१५ वर्षानंतर जेनेलियाच्या हाती लागला मोठा प्रोजेक्ट, ‘या’ चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये आमिरसोबत दिसणार..

तुझे मेरी काम हा सिनेमा २००३ साली प्रदर्शित झाला होता. रितेश देशमुखने या सिनेमातून बॉलीवूडमध्ये एंट्री घेतली. या सिनेमाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि चित्रपट सुपरहिट ठरला. या सिनेमाने मराठमोळ्या रितेश देशमुखला बॉलीवूडमध्ये एक नवी ओळख मिळवून दिली.
केवळ रितेशलाच नाही तर चित्रपटामधील अभिनेत्री जिनेलिया आणि श्रेया सरन यांचा देखील हा पहिलाच सिनेमा होता. आणि या सिनेमाच्या माध्यमातून जिनेलिया आणि श्रेया या दोघीना देखील एक नवी ओळख मिळाली. त्याच वर्षी जिनेलियाचा तामिळ सिनेमा बॉईज देखील प्रदर्शित झाला होता.
पहिल्याच वर्षी दोन सुपरहिट सिनेमा तिच्या नावे झाले आणि त्यानंतर तिने कधीच माघे वळून नाही पहिले. सुंदर निरागस चेहरा, निखळ हास्य आणि क्युट लूक यामुळे अल्पावधीतच तिचा भला मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. तिने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले. एस एस राजामौली यांच्या ‘सये’ चित्रपटात जिनेलियाने प्रमुख भूमिका साकारली होती.
सांबा, सचिन, हॅपी, बोम्मीरालू, ऑरेंज, रेडी, सारख्या सुपरहिट साऊथ सिनेमामध्ये तिने काम केले. तामिळ, तेलगू, कन्नड, अशा सर्वच भाषांमध्ये तिने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले होते. त्यानंतर आमिर खान प्रॉडक्शनच्या ‘जाने तू या जाने ना’ या सिनेमातून तिने बॉलीवूडमध्ये पुन्हा एकदा पदार्पण केले.
या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तर कमाल केलीच सोबतच एक लिजेंड रोमँटिक चित्रपट ठरला. या सिनेमाचं कथानक, गाणी सर्वच काही सुपरहिट ठरलं. जय आणि अदितीच्या प्रेमकथेने अनेकांची मन जिंकली. आमिरचा भाचा इम्रान खान याने याच सिनेमाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. मात्र या चित्रपटाचे खरे आकर्षण ठरली ती जिनेलिया.
तिच्या अभिनयाचे सर्वानी खास कौतुक केले. विशेष करून आमिर खानला तिचा अभिनय खूप जास्त आवडला होता. या सिनेमाने तिला पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. मात्र या नंतर तिने काही मोजक्याच सिनेमात काम केले आणि रितेशसोबत लग्नबेडीत अडकली. रितेश देशमुख सोबत लग्न केल्यानंतर तिने आपला सर्व वेळ कुटुंबाला देण्याचे ठरवले.
आपल्या मुलांना आणि कुटुंबाला प्राधान्य देत तिने काही काळ चित्रपटांमधून ब्रेक घेतला होता. मात्र सोशल मीडियावर जिनेलिया कमालीची सक्रिय असते. तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्यामळे सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होतीच. अनेकवेळा तिच्या चाहत्यांनी तिला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर बघण्याची इच्छा व्यक्त केली होती.
आणि आता तिच्या चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. लवकरच जिनेलिया पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नुकतच तिने आपल्याया सोशल मीडियावरून पुन्हा एकदा ती साऊथच्या सिनेमामध्ये परतणार असल्याची घोषणा केली होती. तर बॉलीवूडमधून देखील तिच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. आमिर खान पुन्हा एकदा तिला आपल्या सिनेमातून संधी देणार आहे.
‘जाने तू या जाने ना’ या सिनेमाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याबद्दल एक मिटिंग नुकतीच आमिर खानच्या ऑफिसमध्ये पार पडली. तब्ब्ल १५ वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल येत आहे. त्यामुळे या सिनेमाचं कथानक काय असेल किंवा कोणता कलाकार कोणते पात्र रेखाटणार आहे, हे सर्व काही अद्याप गुलदस्त्यातच आहे.