‘चल छैय्या छैय्या’ गाण्याच्या इतक्या वर्षांनंतर मलायकाने केला मोठा खुलासा, म्हणाली र-क्तबंबाळ झाले होते तरी शहारुख…

एका बॉलीवुड चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्या चित्रपटात शाहरुख खान मुख्य नायक होता. शाहरुख खानसोबत चित्रपटाचे एका गाण्याचे सीनचे शूटिंग सुरू असताना मलायका अरोराने तिच्या घाघराला दोरीने आपल्या कमरेला घट्ट बांधले होते. असे असून देखील यानंतरही ती र-क्ताने भिजलेली आढळली होती. जाणून घ्या संपूर्ण कथा, काय झाले होते नेमके त्यावेळी.
बॉलिवूडची आयटम गर्ल मलाइका अरोरा हिने एक मोठा खुलासा केला आहे. आपल्या सौंदर्य आणि तंदुरुस्तीने तरूण अभिनेत्रींना मात देणारी 45 वर्षीय अभिनेत्रीने तिच्या सर्वात सुपरहिट गाण्याच्या शूटिंगदरम्यान तिला र-क्ताने कसे भिजावे लागले होते हे सांगितले आणि त्यावेळी ती परिस्थिती बघून सेटवरील सर्व लोक कसे घाबरले होते त्याबद्दल मलायकाने मोठा खुलासा केला आहे. एक तर अगोदरच या गाण्याचे चालू ट्रेनवर शूटिंग केले होते.
दबंग, हाऊसफुल सारख्या बर्याच चित्रपटांत मलायकाच्या आयटम डान्समुळे ती बरीच चर्चेत असते. नेहमीच चर्चेत असणाऱ्या मलायकाच्या कारकीर्दीची सुरुवात 1998 मध्ये शाहरुख खानबरोबर ‘दिल से’ या चित्रपटाने झाली. यामध्ये मलायका शाहरुखबरोबर चलती ट्रेनवर एआर रहमानच्या संगीत व सुखविंदर सिंग आणि सपना अवस्थी यांच्या कडक आवाजात रेकॉर्ड केलेल्या ‘चल छैय्या-छैय्या’ या गाण्यावर शूट करणार होती.
मलायकाने स्कर्टला दोरीने घट्ट बांधले होते. एका अतिशय प्रसिद्ध डान्स टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये न्यायाधीशांची भूमिका साकारणार्या मलायकाने नृत्याशी संबंधित अनुभव सांगितले. मलायका सांगते, ‘चल छैय्या- छैय्या’ या गाण्याच्या शूटिंग दरम्यान मी बर्याचदा पडले होते. सुसाट वारा आणि हलणार्या ट्रेनवर मला डावीकडे व उजवीकडे होऊन झुकावे लागत होते व स्वतःला संतुलित ठेवावे लागत होते. अशा परिस्थितीत स्कर्ट घालून संतुलन राखणे खूप अवघड होते. मग टीमच्या काही लोकांनी घाघराला दोरीने माझ्या कमरेला घट्ट बांधलं होते.
कंबरवरून दोरी सोडताच कमरेवर दिसले होते कट :-
मलायका अरोरा म्हणाल्या, ‘दोरी बांधून मी शूटिंग तर चालू ठेवली होती. पण दोरी कंबरवरून सोडली गेली तेव्हा बर्याच ठिकाणी कट मार्क्स दिसून आले होते. त्यावेळी यामधून र-क्तस्त्राव सुरु झाला होता. हे घडलेले पाहून संपूर्ण युनिट घाबरले होते. माझ्या कंबरेवर असे कट व र-क्तस्त्राव पाहून बरेच लोक अस्वस्थ झाले होते.
ते गाणे म्हणजे ‘चल छैय्या- छैय्या’ :-
या गाण्यासाठी मलायका अरोराच्या मेहनतीने रंग आणला होता. गुलजार यांनी संगीतबद्ध केलेले आणि ए.आर. रहमान यांचे संगीत असलेले हे गाणे अजूनही सर्वात शक्तिशाली आयटम साँगच्या श्रेणीमध्ये ठेवले जात आहे. हे गाणे फराह खान यांनी कोरिओग्राफ केले होते. दिग्दर्शक मणिरत्नम यांची चालू ट्रेनवर गाणे चित्रित करण्याची कल्पना होती.