अखेर या कठीण अटी व शर्तीवर रियाची जामिनावर झाली सुटका, पहा रियाचा पा-सपोर्ट जमा करून…

अखेर या कठीण अटी व शर्तीवर रियाची जामिनावर झाली सुटका, पहा रियाचा पा-सपोर्ट जमा करून…

बॉलीवुड अभिनेता सुशांत चे निधन आणि त्याचे प्रकरणातील चौकशी दरम्यान त्यासोबतच समोर आलेले रिया आणि तिच्या भावाचे इतर अमली पदार्थाचे प्रकरण यामध्ये रिया महिन्यापासून भायखळा येथील जेल मध्ये जुडीशल कोठडीत होती. यापूर्वी देखील तिच्या वकिलांनी वेळोवेळी रीयचे वतीने जामीन अर्ज न्यायालयात दाखल केले होते.

परंतु प्रकरणाचे चौकशी चालू असल्याने तिचे जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केले होते. अखेर तिला काल न्यायालयाने जामीना वर मुक्त केले आहे. जरी रियाला जामीन मिळाला असेल तरी देखील न्यायालयाने रियाचा जामीन अर्ज सशर्थ मंजूर केला आहे. बुधवारी न्यायालयात रीयाचे जामीन अर्जावर अंतिम सुनावणी होती.

दोन्ही वकिलांचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने रीयाचा जामीन अर्ज मंजूर करून रियाला जामिनावर मुक्त केले.वेळेवर योग्य तो हमीदार जामीन उपलब्ध न झालेने रोखीच्या जामिनावर रीयाची मुक्तता करणेबाबत रोयाचे वकील सतीश मानशिंदे यांनी न्यायालयास विनंती केली. रियाचे वकिलांची विनंती मान्य करून न्यायालयाने रक्कम एक लाखरूपयाच्या रोख जामिनावर जामीन मंजूर केला.

या अटींवर रियाचां जामीन केला मंजूर :- न्यायालयाचे आदेशा प्रमाणे रियाला मुंबई सोडून बाहेर जाता येणार नाही. रियाचां पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे सांगून न्यायालयाचे आदेशात नमूद विशिष्ठ तारखांना पोलिस ठाण्यात हजेरी देणे रियावर बंधनकारक राहील. या अटींवर रीयाचा जामीन अर्ज मंजूर करून रियाला जामिनावर मुक्त करण्यात आले आहे. रियासोबत इतर सह आरोपींचा जामीन अर्ज देखील न्यायालयाने मंजूर केला आहे.

रियाचां अर्ज मंजूर झालेने रियाला दिलासा मिळाला आहे. यावेळी रियाला पा-सपोर्ट जमा करण्याचे आदेशीत करण्यात आले असून रियाला मुंबई सोडून परदेश दौरा करणे शक्य नाही. तथापि रियाला मुंबईबाहेर जायचे असल्यास तशी माहिती तिला पोलीस ठाण्यात देऊन न्यायालयाचे पूर्वपरवानगी शिवाय कुठेही बाहेर जाता येणार नाही. रियाला न्यायालयाचे आदेशा पासून पुढील 10 दिवस सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात हजेरी देणे बंधनकारक राहील. तसे आदेश न्यालयाने केले आहेत.

दरम्यान रियाचां भाऊ शौविक चक्रवर्ती आणि परिवार यांना जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. रीयाचे वकिलांनी न्यायालयाचे निर्णयाचे स्वागत केले आहे. रियाचे वकील म्हणाले की अखेर सत्याचा विजय झाला. आम्ही सादर केलेले पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले. रियाचि कोठडी असमर्थनीय आणि कायद्याचे पलिकडे होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12