’70री पार केलेल्या अभिनेत्यांना पण हवी आहे 20-25 वयाची अभिनेत्री! त्या बहाण्याने त्यांचं तारुण्य…’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल..

’70री पार केलेल्या अभिनेत्यांना पण हवी आहे 20-25 वयाची अभिनेत्री! त्या बहाण्याने त्यांचं तारुण्य…’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल..

अभिनेत्रींचे करिअर फार फार ते पाच ते दहा वर्ष टिकते. हे वाक्य आपण अनेक वेळा ऐकलं आहे. बॉलिवूडमध्ये तर वारंवार हे बोलले जात. आपल्या करिअरच्या सुरुवातीला एखाद्या अल्लड मुलीच्या भूमिकेत झळकणाऱ्या अभिनेत्री काही वर्षानंतर मात्र केवळ सहकालाकाराची भूमिका साकारत असल्याचे चित्र आपण अनेक वेळा पाहिले आहे.

याबद्दल वारंवार बॉलीवूडमध्ये वाद रंगतच असतो. तरीही श्रीदेवी, काजोल, ऐश्वर्या राय, करीना कपूर आणि प्रियंका चोप्रा सारख्या अभिनेत्रींनी स्वतःला सिद्ध करत खूप मोठ्या प्रवास पूर्ण केला आहे आणि अजूनही अभिनेत्रींचा प्रवास सुरूच आहे. त्यामुळे आता बदलत्या काळासोबत अभिनेत्रींच्या करिअरच्या बाबतीत देखील बॉलीवूड बदललं असल्याचं अनेक जण म्हणतात.

परंतु यामध्ये कितपत तथ्य आहे? नुकताच एका अभिनेत्रीने यावर एक वा’दग्र’स्त विधान केलं आहे. ‘वय झालेल्या आणि म्हाताऱ्या पुरुष कलाकारांना देखील तरुण अभिनेत्री सोबतच काम करायचे आहे,’ असे म्हणत या अभिनेत्रीने चांगलीच खळबळ उडवली आहे. ही अभिनेत्री अजून कोणी नसून नीना गुप्ता आहेत.

स्पष्ट आणि परखड मत मांडत आपल्या बोल्डनेससाठी नीना गुप्ता कायमच चर्चेत असतात. त्या कायमच बॉलीवूडमधील चुकीच्या गोष्टींवरती बोट ठेवत त्या बदलल्या पाहिजेत याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. दरम्यान, काही वर्षांपासून नीना गुप्ता इंडस्ट्रीतून गायब झाल्या होत्या. 2017 मध्ये त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.

ज्यामुळे त्या सर्वात जास्त चर्चेत आल्या होत्या. ‘मी एक उत्तम अभिनेत्री आहे. मुंबईत राहते आणि चांगल्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याच्या शोधात आहे. परंतु तरुण अभिनेत्रींना म्हातारे करून दाखवले जाते. पण आमच्या वयाच्या अभिनेत्रींना आमच्या वयाची भूमिका साकारण्याची देखील संधी मिळत नाही.’ त्यानंतर त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या.

आणि 2018 मध्ये ‘बधाई हो’ या चित्रपटामधून त्यांनी दमदार कमबॅक केले. आता सध्या नेटफ्लिक्स वरती त्यांच्या मुलीवरती आधारित वेब सिरीज मसाबा मसाबाचा दुसरा सीजन प्रदर्शित झाला आहे. या सीझनची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. फॅशन डिझायनर मसाबा सोबत तिची आई आणि अभिनेत्री अर्थात नीना गुप्ता यांच्या बद्दल देखील शोमध्ये बरच काही दाखवण्यात आल आहे.

नवीन प्रोजेक्ट सुरू करत असताना चाहत्यांची डिमांड असून देखील नीना यांना प्रमुख भूमिकेत काम करण्यासाठी किती संघर्ष करावा लागत असल्याचं या सिरीज मध्ये दाखवण्यात आल आहे. त्याच पार्श्वभूमीवर एका मुलाखतीमध्ये नीना गुप्ता म्हणाल्या, पुरुष कलाकारांना त्यांच्यासोबत काम करायचे नाही आणि पुरुष अभिनेत्यांना केवळ त्यांच्यापेक्षा तरुण अभिनेत्री सोबतच काम करायचे आहे.

63 वर्षांच्या नीना गुप्ता एका मुलाखतीमध्ये म्हणाल्या, ‘असे दोन-तीन प्रोजेक्ट्स आहेत ज्यामध्ये मी माझ्या दिग्दर्शकाला विचारले की माझा सह अभिनेता कोण असणार आहे. त्यावर दिग्दर्शक मलाच प्रतिप्रश्न करतात तुम्हीच एखादा अभिनेता सुचवा. यावर मी म्हणते हे सर्वात कठीण काम आहे. माझ्याबरोबर कोणालाच काम करायचे नाही.

अभिनेत्यांना तरुण अभिनेत्री सोबतच काम करायचे आहे. प्रसंगी बघता मी त्यांच्यापेक्षा अजून देखील वयाने लहानच दिसते. परंतु आपला समाज अजून देखील बदललेला नाहीये. तुम्ही आणि मी अल्पसंख्यांकच आहोत. आपण पुरुषप्रधान समाजात राहतो आणि हा समाज नेहमी असाच राहणार आहे.’

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.