सैफ अली खानची ‘ही’ अभिनेत्री आठवतेय का? पहा आज आ’जाराने झालीय अशी अवस्था की ओळखताही येणार नाही…

सैफ अली खानची ‘ही’ अभिनेत्री आठवतेय का? पहा आज आ’जाराने झालीय अशी अवस्था की ओळखताही येणार नाही…

नव्वदच्या दशकाला बॉलिवूडचा सुवर्णकाळ म्हणून समजले जाते. अनेक कलाकारांनी या दशकांमध्ये नाव कमावले आहे. 90च्या दशकांमधील अनेक अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आजही बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. ९०च्या दशकातील अनेक अभिनेत्री आपल्या नैसर्गिक आणि निखळ सौंदर्यासाठी ओळखल्या जातात.

आजही त्या अभिनेत्री प्रचंड सुंदर आणि आकर्षित दिसतात. केवळ बॉलीवूडचं नाही तर त्याकाळातील अनेक मराठी अभिनेत्री आजही चाहत्यांच्या मनात आपली जागा बनवून आहेत. ९०च्या दशकातील अनेक अभिनेत्रीची अद्यापही क्रेझ कायम आहे. या अभिनेत्रींचे सौंदर्य, त्यांचा खास लूक, हटके अंदाज यामुळे आजही या अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे.

त्यापैकी काही अभिनेत्री अजूनही बॉलीवूड किंवा मनोरंजनसृष्टीमधे सक्रिय आहेत. तर काहीनी अभिनयातून संन्यास घेतला असून आता आपल्या सांसारिक सुखाचा आनंद घेत आहेत. करिष्मा कपूर, रविना टंडन, जुही चावला,आयशा जुल्का आणि सोनाली बेंद्रे सारख्या अभिनेत्रींच्या सौंदर्यवर आजही चाहते फिदा आहेत.

मात्र, चांगली लोकप्रियता आणि यश असून देखील काही अभिनेत्री अचानकच गायब झाल्या आहेत. रागेश्वरी लूंबा हे ९० च्या दशकातील एक प्रसिद्ध नाव आहे. या अभिनेत्रीने केवळ अभिनयच नाही तर गायनातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. रागेश्‍वरी लुंबा अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसली आहे.

या गायक-अभिनेत्रीने सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार यांसारख्या स्टार्ससोबतही काम केले आहे. रागेश्वरीला लहानपणापासूनच गाण्याची आणि अभिनयाची आवड होती. तिला मनोरंजनसृष्टीमधे स्वतःची खास ओळख निर्माण करायची होती. आणि त्यात ती बर्‍याच अंशी यशस्वीही झाली. रागेश्‍वरी लुम्बाने अगदी लहान वयातच ग्लॅमर इंडस्ट्रीत प्रवेश केला.

वयाच्या 22 व्या वर्षी या अभिनेत्रीचा पहिला अल्बम ‘दुल्हनिया’ रिलीज झाला होता. या अल्बमला रागेश्वरीने आवाज दिला असून तिने यात अभिनयही केला आहे. या अल्बमने या अभिनेत्रीला रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले. रागेश्‍वरी लुम्बाने 1993 मध्ये आलेल्या आंखे चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

या अभिनेत्रीचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. त्यानंतर ही अभिनेत्री सैफ अली खान आणि अक्षय कुमारच्या ‘मैं खिलाडी तू अनारी’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील रागेश्‍वरीची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. ही अभिनेत्री ‘दिल कितना नादान है’, ‘झिद’, ‘मुंबई से आया मेरा दोस्त’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. रागेश्‍वरी लुंबा ही ९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय पॉप स्टार होती.

त्यावेळी ही अभिनेत्री देश-विदेशात फिरून शोज करत होती. रागेश्वरी तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर होती जेव्हा एका आजाराने तिचे जग उलथून टाकले. एके दिवशी अचानक या अभिनेत्रीला चेहऱ्यावर काही बदल जाणवले, डॉक्टरांना दाखवले आणि कळले की पॅरालिसिसचा झटका आला आहे.

2012 मध्ये रागेश्वरी लूम्बाने लंडनस्थित वकील सुधांशू स्वरूप यांच्याशी लग्न केले. हे जोडपे आजही लंडनमध्ये राहत असून आता दोघेही आई-वडील झाले आहेत. रागेश्वरी अजूनही सोशल मीडियावर चाहत्यांशी जोडलेली आहे आणि ती अनेकदा तिचे लेटेस्ट फोटो शेअर करत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12