3 सेकंदाच्या ‘या’ सिनमुळे एका रात्रीत सुपरस्टार झाली होती ऐश्वर्या रॉय, पुन्हा व्हायरल झाला तो Video….

ऐश्वर्या रायने 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. त्यानंतर केवळ देशातच नाही तर जगभरात ऐश्वर्याने आपल्या सौंदर्याच्या बळावर मोठा चाहता वर्ग कमावला. त्यावेळी सगळीकडेच तिच्या सौंदर्याच्या चर्चा सुरू होत्या. खरं बघता मिस वर्ल्डचा किताब जिंकण्यापूर्वीच ऐश्वर्याने सर्वांना स्वतःकडे आकर्षित केलं होतं.
तिच्या मन जिंकून घेणाऱ्या स्माईलने सर्वांना अक्षरशः भुरळ घातली होती. ऐश्वर्या लवकरच 30 सप्टेंबरला रिलीज होणाऱ्या ‘द पोन्नियिन सेल्वन पार्ट 1’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्या दुहेरी भूमिकेत आहे. हा चित्रपट त्याच नावाच्या तमिळ कादंबरीवर आधारित आहे, जी 1950 च्या दशकात मालिका म्हणून प्रदर्शित झाली होती.
हा चित्रपट तामिळ, हिंदी, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आपल्यापैकी अनेकांना कदाचित ठाऊक नसावे पण मिस वर्ल्ड बनण्यापूर्वी पासूनच ऐश्वर्याने मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करत मोठं नाव कमवल होत. सौंदर्य स्पर्धेत प्रवेश करण्यापूर्वी, ऐश्वर्या 1993 मध्ये पेप्सीच्या जाहिरातीमध्ये दिसली, ज्यामध्ये आमिर खान आणि महिमा चौधरी देखील होते.
त्यावेळी ती जाहिरात चांगलीच लोकप्रिय ठरली. आणि आता पुन्हा एकदा सगळीकडे तीच जाहिरात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या जाहिरातीमध्ये ऐश्वर्याने केवळ काहीच सेकंद आपली झलक दाखवली. परंतु तिच्या त्या तीन सेकंद चार झलक नंतर संपूर्ण देशातील तरुणाई तिच्यावरती फिदा झाली.
या जाहिरातीमध्ये ऐश्वर्याचे नाव संजना आहे. ही जाहिरात प्रदर्शित झाल्यानंतर इतकी प्रसिद्ध झाली की अनेकांनी आपल्या मुलींचे नाव संजना ठेवले. व्हिडिओमध्ये आमिर खान त्याच्या घरी एकटाच बुद्धिबळ खेळताना दिसतो. तेवढयात त्याला त्याच्या दाराची बेल ऐकायला येते आणि त्याची सुंदर शेजारी महिमा चौधरी त्याच्याकडे येते.
महिमा त्यावेळी त्याच्याकडे पेप्सीची डिमांड करते. आमिरच्या घरातली पेप्सी त्यावेळी संपली. अस असताना दुसरे पेय चालेल का असं तो विचारतो. त्यावर महिमा पेप्सी नाही तर काहीच नको असं उत्तर देते आणि मग आमिर त्याला इम्प्रेस करण्यासाठी पावसात बाहेर पडतो. आमिर पेप्सीची बाटली मिळवण्यात यशस्वी होतो.
घरी परतल्यावर पुन्हा दारावरची बेल वाजते आणि महिमा म्हणते, ‘संजू असेल.’ यानंतर ऐश्वर्या आत आली आणि ती म्हणाली, ‘हॅलो, मी संजना आहे. अजून एक दुसरी पेप्सी मिळेल का?’ जाहिरातीत, ऐश्वर्याच्या जबरदस्त लुकने तिच्या अनेक चाहत्यांची मने जिंकली. एका वर्षानंतर, जेव्हा तिने मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतला तेव्हा अनेकांना हे समजले की ऐश्वर्या आधीच किती प्रसिद्ध आहे.
90 च्या दशकातील जाहिरातीवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने लिहिले, ‘ऐश्वर्याने 3 सेकंदात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.’ दुसर्या यूजरने लिहिले, ‘या सीनने तिला भारतात रातोरात प्रसिद्ध केले.’ संजना नावाच्या मुलीने लिहिले, ‘ही जाहिरात सांगते. अशा प्रकारे माझे नाव मिळाले.’