१२ जणांसोबत अफेयर, तरीही वयाच्या ५०व्या वर्षी अविवाहित आहे बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री, नाना पटेकरांसोबत होणार होत लग्न, मात्र…

१२ जणांसोबत अफेयर, तरीही वयाच्या ५०व्या वर्षी अविवाहित आहे बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री, नाना पटेकरांसोबत होणार होत लग्न, मात्र…

बॉलीवूड म्हणजे एक वेगळीच दुनिया आहे. बॉलीवूडमध्ये प्रेमाचं नातं अनेकवेळा जुळत आणि तेवढ्याच जास्त वेळा तुटत देखील. खूप कमी कलाकरांना आपला खरा लाईफपार्टनर मिळतो. मात्र, काही कलाकार आपल्या खऱ्या प्रेमाला ओळखू शकत नाही आणि मग वेळ हातातून निघून जाते. त्यानंतर, इतर कोणामध्ये तरी आपल्या खऱ्या प्रेमाला हे कलाकार शोधतात.

आणि अश्या वेळी ते कलाकार अनेकांसोबत संबंध प्रस्थपित करतात. यातूनच, त्याचे अनेकांसोबत नाव जोडले जाते. कधी कधी त्यांचे नाते नसले तरीही त्याचा गाजावाजा होतो, आणि यामध्ये त्यांच्या प्रतिमेचे नुकसान देखील होते. पण एक अशी अभिनेत्री आहे जिचे खरोखर खूप अफेअर आणि खूप रिलेशन होते.

मात्र, तिचे दुर्दैव तिला कोणाचीच साथ अखेर पर्यंत मिळाली नाही आणि आज वयाच्या ५०व्या वर्षी देखील ती सिंगल आहे. ‘इलू-इलू’ या गाण्याने त्याकाळात अक्षरशः लोकांना वेड लावलं होत. त्याचबरोबर त्यामधील, सुंदर अभिनेत्रीनेसुद्धा आपला भलामोठा चाहतावर्ग कमवला होता.

सौदागर सिनेमा मधून, मनीषा कोईराला या नेपाळी सुंदरीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि अल्पावधीतच तिला चांगलीच प्रसिद्धी भेटली. १९४२-या लव्हस्टोरी, बॉम्बे, अकेले हम अकेले तुम, दिलसे सारख्या सुपरहिट सिनेमामध्ये तिने काम केले. ९० च्या दशकात तिने या देशातील, मुलांना आपल्या सौंदर्याने वेडच लावले होते.

निरागस सौंदर्य आणि तेवढाच दमदार अभिनय यामुळे मनिषाने केवळ बॉलीवूडमध्येच नाही तर साऊथमध्ये देखील अनेक फॅन्स होते. ज्याप्रकारे तिच्या करियरच्या चर्चा सुरु होत्या त्याचप्रकारे, पहिल्याच सिनेमापासून तिच्या अफेअरच्या देखील चर्चा रंगातच होत्या. आपल्या पहिल्याच सिनेमातील सहकलाकार विवेक मुशरन सोबत सर्वात पहिले तिच्या आणि त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या.

मात्र फार काळ या चर्चा टिकल्या नाही, कारण लवकरच मनीषाचे नाव नाना पाटेकर यांच्यासोबत जोडण्यात येऊ लागले. विशेष म्हणजे, खामोशी सिनेमामध्ये नाना पाटेकर यांनी मनीषाच्या वडिलांची भूमिका रेखाटली होती. पण अग्निसाक्षी सारख्या सिनेमामध्ये त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली होती, आणि त्यांचे प्रेमसुद्धा फुलत गेले.

मात्र एक दिवस मनिषाने, आयशा झुल्का आणि नाना या दोघांनाही एकसोबत पहिले, व तिने आपले नाते लगेच मोडले. नाना आणि मनीषाच्या लग्नाची देखील तैयारी झाली होती असं बॉलीवूडमध्ये सांगितलं जातं. त्यानंतर मनीषाचे अनेक अफेअर झाले. डीजे हुसैन, नायजेरियन बिझनेसमॅन सेसिल ऍंथोनी, अभिनेता आर्यन वैद्य, प्रशांत चौधरी अश्या अनेक मोठाल्या व्यक्तींसोबत मनीषाचे अफेअर होते.

मात्र, यापैकी कोणासोबत देखील तिचा विवाह झाला नाही. अखेर तिने २०१० मध्ये नेपाळच्या मोठ्या उद्योगपती सम्राट दलाल सोबत विवाह केला. मात्र, दोन वर्षाच्या आतच म्हनजेच २०१२ मध्ये तिने घ’टस्फो’टासाठी अर्ज दाखल केला होता. यश, प्रसिद्धी, लोकप्रियता असं सर्व मनिषाने कमावलं. पण, प्रेमाच्या बाबतीत तिला कधीच यश नाही मिळालं म्हणून आजदेखील ती एकटेच आपले आयुष्य जगत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12