‘सुपरस्टार यश’च्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी ! ‘KGF’मध्ये यशला करणार रिप्लेस, दिसणार दुसरा अभिनेता..

‘सुपरस्टार यश’च्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी ! ‘KGF’मध्ये यशला करणार रिप्लेस, दिसणार दुसरा अभिनेता..

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो सुपरहिट ठरेल की, बॉक्स ऑफिसवर पडेल हे तो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समजते. मात्र, काही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सगळीकडेच चर्चा रंगवतात. या चित्रपटांची लोकप्रियता इतकी जास्त असते की, ते यश संपादन करत नवीन विक्रम करणार याची शाश्वती असते.

KGF च्या दुसऱ्या चॅप्टरच्या बाबतीत देखील असंच काही घडलं. या चित्रपटाचा पहिला भाग जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता तेव्हा सर्वांचे अंदाज फोल ठरवत या चित्रपटाने विक्रमी कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या भागासाठी प्रेक्षकांना चांगलीच प्रतीक्षा करावी लागली.

मात्र असं असलं तरीही, दुसरा भाग सुपरहिटच ठरणार असा विश्वास प्रेक्षकांना होता आणि झालं देखील अगदी तसंच. KGFच्या दुसऱ्या चॅप्टरकडून प्रेक्षकांना खूप जास्त अपेक्षा होत्या. आणि चित्रपटाने त्या सर्व अपेक्षा पूर्ण देखील केल्या. पहिल्या भागापेक्षा या चित्रपटाने अतिशय बक्कळ कमाई करत सर्व रेकॉर्ड मोडीत काढले.

यावरून आपण kgf आणि सुपरस्टार यास याच्या प्रसिद्धीचा अंदाज लावू शकतो. आज kgf इतका मोठा चित्रपट झाला आहे कि त्याच्यासमोर सगळेच चित्रपट फोल ठरतील. अनेक दिगजांनी देखील या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. kgfमुळे सुपरस्टार यशचा खूप मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे.

म्हणून यश शिवाय kgf चित्रपटाचा चाहते अंदाज देखील लावू शकत नाही. पण हो, चाहत्यांचा हिरमोड होणार आहे. कारण kgf यश ला रिप्लेस करणार आहे. कारण kgf चित्रपटाबाबत एक मोठी न्यूज समोर आली आहे.

खरं तर, रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या निर्मात्यांनी असे विधान केले आहे की तुम्हालाही धक्का बसेल. या स्टेटमेंटमध्ये असे म्हटले आहे की केजीएफ फ्रँचायझीमध्ये, चित्रपटाच्या 5 व्या भागानंतर, रॉकी भाईची भूमिका दुसरा नायक साकारण्याची शक्यता आहे. हे करण्यासाठी निर्मात्यांनी जेम्स बाँड मालिकेचे उदाहरणही दिले आहे.

जेम्स बाँड सिरीजमध्ये देखील नायक बदलत राहतात, असे निर्मात्यांनी म्हटले आहे. रॉकी भाईच्या भूमिकेत यश दिसणार नाही हे जाणून सोशल मीडियावर अनेकांना आश्चर्य वाटत आहे. तथापि, हे संपूर्ण विधान KGF च्या पाचव्या भागाबद्दल दिले आहे. त्याच विधानात, निर्मात्यांनी KGF चॅप्टर 3 च्या रिलीजबद्दल देखील खुलासा केला आहे. या सिनेमाचा चॅप्टर 3 2026 मध्ये रिलीज होऊ शकतो असे सांगण्यात आले आहे.

प्रेक्षक KGF चॅप्टर 3 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची छोटीशी माहिती जाणून घेण्यासाठी अनेकांना खूप उत्सुकता आहे. त्याच्या बदलीच्या शक्यतेने यशच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्याचे समर्थन करणार्‍या अनेकांनी यश केवळ केजीएफसाठी बनवले आहे असे सांगितले तर काही लोक म्हणाले की यशची जागा दुसरा कोणताही अभिनेता घेऊ शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12