सुहाना खानने शेअर केले अतिशय हॉट आणि मादक फोटो न राहून शाहरुख खान करून बसला ‘अशी’ कमेंट, सोशल मीडियावर होतेय चर्चा…

बॉलीवूडमध्ये जेव्हा कधीही कोणत्याही स्टार किडचा उल्लेख होतो तेव्हा त्यात शाहरुखची मुलगी सुहाना खानचे नाव नक्कीच घेतले जाते. आता सुहाना लवकरच मोठ्या पडद्यावरही दिसणार आहे. विशेष म्हणजे बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच सोशल मीडियावर तिचा भला मोठा चाहतावर्ग आहे.
सोशल मीडियावर ती नेहमीच आपले खास फोटोज शेअर करत असते. चाहते देखील तिच्या फोटोवर भरभरून प्रतिसाद देतच असतात. तिने तिच्या चाहत्यांसाठी असा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूपच सिझलिंग दिसत आहे. सुहाना खानने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दुबई इव्हेंटचे तीन फोटो शेअर केले आहेत, मात्र सुहानाच्या फोटोंपेक्षा शाहरुख खानचीच जास्त चर्चा होत आहे.
शाहरुखने आपल्यालाडक्या लेकीच्या फोटोंवर अशा प्रकारे कमेंट केली आहे की ते वाचून लोकांना हसू कंट्रोल नाही झालं. या कमेंटसह शाहरुखने सुहानाचे काही गुपितही उघड केले आहेत. शाहरुख खान त्याच्या क्विक रिस्पॉन्स आणि ह्युमरसाठी खूप प्रसिद्ध आहे. तो अनेकदा आपल्या विनोदाने लोकांची खोडकर पद्धतीने खिल्ली उडवताना दिसतो.
शाहरुख खानने तब्बल ४ वर्षांनंतर ‘पठाण’ चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले असून सध्या तो सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसत आहे. सोमवारी, सुहानाने दुबईच्या पाम जुमेराह येथील लक्झरी हॉटेल अटलांटिस द रॉयलच्या भव्य लॉन्चमधील स्वतःची काही फोटोज शेअर केली. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुहाना खूपच सुंदर दिसत होती.
सुहानाच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. पण शाहरुख खानने आपल्या कमेंटने सर्वांची मनं जिंकली. सुहाना खान नुकतीच तिची आई गौरी खान आणि मैत्रिण शनाया कपूरसोबत एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दुबईला पोहोचली होती. तिथून तिने तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते.
यावर कमेंट करताना शाहरुख खानने लिहिले की, ‘खूप सुंदर बाळा, तू घरी घालत असलेल्या पायजमामधील लूकपेक्षा हा लूक पूर्णपणे वेगळा दिसत आहेस.’ शाहरुखने आपल्या मुलीचे रहस्य उघड केले आणि सांगितले की ती पायजामा घालून घरात फिरते. या फोटोंबद्दल बोलायचे झाले तर सुहाना ब्लॅक कलरच्या हॉल्टर नेक लाँग ड्रेस आणि पिंक कलरच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
सुहाना खानच्या या फोटोंना सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे आणि आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांनी या फोटोंना लाईक केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुहाना खानची मैत्रिण अनन्या पांडेने लिहिले आहे की, ‘प्रेटी गर्ल सुजी’. सुहाना खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ चित्रपटातून डेब्यू करणार आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर देखील त्यांच्यासोबत दिसणार आहेत.