प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री ची ही मुलगी दिसतेय इतकी स्टायलिश, स्टार किड्स सारा देखील हीच्यापुढे दिसेल फिक्की….

बॉलीवुड इंडस्ट्री मध्ये स्टार किड्सची खूपच चर्चा असते. असे बरेच स्टार किड्स आहेत त्यांनी चित्रपटसृष्टीत पाय ठेवलाही आहे, आणि ते स्वतःचे नाव देखील कमवत आहेत.
आपण अशाच प्रकारचा एका स्टार किड्स विषयी माहिती घेऊयात…
‘मैने प्यार किया’ या चित्रपटाद्वारे सलमान बरोबर थिरकणारी भाग्यश्री माहितीच असेल. भाग्यश्रीला दोन मुले आहेत, अभिमन्यू आणि अवंतिका. भाग्यश्री ची मुलगी अवंतिका दस्सानी सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव असते. ती आपले निरनिराळे फोटो आपल्या चाहत्यांना शेअर करत असते. तिचे फोटो व्हायरल ही तितक्याच जोरात होतात. भाग्यश्री ची मुलगी अवंतिकाला काही तुरळक ठिकाणी पाहिले गेले आहे.
पण सोशल मीडियावर तिचा वावर जरा जास्तच असतो. लाइमलाईट पासून दूर राहणारी अवंतिका दसानी पंचवीस वर्षाची झाली आहे. अवंतिका दिसायला खूपच सुंदर आहे. अवंतिकाने लंडनचा कास बिझनेस स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तिथून बिजनेस आणि मार्केटिंग या क्षेत्राची डिग्री घेतली आहे. अवंतिका सोशल मीडियाद्वारे आपले फोटोज आणि व्हीडिओज शेअर करत असते.
सोशल मीडियावर शेयर केलेल्या फोटोस वरून असे समजते की, अवंतिका ला ट्रॅव्हलिंग, डान्सिंग, पार्टी करणे इत्यादी गोष्टींची आवड आहे. असेही कळते की तिला समाजकार्य करायला आवडते कारण तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर मुलांना शिकवताना ची आणि इतर समाज कार्य केल्याचे बरेचसे फोटो टाकलेले आहेत.
अवंतिका ची आई भाग्यश्रीने सलमान सारख्या मोठ्या स्टार बरोबर बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली ते 1989 मध्ये ती सलमान बरोबर मैने प्यार किया मध्ये सक्सेस फुल एन्ट्री मारल्यानंतर तिने काही चित्रपटात काम केले आणि हिमालय दसानी यांच्यासोबत लग्न केले. त्यानंतर भाग्यश्रीने आपली मुले अवंतिका आणि अभिमन्यू यांच्या संगोपनासाठी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. आता चित्रपटांद्वारे न दिसणारी भाग्यश्री सोशल मीडियावर मात्र मुली इतकीच ऍक्टिव्ह असते. बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याच्या अगोदर भाग्यश्रीने टीव्हीवरील सिरीयल मध्ये काम केले होते, सिरीयल चे नाव होते ‘कच्ची धूप’ जी 1987 झाली प्रदर्शित झाली होती.
पण त्यानंतर सलमानबरोबर केलेल्या ‘मैने प्यार किया’ चित्रपटाद्वारे केलेल्या एन्ट्री मुळे तिला एक वेगळीच लोकप्रियता मिळाली. ‘मैने प्यार किया’ हा त्या वेळेचा खूपच हिट चित्रपट म्हणून ओळखला जात होता. भाग्यश्री चा मुलगा अभिमन्यू त्यानेही बॉलीवुडमध्ये एन्ट्री केली ‘मर्द को दर्द नही होता’ या चित्रपटाद्वारे तिने चित्रपटसृष्टीत उडी घेतली. भाग्यश्री इतकी चर्चेत नसली तरी, भाग्यश्री ची मुलगी अवंतिका तिच्या बोल्डनेस मुळे खूपच चर्चेत असते.
सलमान खान आपल्या चित्रपटाद्वारे स्टार किड्स लॉन्च करत असतो. त्याने आत्ताच आलेल्या दबंग3 मध्ये महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर हिला लॉन्च केले होते. यामध्ये ती सलमानबरोबर काम करताना दिसली. अशाच प्रकारे सलमान आता भाग्यश्री ची मुलगी अवंतिका ला आपल्या चित्रपटांद्वारे लॉन्च करणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार असे सांगितले जाते की सलमान खान आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनर द्वारे भाग्यश्री ची मुलगी अवंतिका ला लॉन्च करणार आहेत. अवंतिका बद्दल अशीही चर्चा केली जात होती की, अवंतिका म्युझिक डायरेक्टर अनु मलिक यांचा भाचा ‘अरमान मलिक’ यांच्यासोबत डेटिंगवर गेली होती. लोक अवंतिका च्या सोशल मीडियाद्वारे टाकण्यात आलेल्या फोटोवर कमेंट करतात कि अवंतिका तिच्या आईची कॉपी आहे.