‘सायरा’ बानोने सांगितली ‘दिलीप’ साहेबांसोबतची आपली प्रे’म क’हानी, म्हणाली ते मला नेहमीच लाल गुलाब देऊन माझ्याकडून …

‘सायरा’ बानोने सांगितली ‘दिलीप’ साहेबांसोबतची आपली प्रे’म क’हानी, म्हणाली ते मला नेहमीच लाल गुलाब देऊन माझ्याकडून …

बॉलिवूडची त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानो यांनी दिलीपकुमार यांच्यासोबतच्या त्यांच्यामधिल प्रेमळ नात्याची कहाणी सांगितली आहे. त्या म्हणाल्या की हल्लीचे तरुण जोडपे व्हॅलेंटाईन डे साजरा करतात आणि त्यांचा हा कार्यक्रम संपूर्ण एक आठवडाभर चालू असतो. सायरा बानोच्या मते आपल्या देधात ही संकल्पना अलीकडच्या पंधरा-वीस वर्षांपूर्वी चालू झाली आहे.

पन तिच्या मते ती लंडनमध्येच लहानशी मोठी झाली असल्याने तिला या संस्कृती विषयी सर्व काहि अगोदरच माहीत होते. ती म्हणाली की लं’डनमध्ये असतानाच मी व्हॅलेंटाईन डे बघत होते. नंतर जेव्हा दिलीप साहेब सायरा बानोच्या आयुष्यात आले तेव्हा लग्नानंतर देखील त्यांनी कधीच व्हॅलेंटाईन डे साजरा केला नाही.

परंतु प्रत्येक दिवस त्यांनी प्रेमाचा उत्सव म्हणून साजरा केला आहे. दिलीप साहेबांसोबत दररोजचे जीवन ईदसारखे असयाचे. दररोज ते काहीतरी खास करत असायचे. आणि सायरा बानो हिला देखील ते बरे वाटत असायचे.

दिलीप साहब गुलाबाचे फुल नियमित देऊन स्वतःचे प्रे’म व्यक्त करायचे :- दिलीप साहब रोजच आपल्या प्रेमाचा उत्सव साजरा करण्यासाठी लाल गुलाबाचे फुल देऊन स्वतःचे प्रे’म व्यक्त करत असायचे. आपले प्रेम व्यक्त करीत आहेत. त्या काळात लाल गुलाबाला प्रेमात खूप मोठे असे विशेष स्थान होते.

स्वतःचे प्रेम सिद्ध करून दाखवण्यासाठी ते सायरबानोला लाल गुलाबाची फुले नियमितच द्यायचे. सायरा बानो पुढे म्हणाली की माझ्या आयुष्यातील खास प्रसंगी दिलीप साहब मला आनंदी ठेण्यासाठी माझ्यासाठी सर्वात खास आणि मोठा गुलाब पुष्पगुच्छ बनवून भेट म्हणून देत असायचे.

दिलीप साहब गुलाबांच्या माध्यमातून प्रे’म व्यक्त करायचा. त्याला हे ही माहित होतं की मला लाल गुलाब खूप आवडतो आणि म्हणून मला प्रेमाचे जाळ्यात अडकवण्यासाठी त्यांनी गुलाबाचे फुलांचा चांगलाच फायदा करून घेतला व माझे मन जिंकले.

पत्नी बनण्याची झाली इच्छा :- सायरा बानो म्हणाली की मी शाळेत असल्यापासूनच मला दिलीप कुमार यांची पत्नी बनण्याची इच्छा होती. मी जेव्हा तरुण होते आणि लंडनमध्ये शिक्षण घेत होते तेव्हापासून माझ्या मनात एक खंत होती की मी एक दिवस तरी श्रीमती दिलीपकुमार होण्याच स्वप्न पूर्ण करेल.

माझ्या आईने मला माझे स्वप्न पूर्ण करण्यास केली होती मदत :- सायरा बानोने हा देखील खुलासा केला की, म्हणाली माझ्या आ’ईने मला सांगितले होते की दिलीप कुमार यांची पत्नी होण्यासाठी स्वतःचे छंद देखील दिलीप साहेबांप्रमाणे विकसित करायला हवेत.

अशा प्रजरे मी लंडनमध्ये असताना माझी आई कवितेच्या माध्यमातून हे सर्व मला शिकवत होती. जेव्हा मी लंडन सोडून हिंदुस्थानात आले तेव्हा मला कळले की दिलीपसाहेबांना सितार फार आवडतात. मग मला देखील असे वाटू लागले की आपण देखील सितार शिकणे गरजेचे आहे.

दिलीप साहब उर्दूमध्ये माहिर असल्याने मीही उर्दू शिकण्यास सुरवात केली. माझ्या कारकीर्दीला सुरवात झाली तेव्हा आईने माझ्यासाठी एक घर बांधण्याचा विचार केला आणि आईने माझ्यासाठी माझे घर दिलीप साहेब यांच्या घरासमोर बांधले होते. त्यावेळी मी मेरा प्यार मोहब्बत चे शूटिंग मध्ये व्यस्त होते.

23 ऑगस्ट 1966 रोजी माझा वाढदिवस असल्याने आईने त्यादिवशी घराची हाऊस वार्मिंग पार्टी आयोजित केली होती. फिल्मिस्टन स्टुडिओच्या शूटिंगनंतर जेव्हा मी घरी आले तेव्हा मला असे दिसले की माझ्या घरात पार्टी चालू आहे आणि माझ्या ओळखीचे सर्व सहकलाकार व दिग्दर्शक यांची हजेरी मला पार्टीत दिसून आली.

त्यावेळी मला अचानक एक गोष्ट दिसली जी म्हणजे पार्टीत दिलीप साहेबांनी पार्टीत स्वतः हजेरी लावली होती. माझ्या आईने त्यांना पार्टीसाठी आमंत्रित केल्याचे समजले होते. यावेळी दिलीप साहेब मद्रास विमानाने सूट-बूट परिधान करून हैंडसम बनून पार्टीत आले होते. माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी भेट होती.

त्या रात्री एका निरीक्षणात झाले हे सिद्ध :- सायरा बानो म्हणाली की प्रपोज बाबतीतही त्यांचा एक रंजक किस्सा मला आजही आठवणीत आहे. दिलीप साहेब त्यावेळी माझ्याबरोबर काम करत नव्हते कारण ते विचार करयाचे की ते माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे होते आणि मी त्यांच्या जोडीला खूप लहान दिसेल.

सायराबानोचे कुटुंब आणि दिलीप साहेब यांच्यात भरपूर वेळी भेटीगाठी होत असायच्या. आणि दिलीप साहेब यांनी सायरा बानोला स्वतःच्या डोळ्याने लहानसे मोठे होताने बघितले होते. आणि म्हणून त्यांनी असा विचार केला की नायक म्हणून मी हिच्यासोबत कसे काम करेन.

राम आणि श्यामसाठी नायिकाची ऑफर मला आली होती. पण या कारणामुळे दिलीप साहेब यांनीही ती भूमिका करण्यास नकार दिला होता. सायरा बानो पुढे असेही बोलली की पार्टीत मी खूप तयारी केली होती. त्यावेळी मी साडी नेसली होती व म्हणून मी साडीत माझ्या वयापेक्षा मी खूप मोठी दिसत होती.

साडीत मला बघून दिलीप साहेब यांनी मला जवळ घेतले व माझ्या केल्यावर त्यांनी माझ्या हातात हाथ दिला आणि माझ्या सौंदर्याची स्तुती केली. त्या रात्री त्यांनी प्रथमच माझ्यावर नजर टाकली होती. मला निरखून बघितले होते व दुसर्‍या दिवशी त्यांचा कॉल देखील आला की काल रात्रीचे जेवण खूप चांगले होते आणि त्याबद्दल आभार. त्यानंतर त्यांनी मला भेटायला सुरुवात केली.

सुमारे आठ दिवस चालू होता रोमान्स :- दिलीप साहेब मद्रासहून मला भेटण्यासाठी येत असत आणि रात्रीच्या जेवणा नंतर ते शुटिंग साठी जात असत. त्यानंतर हा रोमांस आठ दिवस चालला. आठ दिवसांनी त्यांनी मला प्रपोज केले होते. त्यानंतर त्यांनी माझ्या आईकडे आणि आज्जीकडे जाऊन माझ्यासाठी मागणी घातली. आणि कोणताही वेळ वाया जाऊ न देता आम्हीही होकार कळविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12