हेमांगी कवीची महिला दिनी केलेली पोस्ट चर्चेत, “ही तीच ना बाई, बु’ब्स वाली बाई…” म्हणत….

हेमांगी कवीची महिला दिनी केलेली पोस्ट चर्चेत, “ही तीच ना बाई, बु’ब्स वाली बाई…” म्हणत….

मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अशा काही अभिनेत्री आहेत की ज्या कायमच च’र्चेत असतात. त्यामध्ये एक नाव आपल्याला जोडता येईल ते म्हणजे अभिनेत्री हेमांगी कवी धुमाळचे हेमंगी कवी ही आपल्या बोल्डपणासाठी ओळखली जाते. हेमांगी कवी ही अनेकदा बिनधास्त वक्तव्य करून चर्चेत असते.

तसेच सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती आपल्या चाहत्यांना वेगवेगळी माहिती देखील देत असते. अलीकडेच तिने पतीने तिच्यासाठी एक खास डिश बनवली होती. त्याची माहिती देखील दिली होती. हेमांगी कवी आता चर्चेत येण्याचे कारण म्हणजे महिला दिनानिमित्त तिने एक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

या पोस्ट मध्ये तिने अनेक दिलखुलास उत्तरे दिली आहेत. हेमांगी कवी ही आपल्या ब्राच्या पोस्टमुळे गेल्या वर्षी चर्चेत आली होती. त्यामुळे तिच्यावर अनेकांनी टी’का केली होती, तर काही जणांनी तिचे समर्थन देखील केले होते. गेल्या वर्षी याच सुमारास हेमांगी कवी हिने ब्रा घातल्यावरून एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.

त्यात तिने म्हटले होते की मी ब्रा अजिबात घालणार नाही. तिला यावरून अनेकांनी ट्रो’ल केले होते. तसेच तिच्यावर अनेकांनी टी’का देखील केली होती. मात्र हेमांगी कवी हिला त्याचा काहीही फरक पडला नाही. यावर तिने सडेतोड उत्तर देऊन विरोधकांची तोंडे बंद केली. हेमांगी कवी अभिनेत्री सोबतच कवी देखील आहे. ती अनेक कविता करत असते.

त्याचप्रमाणे आपले विचार देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असते. हेमंगी कवी हिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये देखील काम केले आहे. आता महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर हेमांगी कमी हिने नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टला अनेकांनी लाईक देखील केले आहे.

या पोस्टमध्ये हेमांगी कवी म्हणते की, 2021 हे वर्ष माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं होते. कारण या वर्षाच्या सुमारास मला अनेक चित्रपटाच्या ऑफर देखील मिळाल्या. चालू वर्षांमध्ये मी तुमच्यासमोर वेगवेगळे प्रयोग घेऊन येणारच आहे. गेल्या वर्षात मी माझ्या बुद्धीप्रमाणे आपल्या समोर माझी मतं मांडली. त्यावरून मला अनेकांनी टी’का देखील केली.

मागच्या वर्षी हे माझ्यासाठी खूपच खास होते. अनेकांनी मला झिडकारले, फटकारलं. काहीनी साथ सोडली. मैत्रीण म्हणून नकोस म्हणून काहीजण लांब देखील राहिले. मात्र जे माझ्या जवळ राहिले त्यांचे मी आभार मानते..

काही लोकांनी तर माझी इतर ओळख त्यांना माहीत असताना देखील ‘ही तीच ना… बाई, बु’ब्स वाली बाई’ हीच माझी ओळख निर्माण करून दिली. यावरूनही हेमांगीने नाराजी व्यक्त केली आहे. काही लोकांनी मला मनापासून स्वीकारलं तर काही लोकांनी मला छुपा पाठिंबा देखील दिला. या सगळ्यांचे मी आभार मानते असे हेमांगी हिने म्हटले आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.