२ वर्षाची झाली अनुष्का विराटची लेक वामिका, पहा पहिल्यांदाच अनुष्काने दाखवली आपल्या लेकीची झलक…

सोशल मीडियामुळे जग जवळ आलं आहे. सुरुवातीच्या काळात एखादे वर्तमानपत्र किंवा मगझिनच्या माध्यमातून आपल्या आवडत्या सेलेब्रिटी बद्दल चाहत्यांना माहिती मिळत असे. मात्र आता सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सेलिब्रिटी सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात.
आपल्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहतेदेखील सोशल मीडिया वरती सेलिब्रिटींना फॉलो करत असतात. सोशल मीडियावर या सेलिब्रिटीजच्या भला मोठा चाहतावर्ग बघायला मिळतो. वेळोवेळी हे सेलिब्रिटीज आपले फोटोज किंवा व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांना खुश करत असतात.
अशाच काही खास सेलिब्रिटीज पैकी अनुष्का आणि विराट कोहली देखील आहेत. विराट आणि अनुष्काचे लग्न झाल्यापासूनच दोघे एकमेकांचे अनेक फोटोज आणि व्हीडिओज सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यापर्यंत पोहोचवत असतात. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या जोडप्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली दोघांनी आजवर अनेकांना कपल गोल्स दिले आहेत. दोघांनी एकमेकांमधील प्रेम आणि समजूतदारपणा यामधून त्यांच्या नात्याला अजूनच सुखदायक बनवला आहे. त्यामुळे जगभरातून त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्यांची मुलगी वामिकाची एक झलक पाहण्यासाठी चाहते खूप जास्त आतुर होते.
मात्र काही कारणास्तव सुरुवातीच्या काळात अनुष्का आणि विराटने आपल्या मुलीचे फोटो समोर येऊ दिले नाही. वामिकाच्या आगमनानंतर त्यांचे आयुष्य अधिकच सुंदर बनले असं अनेक वेळा दोघांनी देखील कबुली दिली आहे. नजर लागू नये म्हणून देखील, कित्येक महिने त्यांनी आपल्या लेकीचा फोटो मीडिया आणि सोशल मीडिया पासून लपवून ठेवला होता.
एकूणच काय तर विराट आणि अनुष्का दोघेही आपले लेकी वरती जीव ओवाळून टाकतात. वामिकाच्या बाबतीत विराट देखील खूपच जास्त सेन्सिटिव्ह आहे. वामिकाच्या संगोपनात कोणत्याच गोष्टीची कमतरता असू नये याकडे स्वतः विराट देखील लक्ष देतो. तर अनुष्काने देखील वामिकासाठी आपल्या करिअर मधून ब्रेक घेतला आहे.
मात्र आता वामिका देखील मोठी होत आहे. त्यामुळे अनुष्का देखील तिच्या करियरमध्ये पुन्हा एकदा सक्रिय होत आहे. तर दुसरीकडे विराटला देखील त्याचा हरवलेला फॉर्म पुन्हा गवसला आहे. सध्या विराटची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी त्याने लेकीसोबतचा समुद्रकिनाऱ्यावरचा एक फोटो शेअर केला होता.
हा फोटो शेअर होताच सगळीकडे आगीच्या वेगाने वायरल झाला. वामिकाची एक झलक पाहण्यासाठी चाहते कमालीचे आतुर आहेत. त्यातच आता आई अनुष्काने देखील आपल्या लाडक्या लेकीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो चाहत्यांना कमालीचा आवडला आहे. फोटो शेअर करण्यासाठी कारण देखील तसंच होत.
काल अर्थात ११ जानेवरीला वामिका २ वर्षाची झाली आहे. त्यामुळे अनुष्काने आपल्या लेकीसोबत हा अतिशय गोंडस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये माय-लेकीचं प्रेम दिसत आहे. ज्यांनी हा फोटो पाहिला त्यांच्या चेहऱ्यावर एक सुंदर अशी स्माईल येत आहे. हा फोटो अनेकांना खूप आवडला आहे. चाहत्यांनी यावर लाईक्सचा वर्षाव करत वामिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.