तारक मेहता मध्ये 12 वर्षापासून काम करणाऱ्या या कलाकाराने सोडला शो, नाव वाचून चकित व्हाल…

तारक मेहताचा उलटा चष्मा या शोमध्ये मध्ये गेल्या 12 वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करीत आलेली एक कलाकार हा शो सोडून जात असल्याची माहिती मिळून आलेली आहेत. या शोला लोकांचे भरभरून खूप प्रेम मिळालं आहे. आता शोच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. शोमध्ये एक मेन कलाकार शो सोडून जात असल्याची बातमी आहे.
स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, त्या कलाकाराने तिचा निर्णय शोच्या निर्मात्यांसमोर उघड केला आहे. निर्माते तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत आहेत जेणेकरून ती या शो मध्ये थांबेल. पण रिपोर्टनुसार तीला एक मोठा प्रकल्प मिळाला आहे आणि म्हणूनच ती ‘तारक मेहताचा उलटा चष्मा’ सोडत असल्याचे सूत्रांनी सांगितले. शो व्यतिरिक्त वेगळ आणखी काहीतरी करण्याची इच्छा त्या कलाकाराची आहे.
आपण आज ज्या कलाकारा बद्धल बोलत आहोत तीच नाव या शो मध्ये अंजली म्हणून आहे. तर तीच खर नाव आहे नेहा मेहता. तीने या शोमध्ये 12 वर्ष चांगले काम करून लोकांचे मनोरंजन केले आहेत. आता ती हा शो सोडून जात असल्याची बातमी आल्याने चाहत्यांना देखील खूप वाईट वाटत आहे. माहितीनुसार असे समजते की तिला दुसऱ्या क्षेत्रात करीयर करावयाचे असल्याने तीने हा मोठा निर्णय घेतला आहे.
म्हणून नेहा मेहताने सोडला तारक मेहताचा शो :-
स्पॉटबॉयने सांगितले वरून असे समजते की नेहा मेहता यांनी हा शो सोडला आहे. नेहाने निर्मात्यांना सांगितले आहे की ती सेटवर येऊ शकत नाही. यापुढे नेहा शोमध्ये दिसणार नाही. नेहाने यापूर्वीच शोच्या मेकर्सना याबद्दल सांगितले होते. तथापि, नेहा ला शो मध्ये ठेवण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील होते. पण अभिनेत्रीने तिच्या करिअरसाठी काही वेगळ्या योजना आखल्या आहेत आणि म्हणूनच तीने तारक मेहताचा उलटा चष्मा सोडला आहे.
त्याचबरोबर, नेहाला आणखी एक प्रोजेक्ट मिळाल्याच्या बातम्याही येत आहेत आणि लवकरच ती तिचे शुटिंग लवकरच सुरू करणार आहे. हे सर्वांना माहित आहे की 28 जुलै रोजी तारक मेहताचे शो ला 12 वर्षे पूर्ण झाले आहेत. अंजलीची भूमिका साकारणारी नेहा मेहता सुरुवातीपासूनच या शोमध्ये आहे. या मालिकेत ती तारक मेहता यांची पत्नी अंजलीच्या भूमिकेत होती. शोमध्ये तीच्या डाएटची बरीच चर्चा होती.
शोबद्दल बोलायच झाल तर लॉकडाऊन दरम्यान शोचे शूटिंग थांबविण्यात आले होते. लॉकडाउननंतर जेव्हा या कार्यक्रमाचे शूटिंग सुरू झाले तेव्हा चाहत्यांना या कॉमेडी शोचे प्रेम मिळू लागले. प्रत्येकजण या शो ची पुन्हा आतुरतेने वाट बघत होते. ही सिरियल टॉप टीआरपी रेटिंग्ज साठी प्रसिद्ध आहेत. जेठालालच्या भूमिकेला देखील चाहत्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहेत. त्यांनी देखील चाहत्यांचे खूप मनोरंजन केले.
अहवालात असेही म्हटले आहे की नेहा मेहताची तिच्या कारकीर्दीसाठी वेगळी योजना आहे, म्हणूनच आता तिने ‘तारक मेहता ‘ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नेहा मेहता गेल्या 12 वर्षांपासून ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ मध्ये श्रीमती तारकची भूमिका साकारत होती. तीच्या अभिनयाने प्रेक्षकही प्रभावित झाले आहेत. अशा परिस्थितीत तीचे शोमधून अचानक निघून जाणे प्रेक्षकांना खूप त्रास दायक ठरत आहे. मात्र, नेहा मेहतांकडून शो सोडण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
नेहा मेहताने टीव्ही व्यतिरिक्त इतर चित्रपटांमध्येही काम केले आहे :-
नेहा मेहताने 2001 मध्ये टीव्ही शो ‘डॉलर बहु’ पासून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. ती बर्याच मालिकांमध्ये दिसली, पण ‘तारक मेहता ‘ ने तिच्या करियरची दिशा बदलली. नेहाने गुजराती आणि तेलगू चित्रपटांमध्ये तसेच संजय दत्त अभिनीत ‘ईएमआय’ मध्ये काम केले होते, जो 2008, मध्ये प्रदर्शित झाला होता.