लग्नाच्या 47 वर्षानंतर पहिल्यांदा अमिताभजींनी केला खुलासा, म्हणाले या एका चुकीमुळे घरच्यांनी

असं म्हटलं जातं की तुम्हाला कुणाबद्दल मनापासून प्रेम झालं तर माणूस त्या माणसाच्या कुठल्याही प्रकारचा कमीपणा बघत नाही. समोरचा काळा असो किंवा गोरा, उंच असो किंवा बुटका, लहान असो किंवा मोठा, प्रेम हे प्रेम असतं कुणावरही होऊ शकते.

बॉलीवूड चे बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बहादुरी म्हणजेच जया बच्चन यांचे देखील असेच आहे. अमिताभ बच्चन यांची उंची आहे ‘सहा फूट एक इंच’ तर, त्यांची पत्नी जया बच्चन यांची उंची आहे ‘पाच फुट दोन इंच’. त्यांच्या प्रेमाबद्दल दाखले देण्याची काही गरज नाही आहे. कारण लग्ना नंतर सत्तेचाळीस वर्षापर्यंत त्यांचा संसार सुखाने सुरू आहे.

परंतु जरी त्यांचा संसार आज आपल्याला सुखात दिसत असला तरी त्यांच्या संसारात बऱ्याच मोठं मोठ्या अडचणी येत गेल्या. परंतु जया बच्चन यांनी कधीही धीर सोडला नाही. अमिताभजी आणि जया यांचे लग्नाबद्दल बोलायच झाल तर त्यांचं लग्न अस प्लॅनिंग करून झालेलं नाही. त्यांचं लग्न करून टाकण्याचा निर्णय इतका झटपट घेण्यात आला की कुणालाच काही कळायला जागा नव्हती. तर चला आज बघुयात की असे काय घडले होते की त्यांना पटापट लग्न करावें लागले.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वेडिंग एनिवर्सरी ला लग्न मंडपातील काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहे. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन जया बच्चन त्यांच्या कपाळाला कुंकू लावताना दिसतात. तर एका फोटोत हात जोडून पूजेमध्ये मग्न झालेले अमिताभ दिसतात. अमिताभ बच्चन यांच्या लग्नातील हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत.

दरम्यान अमिताभ बच्चन यांनी आपल्या लग्नातील एक सिक्रेट आपल्या चाहत्यांना सांगितले आहे. सिक्रेट असे होते की अमिताभ यांनी जया सोबत लवकर का लग्न केले. त्यावेळी असे काय घडले होते की त्यांना पटापट लग्न करावा लागले.

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर फोटो टाकले त्यावेळी त्याच्या कॅप्शन मध्ये असे लिहिले होते –

“आज माझ्या लग्नाला 47 वर्षे पूर्ण होत आहेत. 3 जून 1973 आम्ही असं ठरवलं होतं की, जर ‘जंजीर’ हा चित्रपट हिट ठरला तर आपण सगळ्या मित्रांसोबत लंडनला जायचं. माझ्या वडिलांनी मला विचारलं, की तू लंडनला कोणाबरोबर जात आहे?

जेव्हा मी त्यांना त्या व्यक्तीचे नाव सांगितले की व्यक्ती माझ्यासोबत असणार होती. नाव सांगितले नंतर त्यांनी मला म्हटले की, तुला जर तिच्या सोबत लंडन ला जायचं असेल तर तुला अगोदर तिच्याशी लग्न करावे लागेल. नाहीतर तू लंडनला जाऊ नकोस. या गोष्टीमुळे मला त्यांचे ऐकावे लागले”

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर हे फोटोज अपलोड केली त्यावेळी त्यांच्यावर कमेंट चा वर्षाव झाला. त्याच बरोबर चित्रपट सृष्टीतील दुसऱ्या कलाकारांनी देखील कमेंट द्वारे अमिताभ बच्चन यांचे अभिनंदन केले.

अभिनेता मनिष पॉल असे लिहितात की अमिताभ बच्चन सर आणि मॅडम तुम्हाला तुमच्या लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अजून ‘शमिता शेट्टी’, ‘ईशा देओल’, ‘बिपाशा बासू’, ‘अहना कुमार’, आणि ‘उषा जाधव’ यांसारख्या मोठ्या कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन या दोघांची जोडी बॉलीवूड मध्ये खूपच फेमस होती त्यांनी एकमेकांबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते एकमेकांबरोबर ‘जंजीर’, ‘अभिमान’, ‘चुपके चुपके’, ‘शोले’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ते एकत्र काम करताना दिसले.

लॉकडाऊनमुळे अमिताभ बच्चन आपला पूर्ण वेळ परिवारासोबत घालवत आहेत. त्यांचा ‘गुलाबो सिताबो’ हा अंशुमान खुराणा सोबत साकारलेला चित्रपट देखील ओ.टी.टी. प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12