2 गिनीज बुक रेकॉर्ड! सतत फ्लॉप फिल्म्स देऊनही अभिषेक बच्चन आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक! वडील अमिताभ मुळे नाही तर बायकोमुळे….

2 गिनीज बुक रेकॉर्ड! सतत फ्लॉप फिल्म्स देऊनही अभिषेक बच्चन आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक! वडील अमिताभ मुळे नाही तर बायकोमुळे….

सुरुवतीपासूनच अभिषेक बच्चनच्या चित्रपटांना सतत फटका बसत होता आणि चित्रपटसृष्टीने त्याला ‘फ्लॉप हिरो’चा टॅग दिला होता. बॉलीवूडमध्ये बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांना सर्वात मोठा स्टार म्हणून ओळखल जात. बॉलीवूडमध्ये माघील कित्येक दशकांपासून अमिताभ बच्चन राज्य करत आहेत.

जगभरात त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. अमिताभ बच्चन यांची हटके स्टाईल, त्यांचा अंदाज आणि उत्कृष्ट अशी अभिनय शैली यामुळे त्यांनी अनेक दिग्गज अभिनेत्यांना माघे टाकत जगभरात आपली ओळख बनवली. संपूर्ण जगात अमिताभ बच्चन यांचे करोडो चाहते आहेत.

त्यामुळे सहाजिकच जेव्हा त्यांच्या मुलाने म्हणजेच अभिषेकने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले, तेव्हा त्याच्याकडून देखील सगळ्यांचा मोठ्या अपेक्षा होत्या. तसे बघता अभिषेक बच्चनचा अभिनय चांगलाच आहे. मात्र त्याचा अभिनय, प्रेक्षकांचा अपेक्षेत उतरला नाही.

त्यामुळे सुरुवातीपासूनच अभिषेकला टीकेचा सामना करावा लागला होता. त्याच्या अभिनयावर कायमच टीका होत होती. आणि अभिषेकला हवी तशी लोकप्रियता मिळवण्यात यश नाही आले. म्हणून तर अभिषेकला आपली वेगळी ओळख निर्माण कारण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला.

अभिषेक बच्चनला फ्लॉप अभिनेता मानणाऱ्यांना हे ठाऊक च नाही की त्याने अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. त्याच्या नावावर गिनीज रेकॉर्डही आहे. अभिषेक बच्चनने ‘गुरु’, ‘पा’, ‘युवा’, ‘सरकार’ आणि ‘रावण’ यांसारख्या चित्रपटांतून आपली अभिनय प्रतिभा दाखवली.

या चित्रपटांसाठी अभिषेक बच्चनला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता. अभिनयासाठी सलग तीन फिल्मफेअर पुरस्कार जिंकणारा अभिषेक बच्चन हा दिलीप कुमारनंतरचा दुसरा अभिनेता आहे. अभिषेक बच्चनच्या नावावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डही आहे.

अभिषेक बच्चन आणि त्याचे वडील अमिताभ बच्चन यांची नावे चित्रपटाच्या पडद्यावर विरुद्ध भूमिका साकारण्यासाठी गिनीज बुकमध्ये नोंदली गेली आहेत. खरे तर ‘पा’ मध्ये अभिषेकने त्याचे खऱ्या आयुष्यातील वडील अमिताभ यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

या चित्रपटात अमिताभ अभिषेकच्या मुलाच्या भूमिकेत होते. बॉलीवूडमध्ये किंवा साऊथ सिनेमात असं कधी घडलं नाही. अभिषेक बच्चनच्या नावावर आणखी एक गिनीज रेकॉर्ड आहे. तो त्याच्या ‘दिल्ली 6’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान 12 तासांत अनेक शहरांमध्ये सार्वजनिकपणे दिसला.

यासाठी अभिषेकचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. अभिषेक बच्चनकडे करोडोची संपत्ती आणि अप्रतिम कार कलेक्शन आहे, ज्याकडे अनेक आलिशान कार आहेत. ‘सीए नॉलेज’च्या रिपोर्टनुसार, 2022 मध्ये अभिषेक बच्चनची एकूण संपत्ती 203 कोटी रुपये होती.

अभिषेक सध्या फारसे चित्रपट करत नसला तरी याचा त्याच्या कमाईवर फारसा परिणाम झालेला नाही. तो चित्रपटांपेक्षा खेळात जास्त रस दाखवत आहे. अभिषेक बच्चन हा अभिनेता असण्यापेक्षा चांगला बिझनेसमन आहे. त्याच्याकडे सध्या दोन यशस्वी क्रीडा संघ आहेत. या संघांपैकी एक प्रो कबड्डी आहे, ज्याचे नाव पिंक पँथर्स आहे आणि दुसरा फुटबॉल संघ चेन्नईयिन एफसी आहे. या संघाने इंडियन सुपर लीग दोनदा जिंकली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12