हॉटेल नाही ‘या’ राज महालात पार पडणार सिद्धार्थ-कियाराचं लग्न, फोटो पाहून व्हाल चकित, एका दिवसाचं भाडं तब्ब्ल…

हॉटेल नाही ‘या’ राज महालात पार पडणार सिद्धार्थ-कियाराचं लग्न, फोटो पाहून व्हाल चकित, एका दिवसाचं भाडं तब्ब्ल…

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस आला आहे. दोघेही ७ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. सिद्धार्थ आणि कियारा सूर्यगड पॅलेसमध्ये सात फेरे घेतील. 4 फेब्रुवारीपासून पाहुणे जैसलमेरला पोहोचू लागले.

दुसरीकडे, 5 फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि कियाराही आपापल्या कुटुंबासह सूर्यगढ पॅलेसमध्ये पोहोचले. सिद्धार्थ आणि कियारा यांच्या भव्य लग्नासाठी सूर्यगढ पॅलेस वधूप्रमाणे सजला आहे. गेल्या काही दिवसांपासून लग्नाची तयारी जोरात सुरू होती. संगीत आणि हळदी समारंभ 6 फेब्रुवारीला झाला, तर लग्न 7 फेब्रुवारीला होणार आहे..

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाआधी मेहेंदी आणि संगीत रात्रीसाठी सूर्यगढ पॅलेस गुलाबी रंगात सजवण्यात आला आहे. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नामुळे सूर्यगढ पॅलेस सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला आहे. हा पॅलेस आणि या पॅलेसमध्ये आकारण्यात येणारं भाडं चर्चेत आलं आहे.

या पॅलेसमध्ये लग्न करण्यासाठी अडवाणी आणि मल्होत्रा कुटुंबीयांनी कोट्यवधींचा खर्च केला आहे. सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाला त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याबरोबरच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. ईशा अंबानी आणि तिचा पती आनंद पिरामल ते करण जोहर, शाहिद कपूर-मीरा राजपूत, जुही चावला-जय मेहता यांच्यासह अनेक सेलेब्स सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी पोहोचले आहेत.

या सर्व पाहुण्यांची उत्तम काळजी घेण्यात येत आले. त्यामुळेच या आलिशान पॅलेसमध्ये तब्ब्ल ८४ रूम्स बुक करण्यात आल्या आहेत. सोबतच पार्किंगची देखील खास सोय करण्यात आली आहे. सर्व पाहुण्यांच्या सुरक्षिततेचा देखील अत्यंत चोख असा बंदोबस्त करण्यात आला आहे. जैसलमेर शहरापासून हा पॅलेस १६ किलोमीटर दूर आहे.

याचा एकूण परिसर जवळपास ६५ एकर आहे. हा पॅलेस भारतातल्या टॉप १५ वेडिंग डेस्टिनेशन्स पैकी एक आहे. म्हणूनच या पॅलेस कडून आकारण्यात येणारं भाडंही तितकंच मोठं आहे. एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात या ठिकाणी लग्न करण्याचं असल्यास १ कोटी २० लाख रुपये भाडं करण्यात येतं.

तर, लग्नसराईमध्ये म्हणजेच ऑक्टोबर ते मार्च महिन्या दरम्यान हा आकडा २ कोटींपर्यंत जातो. या पॅलेस मध्ये २५० स्क्वेअर फुट रूममध्ये एका दिवसासाठीच्या रूमचे भाडं २० ते ३० हजार रुपये इतके आकारण्यात येतं. तर या हॉटेलमधील लक्झरी रूम्ससाठी एका दिवसाला ४० ते ५० हजार भाडं आकारण्यात येतं.

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नासाठी या पॅलेसमध्ये विविध प्रकारच्या रूम्स बुक केल्या गेल्या आहेत. दरम्यान, कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाचा फूड मेन्यूही खूप भव्य आहे. यामध्ये 10 देशांतील प्रसिद्ध पदार्थांचा समावेश करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मेनूमध्ये पंजाबी आणि राजस्थानी पदार्थांपासून गुजराती, अमेरिकन, चायनीज, मेक्सिकन, दक्षिण भारतीय आणि इटालियन पदार्थांचा समावेश आहे. बॉलीवूडच्या या सुंदर जोडप्याला चाहते भरभरून प्रेम देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12