१०-२० नाही तर १५० कोटींच्या बंगल्यात राहते प्रियंका चोप्रा! पहा घराच्या आतील फोटो…

प्रियंका चोप्रा हे नाव आज घराघरात ओळखलं जातं. मिस वर्ल्डचा किताब जिंकून प्रियंका चोप्रा ने आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि आज दोन दशकांनंतर प्रियंकाने अभूतपूर्व अस यश संपादन केले आहे. केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलीवुड मध्ये देखील आता ती एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
प्रियंकाने हॉलीवुड मध्ये देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत जागा बनवली आहे. आपल्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच प्रियंका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. वैयक्तिक आयुष्यात प्रियंकाने अनेक चढ- उतार पहिले आहेत.
मात्र असं असलं तरीही आता ती निक जोनास सोबत सुखी संसार करत आहे. आता तर त्यांच्या आयुष्यात त्यांची मुलगी देखील आली आहे. त्यामुळे नजर लागावं असं निक आणि प्रियांकाचा संसार सुरु आहे. त्यामुळेच लग्नानंतर तर प्रियंका चोप्रा जितकं आलिशान आयुष्य जगत आहे, त्यात आता अधिकच भर पडली आहे.
बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत प्रियांकाचा समावेश आहे. तिच्याकडे गडगंज अशी संपत्ती आहे. रिपोर्ट्सनुसार, तिच्याकडे ७० दशलक्ष म्हणजेच ५४० कोटी रुपयांची संपत्ती आहे. अभिनेत्रीचा अमेरिकेत एक सुंदर बंगला आहे. लग्नानंतर लगेचच निकने प्रियांकाला एक आलिशान बंगला भेट दिला.
त्यांचे घरही त्याच्यासारखेच सुंदर आहे. TMZ या वेबसाईटवर प्रियांका आणि निकच्या व्हिलाची काही छायाचित्रे समोर आली आहेत. वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, त्यांचा बंगला ८२०० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे आणि त्यात ७ बेडरूम आहेत. संपूर्ण घरात चार बाथरुम असून घरामध्ये वूडन फ्लोरिंग आहे.
प्रियंका आणि निकचा व्हिला Beverly Hills वर आहे. व्हिलाला सर्वात खास बनवते ते म्हणजे त्यांचा ओपन स्विमिंग पूल. त्यांच्या या स्विमिंग पूलमधून हिरव्यागार टेकड्यांचे नयनरम्य दृश्य पाहता येते. प्रियांका आणि निकचा हा व्हिला चंद्राच्या प्रकाशात पहिला तर तो आणखीनच सुंदर दिसतो.
या व्हिलाच्या भिंती काचेच्या बनवलेल्या आहेत, ज्यामुळे या व्हिलाला अँटिक लुक मिळतो. या व्हिलाला स्पेस इंटरनॅशनल नावाच्या आर्किटेक्चर कंपनीने डिझाइन केले आहे. निकने प्रियांकासाठी हे सुंदर घर १५ मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे ११५ कोटींना खरेदी केले होत आणि आता त्याची किंमत १५० कोटीच्या आस-पास आहे.
रिपोर्टनुसार, प्रियंका चोप्राला लग्नासाठी प्रपोज करण्यापूर्वी काही महिने आधी निक जोनासने हे घर खरेदी केले होते. इतकेच नाही तर निकने प्रियांकाला याच ठिकाणी प्रपोज केले. दरम्यान, प्रियांका चोप्राचे मुंबईत देखील एक आलिशान घर आहे. २०१६ मध्ये तिने हे घर विकत घेतले होते. प्रियांकाच्या या घराची किंमत जवळपास १०० कोटी रुपये आहे.
याशिवाय प्रियांका मुंबईतील अनेक फ्लॅटची मालकीण आहे. वर्सोव्यातील एका इमारतीत प्रियांकाचे तीन मोठे फ्लॅट आहेत. तसेच, न्यूयॉर्कमध्ये तिची ३० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तिने गोव्यातही जमीन घेतलेली आहे. बातम्यांनुसार, बागा बीचवर तिचा एक बंगलाही आहे ज्याची किंमत 20 कोटी आहे.