सोनम कपूरने शेअर केला तो धक्कादायक प्रसंग, म्हणाली; ‘त्याने मागून माझ्या छातीला जोरात पकडलं, आणि….’

सोनम कपूरने शेअर केला तो धक्कादायक प्रसंग, म्हणाली; ‘त्याने मागून माझ्या छातीला जोरात पकडलं, आणि….’

अभिनेत्री सोनम कपूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. बॉलिवूडमध्ये सोनमने संजय लीला भन्साळीच्या सांवरिया या चित्रपटातून पदार्पण केले होते. ‘दिल्ली-6’, ‘खूबसूरत’, ‘नीरजा’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘रांझणा’ आणि ‘एक लडकी को देखा..’

या चित्रपटांमध्ये सोनमने काम केलं आहे. आपल्या हटके आणि सुपर फॅशनीस्ट स्टाईलमुळे सोनम नेहमीच चर्चेत असते. बॉलीवूडमध्ये स्वतःच्या फॅशनकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा ट्रेंड सोनमनेच आणला. काहीच दिवसांपूर्वी सोनमने आपल्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर आता ती पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये सक्रिय होण्यासाठी धडपडत आहे.

तसे बघता, बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर दोनच गोष्टीसाठी ओळखली जाते. पाहिली म्हणजे तिची स्टाईल आणि फॅशन लुक्स आणि दुसरं म्हणजे तिचे वा’दग्रस्त विधान. बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यापासूनच तिने अनेक वेळा अतिशय स्पष्ट आणि बोल्ड स्टेटमेंट दिले आहेत. त्यामुळे अनेक वेळा तिला टीकेचा देखील सामना करावा लागला.

परंतु सोनम कपूरने कधीच या सर्व गोष्टींची परवा केली नाही. ती नेहमीच अगदी स्पष्टपणे आपले मत मांडत असते. त्यामुळेच सोनम नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता पुन्हा एकदा सोनम चर्चेत आली आहे. मात्र यावेळी ती आपल्या फॅशनमुळे नाही तर, तिच्यावर बेतलेल्या प्रसंगामुळे चर्चेत आली आहे.

राजीव मसंद याच्या राऊंड द टेबल शोमध्ये सोनमने अनेक बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्रींसह हजेरी लावली होती. 2016 मध्ये, जेव्हा सोनम राजीव मसंदच्या शो द एक्ट्रेसेस राऊंडटेबलमध्ये पोहोचली होती, तेव्हा तिने तिच्यासोबत झालेल्या लैंगिक छळाची कहाणी सांगितली होती.

सोनमसोबतचा हा प्रसंग ऐकून राधिका आपटे, विद्या बालन, अनुष्का शर्मा आणि आलिया भट्टही थक्क झाल्या. आपल्यावर बेतलेल्या त्या भयानक प्रसंगाबद्दल सांगताना सोनम म्हणाली होती की, ती लहान असताना तिचे शोषण झाले होते. वयाच्या 13 व्या वर्षी सोनमसोबत असे काही घडले होते, ज्यानंतर ती खूप घाबरली होती.

सोनमने सांगितले की, जेव्हा ती तिच्या काही मैत्रिणींसोबत थिएटरमध्ये फिल्म पाहण्यासाठी गेली होती तेव्हा तिच्यासोबत ही घटना घडली. याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली होती की, ‘मागून एक माणूस आला आणि त्याने माझी छा’ती पकडली.

साहजिकच, त्यावेळी मी लहान होते आणि मला छाती अर्थात बु ब्स नव्हते. पण ते सर्व खूप भयं’कर होत. मी भीतीने थरथर कापू लागली. मला काही समजत नव्हते. काय होतंय. मी तिथेच उभं राहून रडायला लागले.’ आपल्यासोबत झालेल्या छ’ळाविषयी बोलताना सोनमला आपले अश्रू अनावर झाले. सोनम कपूरचा हा खुलासा ऐकून सगळेच थक्क झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12