२० वर्षीय सैफने ३२ वर्षीय अमृताला एकट गाठून केला होता ‘किस’, मग पुढे रात्री जे झालं ते दोघांनीही अपेक्षित नव्हतं…

२० वर्षीय सैफने ३२ वर्षीय अमृताला एकट गाठून केला होता ‘किस’, मग पुढे रात्री जे झालं ते दोघांनीही अपेक्षित नव्हतं…

प्रेमाला कधी वय नसते हे आपण ऐकले आहे, ते सैफ अली खान याने मात्र दाखवून दिले होते. सैफ अली खान केवळ २० वर्षांचा होता जेव्हा तो अमृता सिंह हिच्या प्रेमात पडला. त्यावेळी अमृताचे वय ३२ वर्ष होते, म्हणजे ती सैफपेक्षा १२ वर्षांनी मोठी. पण प्रेमात काहीच नाही बघितले जात असे जे म्हणतात ना तेच सैफ अली खान याच्या बाबतीत झाले होते.

अमृता सिंह त्यावेळी, बॉलीवूड वर राज्य करत होती असे बोलेल तरी वावगे ठरणार नाही. १९८३ मध्ये सनी देओल सोबत बेताब सिनेमाद्वारे तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सिनेमामधून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिचे सौंदर्य आणि तिची ऍक्टिंग दोन्हीही सर्वांच्या पसंतीस उतरली.

त्यानंतर मर्द, साहेब, चमेली कि शादी, नाम, खुदगर्ज अश्या एकापाठोपाठ एक हिट सिनेमा तिने दिले. त्यामुळे तेव्हा ती लोकप्रियतेच्या यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचली. त्यावेळी, जवळपास सर्वच तरुणांच्या स्वप्नांची राणी अमृता च होती.

सैफ अली खान याचा सुरुवातीपासूनच अमृतावर क्रश होता. ज्यावेळी ते दोघे भेटले तेव्हा अमृता एक सिनियर आर्टिस्ट होती मात्र सैफचे अद्याप बॉलिवूड मध्ये पदार्पण देखील झाले नव्हते. राहुल रावल यांच्या ये ‘दिल्लगी’ सिनेमामधून सैफ बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होता. आणि याच सिनेमाच्या फोटोशूट च्या दरम्यान राहुल रावल यांनी सैफ व अमृता या दोघांना बोलवले होते.

आपली क्रश समोर आल्यानंतर जी अवस्था सर्व साधारण मुलांची होते अगदी तीच अवस्था सैफची देखील त्यावेळी झाली होती. अमृता बद्दल अजून जाणून घेण्यासाठी आणि तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी सैफ काही कारण शोधत होता. म्हणून त्याने तिला डिनर साठी बाहेर जायचे विचारले, मात्र अमृताने त्यास नकार दिला.

पण, अमृताच्या घरी जाऊन सोबत डिनर करू शकतो असेही ती बोलली. मग काय, सैफ ला फक्त तिच्या सोबत वेळ पाहिजे होता म्हणून त्याने लगेच होकार दिला आणि ते दोघे अमृताच्या घरी गेले.

घरी आल्यानंतर, अमृताने आपला मेकअप धुवून डिनर करण्यासाठी आली. सैफ ने प्रथमच अमृताला मेकअप शिवाय पहिले होते, आणि मेकअप न करता देखील अमृता इतकी सुंदर दिसते हे बघून तो तिच्या जवळपास प्रेमातच पडला. त्यानंतर दोघांनी सोबत डिनर केला आणि गप्पा मारायला सुरुवात केली.

त्यातच अमृता सैफ ला बोलली देखील होती कि तू विचार करत असशील कि आपल्या दोघात काही होऊ शकते तर, ते डोक्यातून काढून टाक असे काहीही होणार नाहीये. मात्र त्या दोघांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. यामध्ये ते दोघेही जवळ आले आणि त्यांनी कि’स केले. त्यानंतर मात्र दोघेही चपापले आणि वेगवेगळ्या रूममध्ये झोपायला गेले.

सकाळी सैफ उठला तेव्हा त्याने चक्क १०० रुपये अमृताकडे उधार माघीतले. शूटच्या वेळी त्याने वॉलेट आणले नव्हते असे कारण त्याने सांगितले. पैसे वापस करण्याच्या कारणामुळे, पुन्हा अमृताला भेटता येईल हा विचार देखील त्याच्या डोक्यात होता. त्यानंतर, सैफ आणि अमृता कोणत्या न कोणत्या कारणाने भेटतच राहिले आणि प्रेमात पडले. १९९१ मध्ये अचानकच एक दिवस या दोघांनी लग्नही केले मात्र, २००४ मध्ये त्या दोघांचा घ’टस्फो’ट झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12