हे काम करुन चहलची पत्नी धनश्री पुन्हा एकदा चर्चेत! शेअर करून बसली नको तो Video…

आज भारताचा यशस्वी गोलंदाज म्हणून युजवेंद्र चहलला ओळखलं जातं. चहलने आयपीएल मधून आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांची सुरुवात केली. आयपीएल मधील उत्तम प्रदर्शन बघता त्याला भारतीय क्रिकेट संघात देखील स्थान मिळाले. त्यानंतर आपल्या अतिशय हटके गोलंदाजीने चलने चांगलेच यश संपादन केले.

त्याची प्रेमकथा देखील खास आहे. एका उत्तम अशा डान्सर कडे युझवेंद्रने डान्स क्लास लावला आणि तिच्याच प्रेमात पडला. youtube वर 26 लाख सबस्क्राईब असणारी धनश्री वर्मा युजवेंद्र चहलची पत्नी आहे. त्या दोघांची लव स्टोरी देखील खूपच हटके आहे. धनश्री वर्मा एक उत्तम डान्सर आहे.

युट्युब वरती तिचे चैनल जबरदस्त हिट समजले जाते. कायमच आपल्या डान्स चे व्हिडिओ युट्युब आणि instagram वर शेअर करत असते. सोशल मीडियावर धनश्रीचा खूप मोठा चहाता वर्ग आहे. चहलने तिच्याकडून डान्स शिकण्यासाठी तिच्याकडे क्लास लावला आणि तीन महिन्यातच दोघांचं लग्न झालं.

चहलला ती डान्स तर शिकवू शकली नाही. मात्र साता जन्माची गाठ दोघांची बांधली गेली धनश्री वर्मा चहलसोबत बऱ्याच सामन्यांमध्ये जाते. धनश्री एखादी अभिनेत्री नसली तरी ती प्रचंड ग्लॅमरस आणि सुंदर आहे. आपल्या फॅशन सेन्सने ती थेट बॉलिवूड अभिनेत्रीना देखील टक्कर देते.

धनश्री आणि युजवेंद्र चहल या जोडीचा खूप मोठा चाहता वर्ग बघायला मिळतो. अचानक काही दिवसांपूर्वी ही जोडी वेगळी होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. परंतु त्यात काहीच तथ्य नव्हते. त्यानंतर काही दिवसांनी दोघांनी सोबतचा एक खास फोटो शेअर केला आणि त्या अफवा बंद झाल्या.

आता पून्हा एकदा चहलची पत्नी धनश्री चर्चेत आली आहे. भारताचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सध्या खूप चर्चेत आहे. नुकतेच धनुश्री वर्माचे ‘ओ सजना’ हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. धनश्री वर्मा एक डान्स कोरियोग्राफर आहे. ती डान्स क्लासेस देखील चालवते.

एका मुलाखतीत धनश्रीने सांगितले की, ऑनलाइन डान्स क्लासमध्येच चहल आणि त्याच्यामध्ये जवळीक वाढली होती. तेव्हापासून दोघे रिलेशनशिपमध्ये आले आणि त्यानंतर चहल आणि धनश्रीने एंगेज करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये धनश्री आणि चहल यांची एंगेजमेंट झाली.

यानंतर 22 डिसेंबर 2020 रोजी चहल आणि धनश्रीचे लग्न झाले. धनश्री वर्मा खूप सुंदर आहे आणि ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. धनश्रीचे इन्स्टाग्रामवर 2.6 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. धनश्री अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12