‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री असती बॉबी देओलची बायको, पण धर्मेंद्र यांच्यामुळे अधुरी राहिली प्रेम कहाणी…

बॉलिवूड म्हटल की नवीन ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी काही नवीन नाही. एखादा चित्रपट करत असताना त्या कलाकारांचे नकळत एकमेकांसोबत सुळ जुळतो भेटीगाठी होतात आणि याचे रूपांतर नंतर प्रेमात होते. पण हे नवीन प्रेम प्रकरण सुरू होताना कुणाचं तरी नात मात्र संपत.
दरम्यान, यात क्वचित असे कपल असतील ज्यांचे प्रेमाचे रूपांतर लग्नात झाले आणि सात जन्माचे जोरदार झाले. होय, हीमॅन धर्मेंद्र यांचा मुलगा आणि सनी देओलचा भाऊ म्हणून बॉबी देओल एकेकाळी बॉलिवूड अभिनेत्री नीलम कोठारीच्या प्रेमात आकंत बुडाला होता. नीलम कोठारीचे देकील बॉबीवर जीवापाड प्रेम होते. इतकेच काय तर दोघे लग्नही करणार होते.
मात्र धर्मेंद्र यांना बॉबीचे हे लग्न मान्य नव्हते. कारण सिनेमात काम करणारी महिला त्यांना सून म्हणून नको होती. म्हणून त्यांनी हे लग्न होऊच दिले नाही. धर्मेंद्र यांची इच्छा होती कि बॉबीने अरेंज मॅरेज करावे, ज्यानंतर बॉबी देओल आणि नीलम एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले. आणि या दोघांच्या प्रेमालाही पूर्ण विराम लागला.
तसेच बॉबीनंतर गोविंदासह तिचे अफेअर सुरू झाले. पडद्यावरही गोविंदा-नीलमची जोडी प्रचंड गाजली होती. या जोडीने डझनावर सिनेमे केलेत. ‘इल्जाम’ हा दोघांचाही पहिला सिनेमा होता. मात्र हे नातेही फार काळ काही टिकले नाही. गोविंदाच्या आईलादेखील नीलम सून म्हणून नको होती.
अखेर २००० मध्ये नीलमने यूकेचा बिझनेसमन ऋषी सेठियासोबत लग्न केले. पण काहीच वर्षांत दोघांचा घटस्फोट झाला. २००७ मध्ये टीव्ही अभिनेता समीर सोनी नीलमच्या आयुष्यात आला आणि २०११ मध्ये दोघांनी लग्न केले. दोघांनी एक मुलगी दत्तक घेतली आहे जिचे नाव अहाना आहे. समीर व नीलम दोघांचेही हे दुसरे लग्न आहे.
९० च्या दशकात नीलम कोठारीने तिच्या भूमिकांमुळे रसिकांची तुफान पसंती मिळवली होती. ‘दूध का कर्ज’, ‘हम सात सात है’ सिनेमातील नीलमची भूमिका आजही रसिक विसरलेले नाहीत. १९८४ मध्ये ‘जवानी’ या सिनेमाद्वारे नीलमने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि पुढे एकापेक्षा एक हिट चित्रपट आपल्या नावी केलेत.