‘हास्य जत्रा’ फेम शिवाली परबने शेअर केली गुडन्यूज, पोस्ट शेअर करत म्हणाली…

‘हास्य जत्रा’ फेम शिवाली परबने शेअर केली गुडन्यूज, पोस्ट शेअर करत म्हणाली…

आजकाल सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. अल्पावधीत प्रसिद्धी मिळवण्याचा उत्तम प्लॅटफॉर्म असण्याबरोबरच सोशल मीडियावर तत्काळ माहिती व्हायरल होते. ज्यामुळे युजर्सचा मोठ्या प्रमाणात वेळ देखील वाचतो. तसेच मनोरंजन विश्वात दररोज काही ना काही नवनवीन खुलासे होत असतात.

अभिनय करणारे कलाकार देखील याच सोशल मीडियाचा आधार घेत स्वतः संबंधित काही ना काही अपडेट चाहत्यांना पोस्टद्वारे देत असतात. मग त्या पोस्ट त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल असतात, तर कधी प्रोफेशन लाईफबद्दल. जवळपास सगळेच कलाकार नवे चित्रपट, मालिका तसेच आपल्या वैयक्तिक आयुष्यातील किस्से, अफेअर, गुडन्यूज सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करून चाहत्यांना आपल्या आनंदात सामावून घेण्याचा प्रयत्न करतात.

म्हणूनच चाहते देखील आपल्या आवडत्या कलाकारांना सोशल मीडिया हँडलवर फॉलो करायला विसरत नाहीत. दरम्यान, छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून घराघरात प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री शिवाली परब प्रेक्षकांना तिच्या विनोदाने पोट धरून हसायला लावते. तिला कल्याणची चुलबुली म्हणून देखील ओळखले जाते. आता तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. अभिनेत्री शिवाली परब हीने पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. शिवालीने ही गोड बातमी शेअर केल्यापासून चाहत्यांकडून तिच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अभिनेत्रीने ही गुडन्यूज शेअर करत सुंदर असे कॅप्शन देखील दिले आहे.

ज्यात तिने या गोड बातमीचा खुलासा केला आहे. शिवालीने पोस्ट शेअर करत ती लवकरच एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच तिने या मालिकेचा एक प्रोमो देखील शेअर केला आहे. अभिनेत्रीने यासंदर्भात तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये मेंशन केलं आहे.

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “लवकरच…अवघ्या महाराष्ट्राला पाठवत आहोत हास्याची मनी ॲार्डर…नवी मालिका -‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…..’ लवकरच… सोनी मराठी वाहिनीवर…” तिच्या या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

शिवाली परबच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे, झाले तर तिने केवळ छोट्या पडद्यावरच काम केलं नाही, तर मराठी चित्रपटांमध्ये देखील तिने तिच्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. अभिनेत्रीचा ‘प्रेम, प्रथा, धुमशान’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. ज्यात तिने बोल्ड सीन दिल्यामुळे अभिनेत्री चर्चेचा विषय बनली होती. आता पुन्हा ती नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12