48 वर्षाची गीता माँ ‘या’ तरुण मुलाला करतेय डेट, दोघांचे तसे फोटो व्हायरल झाल्यानंतर झाला खुलासा..

कुछ कुछ होता है या सिनेमामधले ‘तुझे याद ना मेरी आयी’ हे गाणं एकतर्फी प्रेमींच आवडीचं. गाण्याचं संगीत आणि बोल अगदी मनाला चटका लावून जातात, त्यामुळे हे गाणं आजही चाहत्यांच्या आवडीचं आहे. मात्र अजून एका कारणामुळे, या गाण्याला ओळखलं जात आणि ते म्हणजे या गाण्याची अभिनेत्री.

डान्स इंडिया डान्स या रियालिटी डान्स शोमधून प्रसिद्धी मिळवणारी गीता कपूर म्हणजेच गीता माँ, या गाण्यामध्ये बॅकग्राउंड डान्सर होती. काहीच क्षण ती या गाण्यामध्ये झळकली होती, मात्र तरीही तिने या गाण्यामधून आपली वेगळी अशी छाप सोडली होती. फराह खान सोबत तिची असिस्टंट म्हणून काम करणारी, गीता डान्स इंडिया डान्स या रियालिटी डान्स शोची जज बनली.

आणि इथूनच तिच्या करियरला नवे वळण मिळाले. या शोमधून तिन्ही जज, टेरेन्स, रेमो आणि गीता यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी डान्स करियरची सुरुवात करणाऱ्या, गीता कपूर यांना देखील याच शोमधून भरगोस प्रसिद्धी मिळाली आणि मग तिने माघे वळून पहिलेच नाही.

डान्स शोपुर्वी काही बॉलीवूडच्या गाण्यांमध्ये तिने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं होत. सोबत बॉलीवूडची प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक फराह खानसोबत अनेक वर्ष तिने असिस्टंट म्हणून काम केले. मात्र, डान्स इंडिया डान्स या शोने तिला भारताच्या घराघरात पोचवले. सध्या सुपर डान्सर चॅप्टर ४ या डान्स शोची गीता जज आहे.

करियरमध्ये भरगोस यश मिळवणारी गीता कपूर यांनी नुकताच ५ जुलै रोजी आपला ४८वा वाढदिवस साजरा केला. ४८ वर्षांची गीता अजूनही सिंगल आहे. काही दिवसांपूर्वी तिने आपला एक लाल ट्रेडिशनल कपड्यांतला फोटो शेअर केला होता. यामध्ये, ती नेहमीप्रमाणेच कमालीची सुंदर दिसत होती.

मात्र, या फोटोमध्ये तिने आपल्या केसांमध्ये, मांगेत भरलेल्या कुंकूने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. तेव्हा गीता मा म्हणजेच गीता कपूरने लग्न उरकून घेतले असल्याची बातमी सगळीकडे पसरत होती. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक राजीव खिंचीसोबत तिने लग्न केलं असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. अनेकवेळा त्या दोघांना सोबत लंच करताना, शॉपिंग करताना बघण्यात आलं होत.

त्यामुळे या दोघांमध्ये काही तरी सुरु आहे किंवा थेट हे दोघे आता प्रेमात पडले असल्याचे वृत्त देखील काही वाहिन्यांनी प्रदर्शित केले होते. मात्र, गीता कपूर यांनी लवकरच या अ’फवां’ना पूर्ण विराम देण्याच्या अनुषंगाने आम्ही केवळ उत्तम मित्र आहोत आणि आम्हा दोघांना देखील एकमेकांची कंपनी आवडते असे उत्तर दिले होते.

पण मग तिने सोळा शृंगार करत, विवाहित स्त्रीचा वेष का परिधान केला होता असे विचारल्यावर तिने सांगितले होते कि, एका गाण्याच्या शूटिंगसाठी तिचा हा लूक होता. तिला हा लूक आवडला आणि म्हणून तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले. गीता कपूर हे इंडस्ट्री मधलं एक मोठं नाव आहे.

तिने कुछ कुछ होता है, दिल तो पागल है, कभी ख़ुशी कभी गम, मोहब्बतें सारख्या मोठाल्या सिनेमामध्ये असिस्टंट कोरियोग्राफर म्हणून काम केलं आहे. त्याचबरोबर फीजा, अशोका, साथिया, हे बेबी, तीस मर खान या सिनेमामध्ये कोरियोग्राफर म्हणून काम केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12