एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर आलीय वाईट वेळ, अ‍ॅक्टींगची ऑफर नसल्याने नाईलाजाने करावं लागतेय ‘हे’ काम…

एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर आलीय वाईट वेळ, अ‍ॅक्टींगची ऑफर नसल्याने नाईलाजाने करावं लागतेय ‘हे’ काम…

‘क्‍योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कुसुम’ सारख्या मालिकांनी त्यावेळी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. देशातील महिलावर्गाला या मालिकांनी पुर्णपणे वेडलावलं होत असे म्हणल तरी चुकीच ठरणार नाही. या मालिकेसोबत, त्यातील भूमिका साकारणारे कलाकार देखील चांगलेच लोकप्रिय ठरले.

आजही या मालिकेतील कलाकारांचा चाहतावर्ग पाहायला मिळतो. अस असलं तरीही, मालिकेमधू नावारूपास आलेले अनेक कलाकार आज कुठे आहेत याबद्दल कोणालाच ठाऊक नाही. अशाच कलाकारांपैकी एक अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रीने अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या.

परंतु आज काम नसल्यामुळे तिची अत्यंत वाईट अवस्था पाहायला मिळत आहे. बेपनाह प्यार मालिकेत झलकलेली अभिनेत्री एकता शर्मा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या एकता शर्मा तिच्या आईसोबत मुंबईत भाड्याच्या घरात राहत आहे. एकताने सांगितले की, को’रो’ना महा मारी आल्यानंतर तिचे वाईट दिवस सुरू झाले होते.

ती शेवटची ‘बेपनाह प्यार’ या मालिकेत दिसली होती. हा शो 2020 मध्ये संपला. टीव्ही अभिनेत्री एकता शर्मा बऱ्याच काळापासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. गेल्या काही वर्षांत मी माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. एक काळ असा होता की एकताकडे काम नव्हते. यावेळी त्यांनी घर चालवण्यासाठी कॉल सेंटरमध्ये कामही केले.

मुलाखतीत एकता शर्मा म्हणते, ‘मला अभिनयाच्या ऑफर्स मिळत नव्हत्या. मी खूप संघर्ष केला. मी घरी बसून वाट पाहत होते की मला काही चांगली संधी मिळेल का? मला माझे काम आवडते आणि मला अभिनय क्षेत्रात पुन्हा पदार्पण करायचे आहे. मी सतत लुक टेस्ट आणि ऑडिशन देत असतो.

मला आशा आहे की लवकरच काहीतरी होईल.’ एकता सध्या तिच्या प्रोफेशनलच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यात देखील अनेक अडचणींचा सामना करत आहे. एकता सध्या तिच्या आठ वर्षांच्या मुलीच्या ताब्यासाठी न्यायालयात लढा देत आहे. रिपोर्ट्सनुसार, एकताने 2009 मध्ये अनिल दोंदे नावाच्या व्यावसायिकाशी लग्न केले होते.

2014 मध्ये त्यांना मुलगी झाली. परंतु काहीच दिवसांत त्यांच्यामध्ये गोष्टी खराब होत गेल्या आणि ते वेगळे झाले. अभिनयात काम नसल्यामुळे एकता शर्माला कॉल सेंटरमध्ये जावे लागले. याबाबत ती म्हणाली, ‘कॉल सेंटरमध्ये काम करणे ही वाईट गोष्ट नाही. मी माझी सेल्फ रिस्पेक्ट न विकता हे काम केले. कोणतेही काम लहान-मोठे नसते.

दोन दशके टीव्हीमध्ये काम करूनही आज मला काम मिळत नाही हे खूप वाईट आहे.’ ती पुढे म्हणाली, ‘मी माझ्या दिवंगत वडिलांची आभारी आहे, ज्यांनी मला अभिनयात जाण्यापूर्वी माझे ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यास सांगितले. त्यांच्या सल्ल्याने मी माझे शिक्षण पूर्ण केले.

आज मी पैसे कमवून उदरनिर्वाह करत आहे. मला माझ्या ऑफिसमधील अनेकांनी मदत केली आणि करत आहेत. पण इंडस्ट्रीमधून कोणी माझी साधी विचारपूस देखील केली नाही याच मला दुःख आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्री खूप जास्त मतलबी आहे.’

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.