल बॉटम ‘ हा दोघांचा आगामी चित्रपट आहे. अक्षय कुमारच्या पदार्पणाच्या वेळी वाणी कपूर लगभग ३ वर्षांची होती. आगामी चित्रपटाला घेऊन त्यांच्या चाहत्यांनी उत्सुकता अजून वाढली आहे. 

४. जॅकलिन फर्नांडिस – जॅकलिन २००६ साली श्रीलंकेची मिस युनिवर्स झालेली आहे, तसेच ती एक भारतीय अभिनेत्री सुद्धा आहे. २००१ मध्ये आलेला चित्रपट ‘ अलादिन ‘ येथून जॅकलिनने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, आणि प्रेक्षकांसमोर नवीन चेहरा आणला. त्यानंतर तिने अनेक नावाजलेल्या चित्रपटांत तसेच नामवंत अभिनेत्यासोबत उत्तम काम केले आहे.

सोबतच जॅकलिनने काहीक अल्बम साँग सुद्धा केलेले आहेत. जॅकलिन फर्नांडिसने अक्षय कुमारसोबत ‘ हाऊसफुल ३ ‘ आणि ‘ ब्रदर्स ‘ ह्या नावाजलेल्या चित्रपटांत काम केलेले आहे. तसेच आगामी चित्रपट ‘ रामसेतू ‘ मध्ये सुद्धा जॅकलिन आणि अक्षय एकत्र पडद्यावर झळकणार आहेत; तसेच अक्षय कुमारच्या पदार्पणाच्या वेळी जॅकलिन फक्त ५ वर्षांची होती.

५. सारा आली खान – सारा अली खानने २०१८ साली ‘ केदारनाथ ‘ ह्या हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. साराला ह्या चित्रपटाच्या माध्यमातून बेस्ट फिमेल डेब्यू फिल्म फेअर अवॉर्ड सुद्धा मिळाला होता. त्यानंतर साराने अनेक नावजलेल्या चित्रपटात काम केलेले आहे. अक्षय कुमारच्या पदार्पणाच्या वेळी सारा चा जन्म देखील झाला नव्हता. अक्षय कुमार आणि सारा त्यांच्या आगामी चित्रपट ‘ अतरंगी रे ‘ ह्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

६. भूमी पेडणेकर – भूमी पेडणेकर एक उत्तम भारतीय अभिनेत्री आहे. भूमीने ‘ दम लगाके हइशा ‘ ह्या हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ह्या चित्रपटाच्या माध्यमातून भूमीला बेस्ट फिमेल डेब्यु फिल्म फेअर अवॉर्ड सुद्धा मिळाला होता. त्यानंतर भूमी २०१५ मध्ये ‘ Man’s World ‘ नामक एका वेब सीरिजमध्ये आली. ह्या वेबसिरिजमध्ये भुमिसोबत अनेक नामवंत अभिनेत्रींनी काम केलेले होते.

त्यानंतर २०१७ पासून भूमीने लागोपाठ नावाजलेल्या चित्रपटांत काम केले व चाहत्यांच्या मनात उत्तम असे स्थान निर्माण केले. भूमी पेडणेकरने अक्षय कुमार सोबत ‘ टॉयलेट – एक प्रेम कथा ‘ ह्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. तसेच हा चित्रपट त्या वेळी सुपरहिट झाला होता आणि दोघांच्या जोडीला चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. अक्षय कुमारचा पहिला चित्रपट सौगंधच्या वेळी भूमी फक्त २ वर्षांची होती आणि आता अक्षय कुमारसोबत ती चित्रपटांत एकत्र काम करत आहेत. 

७. नुपूर सेनोन – तुम्हाला माहितीच असेल की नुपूर सेनोन हि, हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेत्री क्रीती सेनोन ची बहीण आहे. नुपूर सेनोन हि उत्तम गायिका म्हणून जगप्रसिद्ध आहे. नुपूर सेनोनने ‘ तेरी गलियां, चन्ना मेरेया, हवाये ‘ सारख्या अन्य गाण्यांमध्ये काम केलेले आहे. नुकताच अक्षय कुमार आणि नुपूर सेनोनचा ‘ फिलहाल ‘ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे; तसेच चाहत्यांनी ह्या गाण्याला भरभरून प्रेम दिलेलं आहे. अक्षय कुमारच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पणाच्या वेळी नुपूर चा जन्म सुध्दा झालेला नव्हता व आता ती २५ वर्षांची आहे. 

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x