बाब्बो..! विराट कोहली आणि धोनीपेक्षाही श्रीमंत आहे ‘हा’ भारतीय क्रिकेटपटू…संपत्ती एवढी की बघून डोळे होतील पांढरे..

क्रिकेट हा असा खेळ आहे की ज्यामध्ये सर्व भारतीय लोक हे जात, धर्म, पंथ, विसरून एकत्र येत असतात. क्रिकेट मुळे सर्व वाद हे कमी होत असतात. यामध्ये जर भारत आणि पा’कि’स्तान यांची जर मॅच असेल तर रस्त्यावर क’र्फ्यू लागल्याप्रमाणे असते.
अनेक प्रेक्षक हे भारत पा’किस्तानची मॅच कधी सुरू होते, याची वाट पाहत असतात. मात्र, भारत-पा’किस्तान यांचे संबंध गेल्या अनेक वर्षापासून ताणलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही देशात क्रिकेट सामने ही होत नाहीत. वर्ल्डकप किंवा बाहेर देशात एखादी सिरीज असली तरच या दोन देशात सामने झाल्याचे पहायला मिळतात.
मात्र, दोन्ही देश अंतर्गत क्रिकेट कधीही खेळत नाहीत. क्रिकेटमध्ये असे दिग्गज खेळाडू होऊन गेलेले आहेत की, ज्यांनी आपल्या फलंदाजी गोलंदाजीने सर्वांना मोहित करून टाकले आहे. याच प्रमाणे क्रिकेटमधून क्रिकेटपटूंना पैसा तर मिळालाच. मात्र, प्रसिद्धी देखील मोठ्या प्रमाणात मिळाली. क्रिकेटपटूंना जगभरात लोक ओळखत असतात.
सर्वात आधी क्रिकेट मधून पैसा कसा मिळवायचा आणि त्यातूनही जाहिरातीतून कसा पैसा मिळवायचा याचे उदाहरण सुनील गावस्कर यांनी जगासमोर आणले होते. सुनील गावस्कर यांनी सुरुवातीला जाहिरात केली होती. त्यानंतर कपिलदेव देखील मागे राहिला नाही. कपिल यांनी देखील जाहिरात केली. त्यानंतर या क्रिकेटपटूंना जाहिरातीतून पैसा मिळाला.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर याने खऱ्या अर्थाने जाहिरातीतून पैसा कसा कमवायचा हे जगाला दाखवून दिले. त्यानंतर अनेक क्रिकेटपटू हे जाहिरातीतून पैसा कमावू लावले. आता तर धोनी आणि विराट कोहली यांनी कोट्यवधी रुपये जाहिरातीतून कमावलेली आहेत. या खेळाडूचे ब्रँडनेम अधिक मोठी आहे.
एक जाहिरात करण्यासाठी हे खेळाडू एखाद्या कंपनीसोबत जवळपास शंभर कोटीचा करार करत असतात. क्रिकेट खेळताना बीसीसीआयकडून या खेळाडूंना मार्गदर्शन मिळत असते. मात्र, जाहिरातीतून यांचे उत्पन्न हे अधिक असते. या कामासाठी ते आपले खाजगी सचिव देखील ठेवत असतात.
काही क्रिकेटपटू या पैशातील रक्कम ही समाजसेवेसाठी देखील वापरत असतात. पण आज आम्ही आपल्याला एका खेळाडू बद्दल माहिती देणार आहोत. हा खेळाडू विराट कोहली आणि धोनी यांच्यापेक्षा देखील अधिक पैसे कमावतो. या क्रिकेटपटुचे नाव ‘आर्यमान बिर्ला’ असे आहे. तो प्रख्यात उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आहे.
आर्यमान हा आयपीएल 2018 मध्ये सहभागी झाला होता. यामध्ये त्याने राजस्थान रॉयल्स कडून सहभाग घेतला होता. आर्यमान हा मध्यप्रदेश कडून रणजी सामने खेळलेला आहे. आर्यमन याचे वडील कुमार मंगलम बिर्ला यांच्याकडे जवळपास 70 हजार कोटींची संपत्ती आहे. त्यामुळे हा क्रिकेटपटू सर्वाधिक श्रीमंत आहे, असे म्हणावे लागेल.
आर्यमान ला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती आणि आपला छंद पूर्ण करण्यासाठी त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अगदी लहान वयातच क्रिकेटचे प्रशिक्षण घेऊन त्याने बारकावे शिकले. आर्यमान रणजी करंडक स्पर्धेत मध्यप्रदेश संघाचा देखील एक भाग होता, सध्या आर्यमान व्यक्तीक समस्यांमुळे क्रिकेटपासून दूर आहे. असे सांगितले जात आहे की, आरोग्याच्या कारणास्तव अरमानने क्रिकेट पासून अंतर ठेवले आहे सध्या तो त्याच्या आरोग्याकडे लक्ष देण्यात पूर्णवेळ देत आहे..