देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काय चर्चा झाली? शेवटी अजित पवारांनी खुलासा केलाच…!

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काय चर्चा झाली? शेवटी अजित पवारांनी खुलासा केलाच…!

शेवटी राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सुटला असून जागा वाटपेचा कार्यक्रम आध्याप बाकी आहे. पण त्यात अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा एकत्र दिसल्यामुळे एका नाविन चर्चेला उधाण आले आहे. पण त्याचं भेटीच निमित्त होत ते अपक्ष आमदार यांच्या मुलाचं लग्न. या लग्नात माजी मंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकमेकांच्या बाजूला बसले होते. त्यानिमित्ताने त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळ गप्पा झाल्या, म्हणून त्यांच्यामध्ये नेमक कोणत्या गोष्टीवर चर्चा झाली यावर तर्क-वितर्क लावले जात आहे. पण शेवटी अजित पवारांनीच त्यांच्यात काय बोलणे झाले याचा खुलासा केला आहे.

अजित पवारांनी असे सांगितले की, संजयमामा शिंदे यांच्या मुलांच्या लग्नात माजी मंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझी खुर्ची शेजारीच लावली असल्याने आम्ही एकत्र बसलो होतो. याबद्दल मी त्यांना फक्त हवा पाण्याबद्दल विचारणा केली. अजित पवार बारामती कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर त्यावेळी पत्रकारांनी त्यांना त्यांच्या भेटीबद्दल प्रश्न विचारले असता त्यांनी अशी माहिती दिली.

त्यानंतर पत्रकारांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद आपण प्रश्न विचारला यावर बोलताना अजित पवारांनी असे सांगितले की मला उपमुख्यमंत्री कराव अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, पण हा निर्णय त्या त्या पक्षाचे पक्षप्रमुख घेतील. त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात खाते वाटपावरून प्रश्न विचारण्यात आला, त्यावर अजित पवारांनी असे उत्तर दिले की, हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असते त्यामुळे मला विचारू नका. दरम्यान, सिंचन घोटाळ्यावर मी बोलणार नाही असे देखील अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले.

अजित पवारच म्हणाले होते, मी काकांशी बोललोय; फडणवीसांचा खुलासा.

विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार बरोबर सत्ता स्थापना बाबत शनिवारी मोठा खुलासा केला आहे एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर वक्तव्य केलं. ज्यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती त्यावेळी अजित पवारांनी भाजप सोबत जात सरकार स्थापन केली होती मात्र अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे सहकार 80 तासातच पडले यावरच माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी असे सांगितले की काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सरकार चालणे शक्य नाही माझ्यासोबत सरकार स्थापन केले पाहिजे असे मी राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांना सांगितले होते. आणि असेच अजित पवारांनी आम्हाला सांगितलं. म्हणून आम्ही त्यांच्यासबोत जाऊन सत्ता स्थापन केली, असा गौप्यस्फोट त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला. आम्हाला राष्ट्रवादी कडे गेलो नव्हतो उलट अजीत पवार आमच्याकडे आले असेही त्यांनी सांगितले.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x