या अभिनेत्यामुळे लग्नाच्या 13 वर्षानंतर ऐश्वर्या पहिल्यांदा रागावली बच्चन कुटुंबियांवर, ऐश्वर्याला म्हणाला होता नकली प्लास्टिक….

बॉलीवूड मधील अभिनेत्यांचे एकमेकांसोबत झालेल्या भांडणामुळे बॉलीवूड इंडस्ट्रीचे बरेचसे नुकसान होते त्याचबरोबर त्या अभिनेत्यांचेही नुकसान होते. कारण असे बरेचसे चित्रपट असतात तेथे अभिनेत्याला एकटे काम करून जमत नाहीत, त्याच्या सोबत आणखी एक अभिनेता असावा लागतोच.
जसे की शोले चित्रपटात ‘जय’ आणि ‘विरू’, ‘अमर-अकबर-अँथनी’ चित्रपटातील अमर, अकबर आणि अँथनी यांची जोडी. ‘राम लखन’ या चित्रपटामध्ये ‘राम-लखन’ यांची जोडी.
असे बरेचसे चित्रपट आहेत जिथे अभिनेत्यांना जोडीने काम करावे लागते. पण बॉलिवूडमध्ये बऱ्याच जणांची एकमेकांसोबत भांडणे झालेली असतात जसे की, ‘सलमान खान’ आणि ‘शाहरुख खान’ यांनी ‘करन-अर्जुन’ या चित्रपटानंतर कुठलाही चित्रपट केला नाही.
असे सांगण्यात येते की त्यांच्यात काहीतरी भांडणे झाली होती. यामुळे अभिनेत्यांचे तर नुकसान होतेच पण बॉलिवूडचे इंडस्ट्रीचे ही नुकसान होते. म्हणून असे म्हटले जाते की बॉलिवूडमध्ये जर करिअर बनायचे असेल तर मिळून मिसळून काम करावे लागते. कारण या क्षेत्रात जेवढा पैसा आहे तेवढाच ‘आत्मसन्मान’ देखील आहे. इथे कोणी काय बोलेल आणि त्यावरून कोणाला किती राग येईल हे सांगू शकत नाही.
असाच एक किस्सा घडला होता ऐश्वर्या रॉय सोबत. जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण, तर झाले असे की ऐश्वर्या रॉय हिने एक इंटरव्यू दिला होता. त्यामध्ये तीला असे विचारले गेले होते की अशी कोणती कमेंट आहे जिच्यामुळे तुला खूप वाईट वाटले आहे.
तर यावर ऐश्वर्याने उत्तर दिले की मला एका अभिनेत्याने प्लास्टिक म्हणून संबोधले होते. हे मला फारच त्रासदायक वाटले आणि मला ते नाही आवडले. यादरम्यान ऐश्वर्या ला विचारले गेले की ही कमेंट त्यांना कोणी केली होती तर ऐश्वर्याने नाव सांगण्यास नकार दिला.
ऐश्वर्या त्या अभिनेत्यावर एवढी चिडली आहे की त्या अभिनेत्याबरोबर काम न करण्याची आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांनाही इमरान सोबत काम करू न देण्याची जणू शपथच घेतली आहे. ऐश्वर्या आपल्या परिवारातील लोकांनाही त्या अभिनेत्याबरोबर काम करण्यापासून थांबवत आहे. आपले सासरे अमिताभ बच्चन यांना देखील या अभिनेत्या पासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
तर जाणून घेऊया ऐश्वर्या ला प्लास्टिक म्हणून कमेंट करणारा तो अभिनेता होता. तर तो अभिनेता होता बॉलीवूडचा बोल्डमॅन अभिनेता ‘इमरान हाश्मी’. जेव्हा इम्रान हाश्मी ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये ‘महेश भट’ यांच्यासोबत गेला होता. या शोचे होस्ट करण जोहर याने असा प्रश्न विचारला की जर तुला ऐश्वर्या रॉय वर कमेंट करायची असेल तर तू काय कमेंट करशील.
यावर इम्रान हाश्मी याने म्हटले होते की ‘प्लास्टिक’ याचा असा अर्थ आहे की ‘नकली’ पण त्यानंतर इम्रान हाश्मी ने ऐश्वर्याची माफी देखील मागितली होती. त्यांनी असे म्हटले होते की जर मला ऐश्वर्याला भेटण्याची संधी मिळाली तर मी त्यांची जरूर माफी मागेल.
बिग बी अमिताभ बच्चन सध्या काही चित्रपटांद्वारे काम करताना दिसत आहेत. नुकताच त्यांनी ‘चेहरा’ या चित्रपटात इम्रान हाश्मी सोबत काम करण्यासाठी चित्रपट स्वीकारला आहे. हीच गोष्ट ऐश्वर्याला खटकली त्याचे कारणही हे ‘प्लास्टिक कमेंट’ प्रकरण होते.
इम्रान हाश्मी यांना करणने आणखी देखील अभिनेत्रींवर कमेंट करायला सांगितले होते. करणने मल्लिका शेरावत वर कमेंट करायला सांगितले, त्यावर इम्रानने सांगितले की जर तुम्ही मल्लिकाच्या रूम मध्ये गेलात तर तिथे तुम्हाला एक पुस्तक मिळेल त्याच नाव असेल ‘बॉलीवुड एक्ट्रेस बनण्याचे घरगुती उपाय’ इतकंच नाही तर त्यांना हे देखील विचारले गेले की आतापर्यंत कुठल्या अभिनेत्रीकडून खूपच खराब किस मिळाला आहे.
यावर त्यांनी मल्लिका शेरावत चे नाव सांगितले होते. यासोबतच आणखी अभिनेत्रींवर सुद्धा इम्रानने कमेंट केल्या होत्या, त्यांनी बॉलीवूडची अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्यावर कमेंट करताना असे म्हटले होते की, श्रद्धाला जास्त जेवण करण्याची खूप गरज आहे. कारण श्रद्धा कपूर शरीराने खुप बारीक आहे. इम्रानने ज्याप्रमाणे ऐश्वर्याला माफी मागितली त्याप्रमाणे बॉलिवूडमधील बऱ्याचश्या अभिनेतत्र्यांची माफी मागायचे बाकी आहे.