हृतिक रोशनच्या ‘या’ हॉट बहिणीला डेट करतोय कार्तिक आर्यन! पहा फ्लॅटवर तिच्यासोबत…

हृतिक रोशनच्या ‘या’ हॉट बहिणीला डेट करतोय कार्तिक आर्यन! पहा फ्लॅटवर तिच्यासोबत…

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आता तरुणाईच्या मनाची ताईद बनला आहे. मुलींना हा अभिनेता खूप आवडतो. अलीकडेच कपिल शर्माच्या शोमध्ये एका मुलीने कार्तिकला सर्वांसमोर प्रपोज केले. अभिनेता आर्यन खानने बॉलीवूडमध्ये प्रवेश करताच झगमगीत जगात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.

चित्रपट आणि अभिनयाच्या माध्यमातून रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या कार्तिकचे नाव अनेक अभिनेत्रींसोबतही जोडले गेले. त्यामुळे या अभिनेत्याच्या नावाची जोरदार चर्चा रंगली होती. आजही कार्तिक एका महत्त्वाच्या कारणाने चर्चेत आहे. रंगलेल्या चर्चांमागील कारणही तसेच आहे.

अभिनेता कार्तिक आर्यनचे नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. आता एका खास मुलीसोबत त्याच नाव जोडलं जात आहे. एकीकडे ही बातमी ऐकून हजारो मुलींना धक्का बसला आहे. त्याचबरोबर कार्तिकची गर्लफ्रेंड कोण आहे हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे.

कार्तिक आर्यन त्याच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र आता कार्तिक अभिनेता हृतिक रोशनच्या बहिणीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या सगळीकडे रंगल्या आहेत. हृतिकची बहीण पश्मिना रोशन असंख्य मुलींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या कार्तिकच्या मनावर राज्य करते.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्मिना रोशन आणि कार्तिक आर्यन यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. पश्मिना आणि कार्तिकची मैत्री आता वेगळे वळण घेत असल्याचे दिसते. याशिवाय अभिनेता पश्मीनाला भेटण्यास उत्सुक आहे. एवढेच नाही तर पापाराझींचे लक्ष विचलित करण्यासाठी दोघेही त्यांच्या ड्रायव्हरसोबत बाहेर पडतात.

जेव्हापासून कार्तिक आर्यन आणि पश्मिना रोशनच्या नात्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे, तेव्हापासून अभिनेत्याच्या चाहत्यांना पश्मिना रोशनबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. पश्मिना रोशन ही हृतिक रोशनची चुलत बहीण आहे. पश्मिना ही अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे.

पश्मिना रोशन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शाहिद कपूरच्या इश्क विश्कच्या सिक्वेलमध्ये पश्मिना रोशनला कास्ट करण्यात आले आहे. कार्तिकच्या जवळच्या सूत्रांनी दावा केला की, ‘पश्मीना काम करत नसताना त्याच्यासोबत घरी राहणे पसंत करतो. फोटोग्राफर्सना टाळण्यासाठी दोघेही आपल्या गाड्या घरी पाठवतात.

पश्मिना ही संगीत दिग्दर्शक आणि संगीतकार राजेश रोशन यांची मुलगी आहे. पश्मिना सध्या ‘इश्क विश्क रिबाउंड’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पश्मिना सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि कार्तिक आर्यन देखील तिच्या फॉलोअर्सपैकी एक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12