21 वर्षीच्या मुलाचा बाप असलेला ‘हा’ अभिनेता 30 वर्षीय ‘या’ हॉट अभिनेत्रीसोबत मालदीवमध्ये जाऊन करतोय मज्जा…

आता जग खूपच खुल्या विचारांच झालं आहे. अनेकवेळा आपल्याला वेगवेगळ्या, गोष्टींवरून हे समोर येते. अशा बऱ्याच गोष्टी होत्या, ज्या पूर्वी कोणीच कधीच मान्य नाही केल्या. पण आता त्या गोष्टीची स्तुती केली जाते. पण समाजाच्या चौकटीत न बसणाऱ्या गोष्टींबद्दल चर्चा तर होतेच. जग जरी पुढे गेले असले, तरीही काही नाते आणि त्यांच्या मर्यादा सांभाळणे महत्वाचे असते.
जेव्हा, नात्यामध्ये मर्यादा संपून जातात आणि ते नाते सर्वांच्या समोर येते, त्याबद्दलच अनेकजण आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात. असच काही अरबाज आणि मालयकाच्या नात्याच्या बाबतीत देखील घडले. अरबाज खान आणि मलायका अरोरा हे बॉलीवूडधील सर्वात पावरफुल कपलपैकी एक समजलं जात होत. त्या दोघांच्या जोडीचे, कित्येक चाहते होते.
एकमेकांना पूरक अशी त्या दोघांची जोडी समजली जात होती. पण अचानक त्यांच्या नात्यामध्ये काही दुरावा आल्याच्या बातम्या समोर आल्या. दोघांपैकी कोणीही याबद्दल उघडपणे बोलणे टाळले. मात्र काहीच दिवसात ते वेगळे झाल्याच्या आणि नंतर त्यांचा घटस्फो’ट झाल्याच्या बातम्या समोर आल्या. यामध्ये, मलायका आणि अर्जुन कपूरच्या नात्यामुळे त्या दोघांमध्ये दुरावा आला असं सांगितलं जात होत.
पण नक्की कोणत्या कारणामुळे, मलायका आणि अरबाज वेगळे झाले याचा खुलासा कोणीही केला नाही. अर्जुन कपूर, मालयकापेक्षा लहान आहे म्हणून ते नाते तसे कोणाला रुचणारे नव्हते. पण त्यांच्या बिनधास्त वागण्यामुळे, आणि एकमेकांच्या बद्दल असणाऱ्या प्रेमामुळं आज ते नातं सगळ्यानी स्वीकारले आहेच. तर दुसरीकडे आता अरबाज खानने देखील आपल्या गर्लफ्रेंडसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानीच्या नात्याची माघील बऱ्याच काळापासून चर्चा सुरु होती. आता त्या दोघांचा एक रोमँटिक फोटो, स्वतः अरबाज खानने आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. इतर बॉलीवूड सेलिब्रिटीज प्रमाणे, अरबाज खानने देखील मालदीवला हजेरी लगावली. आपली लॉन्ग टाईम गर्लफ्रेंड्स जॉर्जिया एंड्रियानी सोबत तो मालदीवला सुट्ट्याचा आनंद घेत आहे.
त्याने, जॉर्जिया एंड्रियानीसोबत दोन-तीन फोटोज शेअर केले आहेत. या फोटोमध्ये एका सुंदर अशा बीचवर, अरबाज आणि जॉर्जिया एंड्रियानी दोघांनी एकमेकांना मिठीत घेत फोटो शेअर केला आहे. यामध्ये अरबाजने ग्रे रंगाचा टी-शर्ट घातला आहे तर जॉर्जिया एंड्रियानीने पांढऱ्या रंगाचा नॉट टॉप आणि गुलाबी रंगाची शॉर्टस घातली आहे. त्याच्या या सर्वच फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
अनेकांनी त्यावर वेगवेगळे कमेंट्स देखील केले आहेत. ‘व्वा, हि तर खूपच सुंदर आहे,लग्न उरकून घे लवकर,’ असं नेटिझन्सने कमेंट केलं आहे. सोबतच,’अरबाज सर, जोडी शोभून दिसत आहे. सुंदर अशा रोमँटिक जागी, रोमँटिक फोटो,’ असं देखील कमेंट केले आहे. काही नेटकऱ्यानी जॉर्जिया एंड्रियानी आणि मालयकाची तुला केली आहे. पण अरबाज आणि जॉर्जिया एंड्रियानीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच वा’यरल होत आहेत.
