हिला ओळखलंत का ? पहा ‘तुम बिन’ मधील ‘या’ अभिनेत्रीमध्ये 20 वर्षात झालाय इतका बदल, इतक्या कोटींची बनलीय मालकीण…

बॉलीवूडमध्ये अनेक वेळा आपण पहिले आहे, एक सिनेमा पूर्ण नशीब बदलवून टाकतो. म्हणून तर येथे प्रत्येक शुक्रवारी नशीब बदलते, असे बॉलीवूडच्या बाबतीत बोलले जाते. कधी कधी आपल्याला अपेक्षित असणारा सिनेमा अजिबात चांगले प्रदर्शन करत नाही तर कधी, अजिबात अपेक्षा नसलेला आणि कोणाला माहित देखील नसणारा सिनेमा बॉक्स ऑफिस वर कमाल करत हिट ठरतो.
मात्र, हिट झाल्यानंतर मिळालेल्या लोकप्रियतेचा वापर सर्वांनाच करता येतोच असे नाही. बरेच जण, याचा उत्तम वापर करत पुढे जातात आणि यशाची शिखर गाठतच राहतात. मात्र, काहींना त्यानंतर योग्य निर्णय घेता येत नाही आणि मग ते बॉलीवूडमधुन गायब होतात. एका सिनेमामध्ये भरगोस यश मिळते, मात्र त्यानंतर ते कुठे गायब होऊन जातात हेच समजत नाही. अशीच एक अभिनेत्री आहे, संदली सिन्हा.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना आजही हिची ओळख तिच्या नावाने पटणार नाही. तुम बिन या सिनेमामधून लोकप्रियता प्राप्त करणारी अभिनेत्री म्हणजेच संदली सिन्हा हिने यान प्रियाची भूमिका साकारली होती. तुम बिन सिनेमामधील सर्वच गाणे आजही सर्वांच्या आवडीचे आहेत. आजही देशात कोठेही लग्न असेल तर, छोटी छोटी रातें हे गाणे वाजतेचं.
या गाण्याबरोबरच तुम्हारे सीवा आणि कोई फर्याद हे गाणे तर आजही कित्येक लोकांची अत्यंत आवडीचे गाणे आहेत. या सिनेमामध्ये साधी भोळी प्रिया आपल्या होणाऱ्या पतीच्या मृ’त्यूनंतर स्वतःला कशी सावरते आणि कुटुंबाला कशी सांभाळते हे दाखवण्यात आले होते. या अतिसुंदर आणि भोळ्या प्रियाच्या तेव्हा कित्येक लोकं अक्षरशः प्रेमात पडले होते.
तुम बिन हा सिनेमा आजही खूप लोकांचा अगदीच आवडता असा सिनेमा आहे. मात्र, या सिनेमाला जितकी प्रसिद्धी मिळाली, तेवढी प्रसिद्धी त्यानंतर या सिनेमातील कोणत्याच कलाकाराला नाही मिळाली. त्याचा कोणताही सिनेमा या सिनेमाइतका हिट नाही ठरला.
खास करून संदली सिन्हाला पुन्हा जास्त कोठेच बघण्यात नाही आले. उर्मिलाचा पिंजर, ओम आणि अब तुम्हारे हवाले वतन साथीयो या काहीच सिनेमामध्ये ती झळकली. मात्र तिला कोणत्याही सिनेमामध्ये यश मिळाले नाही, आणि म्हणून तिने अभिनयापासून दूर झाली.
संदली सिन्हाचे वडील एअर फोर्समध्ये होते. देशाची सेवा करत असताना ते शाहिद झाले. तिच्या आईनेच तिला आणि तिच्या भावंडांना लहानाचे मोठे केले. संदली सुरुवातीपासून अभ्यासात हुशार असल्यामुळे तिने डॉक्टर व्हावे अशी तिच्या आईची इच्छा होती. मात्र तिला एका मॉडेलिंग असाइनमेंट भेटले आणि ती या क्षेत्राकडे वळली.
तिने मॉडेलिंग करिअर मात्र उत्तम राहिले. तिच्या सौंदर्यामुळे तिला अनेक काम मिळाले आणि सोबतच सोनू निगम याच्या दिवाना अल्बम मध्ये देखील ती झळकली. या गाण्याचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनीच केले होते, आणि म्हणून तिला तुम बिन या सिनेमामध्ये ऑडिशन शिवाय घेण्यात आले.
मात्र, बॉलीवूड मध्ये हवे तसे यश न मिळाल्यामुळे तिने बॉलीवूड मधून संन्यास घेतला. प्रसिद्ध बिझनेसमॅन किरण साळसकर सोबत तिने २००५ मध्ये विवाह केला आणि ती तिच्या वैवाहिक आयुष्यात अत्यंत आनंदी आहे. ‘कंट्री ऑफ ओरिजन’ देशातील सर्वात मोठी बेकरी आहे आणि याच बेकरीची ती मालकीण आहे. कोट्यवधी रुपयांचा या बेकरीचा बिझनेस आहे. संदली हिला दोन मुलं असून आपल्या आयुष्यात ती खुश आहे.