सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय ह्रतिकची १६ वर्षांनी लहान गर्लफ्रेंड, भर हॉटेलमध्ये ह्रतिकसोबत ‘हे’ काम करताना झाली स्पॉट, पहा Video..

सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय ह्रतिकची १६ वर्षांनी लहान गर्लफ्रेंड, भर हॉटेलमध्ये ह्रतिकसोबत ‘हे’ काम करताना झाली स्पॉट, पहा Video..

पहिल्याच सिनेमाने ह्रतिकला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. एक सुपरस्टार म्हणून त्याला ओळखले जाऊ लागले. त्यानंतर त्याने अनेक सुपरहिट सिनेमामध्ये काम केले. धूम, कभी ख़ुशी कभी गम, जोधा अकबर, अग्निपथ, जिंदगी ना मिलेगी दोबारा सारख्या सिनेमामध्ये आपल्या अभिनयाने त्याने अनेकांना वेड लावले.

‘क्रिश’ च्या रूपात हृतिकनेच बॉलीवूडला पहिला सुपरहिरो दिला. मात्र आपल्या प्रोफेशन लाईफमध्ये हृतिक जितका यशस्वी ठरला. तेवढाच आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी वा’दात देखील राहिला. आपल्या पहिल्याच सिनेमाच्या यशानंतर हृतिकने आपली लॉन्ग टाईम गर्लफ्रेंड सुजैन सोबत लग्न केले. यादें सिनेमाच्या वेळी करीना कपूर सोबत हृतिकच्या अ-फेअरच्या चर्चाना उधाण आले होते.

त्यानंतर अनेकवेळा वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडण्यात आले. असं सांगितलं जात होत की, काईट्स सिनेमाची अभिनेत्री बार्बरा मोरीवर हृतिकचे चांगलेच प्रेम जडले होते. आणि त्याच्या नात्याच्या बातम्या ऐकून सुजैनने घर देखील सोडले होते. त्यातच अभिनेत्री कंगना रानौत देखील त्याच्यासोबत नात्यामध्ये असल्याचा दावा केला.

आणि २०१४मध्ये सुजैन आणि हृतिक दोघांचा घ’टस्फो’ट झाला. सुजैन आणि हृतिक वेगळे झाले असले तरीही, अनेकवेळा त्यांना सोबत बघितले जात होते. म्हणून ते दोघे पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चा सुरु होत्या. मात्र काहीच दिवसांपूर्वी ह्रतिक रोशनला त्याच्यापेक्षा १६ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रेस्टोरंटमध्ये डिनर करून बाहेर पडताना बघितले गेले.

हृतिक चक्क अभिनेत्री सबा आझादच्या हातात हात घालून रेस्टोरंटच्या बाहेर पडला होता. आता पुन्हा एकदा ते दोघे डेट वर गेले होते. आणि त्यावेळी रेस्टोरंट मध्ये सबा अझादने जे केलं, त्याचा व्हिडियो सगळीकडेच वायरल होत आहे. सबा आझाद आणि हृतिक रोशन रेस्टोरंटमध्ये बसले होते. त्यावेळी सबा मेनू कार्ड घेऊन हृतिकसोबत चांगलीच मस्ती करत होती.

हृतिक आणि तिचा अगदी खास आणि मजबूत बॉण्ड या व्हिडियोमध्ये सगळ्यांनाच बघायला मिळत आहे. त्यानंतर ते दोघे रेस्टोरंट मधून बाहेर पडताना एकमेकांच्या हातात हात घालूनच स्पॉट झाले. त्यामुळे व्हॅलेन्टाईन विकच्या सुरुवातीला सगळीकडेच रोमँटिक वातावरण बघायला मिळत आहे. त्याच्या जादू हृतिक आणि सबा वर देखील झाली असल्याचं दिसत आहे.

‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’ आणि ‘दिल कबड्डी’ सारख्या चित्रपटात सबा आझादने काम केले आहे. त्याचबरोबर ती अनेक कॅडबरी, किट कॅट, व्होडाफोन, एअरटेल, पॉंड्स, सनसिल्क अशा जाहिरातींमध्ये देखील झळकली आहे. विशेष म्हणजे सबा हृतिकपेक्षा तब्ब्ल १६ वर्षांनी लहान आहे. आता दोघांमध्ये केवळ मैत्री आहे की, त्यापलीकडे काही हे वेळच सांगेल. तूर्तास त्या दोघांकडून आपल्या नात्याबद्दल कोणतेही अधिकृत विधान आले नाहीये.

yash

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.