15 वर्षाच्या सुखी संसारानंतर आमिर खानने दुसऱ्या पत्नीला दिला घ’टस्फो’ट; पण मुलांचा ताबा कुणाकडे ? दोघांमध्ये काय ठरलं..

15 वर्षाच्या सुखी संसारानंतर आमिर खानने दुसऱ्या पत्नीला दिला घ’टस्फो’ट; पण मुलांचा ताबा कुणाकडे ? दोघांमध्ये काय ठरलं..

मि. परफेक्ट म्हणून ओळखल्या जाणारा आमिर खान, आपल्या वैयक्तीक आयुष्यात मात्र चांगलाच इम्परफेक्ट असलेला बघायला मिळत आहे. बॉलीवूड मध्ये काम करताना आपल्या प्रत्येक पात्राशी एकरुप होऊन, भूमिका साकारणारा अभिनेता म्हणून आमिर खान, मि परफेक्ट म्हणून ओळखला जातो. त्यातूनच त्याला भरगोस असे यश आणि नावलौकिक मिळाला.

पण आता पुन्हा एकदा अमिरखान चर्चेत आला आहे कारण त्याने आपली पत्नी किरण राव सोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा वर्ष सुखाचा संसार केल्यानंतर आता या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे पण यांच्या निर्णय घेण्यामागे काय कारण होते या अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

बॉलिवूडमधील बहुचर्चित जोड्यांपैकी एक असलेल्या आमिर खान आणि किरण राव यांनी 15 वर्षांच्या सहजीवनानंतर घ’टस्फो’टाचा निर्णय घेतला आहे. या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. मात्र, आमिर खान आणि किरण राव यांनी आपण आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात करण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे म्हटले आहे. घ’टस्फो’ट हा म्हणजे शेवट नव्हे तर एका नव्या प्रवासाची सुरुवात असल्याचेही दोघांनीही सांगितले आहे.

एक आदर्श कपल म्हणून या जोडीकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन होता. पत्नी किरण रावमुले अमीरने महाराष्ट्रात पाणी फाउंडेशनची सुरुवात केली होती. तिच्या आग्रहाखातर त्याने यात सहभाग नोंदवला होता. आणि त्याने त्याचे काम पूर्ण देखील करून दाखवले. पण त्यांनी अचानक घटस्फोट घेतल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.

मात्र, या सगळ्यानंतर आमिर आणि किरण राव यांचा लहान मुलगा आझाद याचा ताबा कोणाकडे जाणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. परंतु, संयुक्त निवेदनात म्हटल्याप्रमाणे आमिर खान आणि किरण राव आझादचा संयुक्तपणे सांभाळ करणार आहेत. आझादचे संगोपन आणि पालनपोषण आम्ही एकत्रच करू, असे आमिर व किरण रावने म्हटले आहे.

“लगान सिनेमाच्या वेळी, किरण आणि आमिर अधिकच जवळ आले होते. त्यांच्यामधील प्रेम आणि जावळीक वाढली आणि त्यानंतर २००५ मध्ये दोघांनी लग्न केलं. त्या दोघांचे नाते अगदी परफेक्ट आहे असेच नेहमी दिसत होते. मात्र आता लग्नाच्या १५ वर्षांनी या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी घ’टस्फो’टाविषयी अधिकृत स्टेटमेंटही जारी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12