66 वर्षीय ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूने दुसऱ्यांदा केलं लग्न, २८ वर्षांनी लहान आहे पत्नी, आता हनीमूनसाठी आतुर..

प्रेम करणाऱ्याला वय असत पण प्रेमाला कधीच वय नसत. आपण अनेक वेळा पाहिलं आहे, आयुष्याच्या वाटेवर कोणत्या तरी खास वळणावर एक व्यक्ती आपल्याला भेटतो. आणि तो व्यक्ती कधी आपले संपूर्ण जग बनून जातो, हेच आपल्याला समजत नाही. त्यासाठी वयाची मर्यादा नसते.
म्हणून तर प्रेमाला कधीच वयाच्या चौकटीत बांधता येत नाही. अनेकांना आपल्या उतारवयात खास व्यक्तीची कमतरता जाणवते, किंवा एका खास व्यक्तीवर प्रेम होते. अशा अनेक प्रेमकथा आपण ऐकल्या आणि पहिल्या आहेत. या कथनकावर आधारित अनेक चित्रपट देखील जवळपास सर्वच भाषांमध्ये बनले आहेत.
या चित्रपटांना देखील संमिश्र प्रतिक्रिया मिळतात. परंतु खऱ्या प्रेमाला कशाचीच पर्वा नसते. आपल्याला लोक काय बोलतील, समाज या लग्नाकडे कोणत्या नजरेने बघेल या सगळ्या गोष्टीचा विचार खऱ्या प्रेमात बुडालेले व्यक्ती करत नाही. बिनधास्त जगापुढे येऊन आपल्या प्रेमाची ग्वाही देतात. हे सर्व आपण सिनेमात, कथेमध्ये पहिले आहे.
मात्र हेच सर्व एका दिग्ग्ज क्रिकेटपटूच्या बाबतीत घडलं आहे. कदाचित ही घटना केवळ एक बातमी म्हणूनच राहिली असती. पण ही प्रेमकथा थेट एका दिग्ग्ज क्रिकेटपटूची आहे. एक असा क्रिकेटपटू ज्याने. गावसकर, कपिल देव यांच्या खांद्याला खांदा लावत भारताकडून अनेक सामने खेळले आणि जिंकले सुद्धा.
हा क्रिकेटपटू आपल्या वयाच्या ६६व्या वर्षी पुन्हा नव्याने संसार थाटत आहे. त्यामुळे सहाजिकच चर्चा तर होणारच. सगळीकडेच या क्रिकेटरच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. अरुण लाल यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील मुरादाबाद येथे १९५५मध्ये झाला होता. ते पश्चिम बंगालसाठी क्रिकेट खेळत होते.
विशेष म्हणजे त्यांच्या लग्नात क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अधिकारी तसेच अनेक क्रिकेटपटू देखील हजेरी लावणार आहेत. 2016 साली अरुण लाल यांना क’र्करो’गाने ग्रासले होते. याच आ’जारामुळे त्यांनी समालोचन करणे सोडून दिले होते. परंतु त्यांनी क’र्करोगावर यशस्वीरीत्या मात केली आणि पुन्हा एकदा बंगालच्या क्रिकेट संघाला प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले.
आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी १६ कसोटी आणि १३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी ७२९ तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी १२२ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९८२ मध्ये इंग्लंडविरोधात खेळत त्यांनी पदार्पण केले होते. 1989साली वेस्टइंडीजच्या विरोधात त्यांनी आपला अखेरचा सामना खेळला होता.
अरुण लाल आता पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकले आहेत. ३८ वर्षांच्या बुलबुल साहा यांच्यासोबत ते नव्याने संसार थाटला आहे. २ मे रोजी ही जोडी लग्न बंधनात अडकली. त्यांची पहिली पत्नी सोबत कायदेशीररीत्या घ’टस्फो’ट घेतला आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून रीना यांची प्रकृती खालावली आहे. रीना यांच्याशी घटस्फो’ट घेतल्यानंतर आता अरुण लाल त्यांच्यापेक्षा २८ वर्षांनी लहान असलेल्या बुलबुलसोबत लग्न केले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, बुलबुल आणि अरुण मागील बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. हीच ओळख त्यांनी लग्नासारख्या घट्ट नात्यात बदलली आहे. अरुण लाल नव्या नवरीसोबत टर्कीला जाण्याची योजना बनवत आहेत. त्याआधी ते लवकरच दार्जिलिंग आणि कालिंपोंग येथे जातील. क्रिकेटपासून दूर राहून त्यांना आता वैवाहिक आयुष्यासाठी वेळ द्यायचा आहे.