साडी घालून जिम करणारी महिला सोशल मीडियावर घालतेय धुमाकूळ, तिचे कर्तब पाहून तोंडात बोटं घालाल.. पहा video

साडी घालून जिम करणारी महिला सोशल मीडियावर घालतेय धुमाकूळ,  तिचे कर्तब पाहून तोंडात बोटं घालाल..  पहा video

इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ अपलोड होत असतात आणि ते व्हायरल देखील होतात. खास करून जेव्हा हे व्हिडियोज जिम मधील असतात. जिम मधील व्हिडियोज तर नक्कीच आगीच्या वेगाने सगळीकडे व्हायरल होतात.

काहीच दिवसापूर्वी जिम मधील दोन बायकांच्या भांडणाचा व्हिडियो वायरल झाला होता. वायरल क्लिपमध्ये दोन महिला जिममध्ये स्मिथ मशीनच्या वापरावरून भांडत असल्याचं दिसत होत. काही लोकांसाठी, वर्कआउट करणे ही एक दैनंदिन दिनचर्या आहे जी अगदी तन्मयतेने पाळली जाते.

तर इतरांसाठी, हे असे काहीतरी आहे जे ते आवश्यकतेनुसार करतात. जिम मध्ये जाणे, व्यायाम करणे, आरोग्याची काळजी घेणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. बरेच लोक या सर्व पद्धतींचा अवलंब करतात. अनेक महिला देखील अलीकडच्या काळात आवडीने जिम करत असल्याचं आपण पाहिलं आहे.

पण अनेक महिलांसाठी त्यांचे कपडे यामध्ये अडचण म्हणून उभे राहतात. जिममध्ये महिलांचा पेहराव हा मोठा मुद्दा आहे. म्हणून तर इच्छा असूनही अनेक महिला जीमसारख्या ठिकाणी आरामात जाऊ शकत नाही. कारण देशी कपडे तिथे चालत नाहीत. पण एका महिलेने हा समज मोडला आणि जीममध्ये साडी आणि शूज घालून वेगवेगळे वर्कआउट करून लोकांचे लक्ष वेधून घेतले.

सोशल मीडियामध्ये रीना सिंग नावाची महिला लोकांचे लक्ष वेधून घेत आहे, जी साडी घालून जिममध्ये जाऊन व्यायाम करते. तिची ही देसी शैली लोकांना खूप आकर्षित करते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे साडी नेसूनही त्या महिलेचा तोल कायम राहतो. हीच बाब अनेक लोकांसाठी अतिशय आश्चर्यकारक आहे.

या महिलेचे इन्स्टाग्राम आणि फेसबुक दोन्हीवर बरेच फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर सगळ्यांनाच तिची शैली खूप आवडते. रीना सिंग साडीत व्यायाम करून लोकांना आश्चर्ययाचा सुखद धक्का देत आहे. ती केवळ वेटलिफ्टिंगच करत नाही तर साडीमध्ये रनिंग आणि पुल अप्सही खूप छान करते.

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या काळात तिचा आत्मविश्वास कुठेही डगमगत नाही. जे पाहून लोकांचा हेवा वाटात आहे. जिमला जाण्यासाठी किंवा वर्कआउट करताना कपडे कधीही अडथळा नसावेत हे दाखवणे हाच तिचा उद्देश आहे. रीना सिंगची ही स्टाइल खूप लोकप्रिय ठरत आहे. काहींना त्यांची देसी शैली खूप आवडते.

तर काहीजण याला दिखावा आणि लाइक्ससाठी नौटंकी देखील म्हणत आहेत. रीना सिंग एक फिटनेस कोच आणि एरोबिक्स ट्रेनर देखील आहे. रीना अनेकदा साडीत केवळ तिच्या वर्कआउटदरम्यानच नाही तर ट्रेनिंगदरम्यानही दिसते. तिचे सोशल मीडिया अकाऊंट अशा व्हिडिओंनी भरलेले आहे, ज्यामध्ये ती केवळ जिमिंग आणि व्यायामच नाही तर साडी नेसून विविध स्टंट देखील करताना दिसते.

तिला साडी नेसून व्यायाम करायचा आहे आणि साडी नेसणारी स्त्री ही कोणापेक्षा कमी नाही हा संदेश द्यायचा आहे. यामुळेच रिनाच्या चाहत्यांना ती आवडते. एका यूजरने लिहिले – ‘भारताची महिला सर्वांवर भारी आहे’. बरेच लोक तिला आदर्श आणि इतर महिलांसाठी एक उदाहरण म्हणतात. तिच्या व्हिडिओला 1 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12