42 वर्षांपासून वेगळे रहाणाऱ्या आ’ई वडीलांबद्धल काजोलने इतक्या दिवसानंतर केला खु’लासा, म्हणाली अजूनही त्यांच्यातील नाते…

42 वर्षांपासून वेगळे रहाणाऱ्या आ’ई वडीलांबद्धल काजोलने इतक्या दिवसानंतर केला खु’लासा, म्हणाली अजूनही त्यांच्यातील नाते…

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल या दिवसांत नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘त्रिभंगा’ या चित्रपटामुळे बरीच चर्चेत आहे. रेणुका शहाणे लिखित-दिग्दर्शित ‘त्रिभंग’ या सिनेमात एकाच घरातल्या तीन महिलांची कथा आहे. नयनतारा अनुराधा आणि माशा या तीन पिढ्यांतील तिघींनी त्यांच्या आयुष्यातील आव्हानांचा सामना कसा केला आणि त्याचा त्यांच्या कुटुंबावर झालेला परिणाम, असे या सिनेमाचे ढोबळ स्वरूप असले तरीही या कथेला अनेक पदर आहेत.

ही तिन्ही पात्रे तपशीलवार लिहिलेली असली तरी त्या तिघींचे दुःख आपल्यापर्यंत प्रभावीपणे पोहचत नाही. परिणामी आपण या तिघींचे आयुष्य विलक्षण तटस्थपणे ‘बोल’पटात ऐकत राहतो. चकमकीत आयुष्य जगणाऱ्या या स्त्रियांचा त्यांच्या आयुष्यातील पुरुष आणि परिस्थिती यांच्याबरोबर झालेला झ’गडा आपल्या मनाचा ठा’व घेत नाही.

त्यामुळे त्यांच्या अ’डचणी त्यांनी ओढवून घेतल्यासारख्या वाटत राहतात. अशी साधारण या चित्रपटाची क’हाणी आहे. पण या चित्रपटात काजोलच्या अभिनयामुळे तिची जोरदार प्रशंसा होत आहे. या चित्रपटात तीन महिलांची क’हाणी दर्शविली आहे. या चित्रपटात काजोल घ’टस्फो’टीत महिलेची मुलगी आणि बाल अ त्या’चा’रातून पी डि’त स्त्रीची भूमिका साकारत आहे.

त्याचबरोबर काजोलने या चित्रपटाविषयी दिलेल्या मुलाखतीत तिच्या आ’ई-वडिलांच्या वि’भक्तपणा विषयीही खुलेपणाने बोलले आहे. तिने सांगितले की, तिचे आईवडील वि’भक्त झाले तेव्हा ती साधारण साडेचार वर्षांची होती. काजोल आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बहनस्प्लेनिंगच्या लेटेस्ट एपिसोड मध्ये आली होती. या दरम्यान तिने सांगितले की ‘मला खूप चांगले पालनपोषण मिळाले आहे.

मी स्वतःला भाग्यवान समजते की मला असे दूरदृष्टी असलेले आ’ई वडील मिळाले. ज्यांनी मला आयुष्याबद्दल खूप काही शिकवले, मी जेव्हा लहान होतो तसेच जेव्हा मी वयात आली तेव्हा कसे राहायचे, दुसऱ्याशी कसे बोलायचे कसे वागायचे अशा छोट्या मोठ्या अनेक गोष्टी शिकवल्या.

कदाचित यामुळेच मी आज इथे पोहचले आहे असे काजोल म्हणाली. पुढे काजोल म्हणाली कि मी जेव्हा साडेचार वर्षांची होते तेव्हा माझे आईवडील विभक्त झाले. म्हणजे आज 42 वर्षांपासून ते विभक्त रहात आहे. आणि हे माझ्यासोबत त्याकाळी खूप चुकीचे झाले.

माझे बरेच मित्र आहेत ज्यांचे पालक आजपर्यत त्याच्यासोबत आहेत परंतु ते आज योग्य ठिकाणी नाही आहेत. त्यांना चांगले बालपण मिळाले नाही, पण माझे आई वडिल एकमेकांपासून दूर राहून सुद्धा खूप प्रे’म करत होते. ही बाब वेगळी आहे कि त्याच्यामध्ये होत असलेल्या वा’दामुळे त्यांनी वि’भक्त राहण्याचा विचार केला आणि कदाचित तो त्याकाळी योग्य सुद्धा होता.

आणि म्हणूनच कदाचित ते एकमेकांपासून दूर राहून माझ्यावर प्रे’म करत होते. अशा अनेक आठवणीना यावेळी काजोलने उजाळा दिला. तसेच या एपिसोडमध्ये रेणुका शहाणे यांनी देखील हजेरी लावली होती. त्यांनी देखील आपल्या आई वडिलांबद्दल उघडपणे सांगितले, रेणुका या आठ वर्षाच्या असताना त्यांचे आई वडील विभक्त झाले.

परंतु आई वडिलांच्या या निर्णयाचा त्यांच्यावर मोठा प’रिणाम झाल्याचे आज देखील पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात त्यांनी आपल्या या अनुभवाविषयी बोलताना आई वडील विभक्त झाल्यानंतर समाज त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला. त्यांच्याबरोबर मोठा भेदभाव केला गेल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लोक आपल्या मुलांबरोबर त्यांना खेळू देत नसल्याचा आपला अनुभव शहाणे यांनी यावेळी व्यक्त केला. याच्या 8 व्या वर्षी आई वडील विभक्त झाल्याचा मोठा परिणाम होण्याबरोबर आजही त्याचे कटू अनुभव आहेत. असं रेणुका यावेळी म्हणाल्या. अनेकजण त्यांच्या मुलांना आम्हाला बहीण भावंडांबरोबर खेळू देत नव्हेते.

ते तु’टलेल्या कुटुंबातील असल्याची टिप्पणी नागरिक त्यावेळी करत असतं. त्यांची मुलं आमच्याबरोबर खेळली तर त्यांचेही कुटुंब देखील तु’टेल अशी त्यांची भावना होती. त्यामुळे त्यावेळी याबाबत खूपच दुःख झाल्याचा अनुभव त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, रेणुका शहाणे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

त्यानंतर आता त्या दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाय ठेवत असून त्यांनी ‘त्रिभंगा’ या चित्रपटातून दिग्दर्शनाची सुरुवात केली. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या या चित्रपटामध्ये काजोलने ओडिसी डान्सरची भूमिका केली आहे. काजोलबरोबर या चित्रपटात तन्वी आजमी आणि मिथिला पालकर यांनी देखील मूख्य भूमिका साकारल्या आहेत.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x