वडिलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न मुलीने केले पूर्ण, पहा गरीब घरची मुलगी कशी बनली IAS…उंचावली वडिलांची मान..

अस काही नाही की फक्त मुलगाच वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकतो, एकदा मुलींना पण संधी देऊन बघा, त्या संधीच सोन केल्याशिवाय मुली पण माघार घेत नाही. आपल्या देशभरात बऱ्याच अशा मुली आहेत की त्यांनी त्यांचे वडिलांचे नाव रोशन जगभरात रोशन केले आहेत. अशा अनेक मुली आहेत जिथे मुलींनी अभिमानाने आपल्या पालकांचे मान उंचावली आहेत. आज आम्ही तुम्हाला अश्याच एका मुलीबद्दल सांगणार आहोत. ही आहेत साक्षीची कहाणी. की जी उत्तर प्रदेशच्या रॉबर्टगंजची रहिवासी आहे. वडिलांचं अधुरे स्वप्न पूर्ण करत साक्षी 2018 मध्ये चक्क झालीय आयएएस अधिकारी.
साक्षीने सांगितले की ती सुरुवातीपासूनच अभ्यासात चांगली आहे आणि तिने रॉबर्ट्सगंजमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. हायस्कूलमध्ये 76 टक्के आणि इंटर मध्ये .81.4 टक्के गुण मिळवून तिने आपल्या शाळेचे नाव देखील प्रकाशझोतात आणले होते. साक्षीने शासकीय महिला महाविद्यालयातून बीए पदवी मिळविली आहेत.
इंटर नंतर पासूनच तीने तीच्या मनाची तयारी केली होती. यूपीएससीच्या तयारीच्या प्रश्नावर साक्षीने सांगितले की, इंटर मध्ये 81 टक्के गुण मिळाल्यानंतर तीने यूपीएससीची तयारी करायचा निर्णय घेतला होता, परंतु रॉबर्ट्सगंज मधील स्पर्धा परीक्षांची तयारी चांगल्या स्त्रोतांच्या अभावामुळे तीने पदवी होईपर्यंत पर्यंत थांबायचे ठरवले.
वडिलांचे स्वप्न केले साकार : साक्षीने सांगितले की पदवीनंतर तिने दिल्लीला यायचे ठरवले. जेव्हा तिने आपल्या वडिलांना सांगितले की अभ्यास करून तिला आयएएस व्हायचं आहे तेव्हा तिच्या वडिलांनी साक्षीला खूप पाठिंबा दर्शविला. साक्षीचे वडील कृष्णा कुमार गर्ग एक व्यावसायिक असून आई रेणू गर्ग ही एक उत्तम गृहिणी आहे.
साक्षीने सांगितले की तिच्या वडिलांना आयएएस व्हायचे होते, परंतु काही कारणांमुळे ते त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकले नाही, त्यांनी साक्षीला नेहमीच यूपीएससी च्या तयारीसाठी फक्त मानसिकरित्या तयार केले नाही तर प्रत्येक वेळी तिचे समर्थन केले व सपोर्ट दिला. त्यामुळे सक्षीचा आत्मविश्वास अधिकच वाढला. साक्षीचे वडील कृष्णा कुमार गर्ग म्हणाले की, त्यांना स्वतः आयएएस व्हायचे होते, पण जेव्हा त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही तेव्हा त्यांनी मुलीला या दिशेने जाण्यासाठी प्रेरित केले. व साक्षी चांगला अभ्यास करून 2018 मध्ये आय ए एस बनली.