साऊथ इंडस्ट्रीबाबत ‘या’ मराठी अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा! म्हणाली, ‘या अभिनेत्याने मला एकट्यात बोलवून आधी माझे कपडे…’

ग्लॅमरच्या दुनियेतील सर्वात कटू सत्य म्हणजे अभिनेत्रींचा कास्टिंग काउचचा अनुभव. आज प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या शिखरावर बसलेल्या अनेक बॉलीवूड अभिनेत्रींना या भयानक गोष्टीला सामोरे जावे लागले आहे. चित्रपटात काम मिळवण्यासाठी अभिनेत्रींना अशा प्रकारच्या ऑफर देणे यामध्ये अनेक निर्माते आणि दिग्दर्शक यांना काहीच गैर वाटत नाही.
अनेक अभिनेत्री आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अशा ऑफर्स स्वीकारतात. परंतु त्यामुळे ज्या अभिनेत्री आपले कौशल्य आणि प्रतिभेच्या बळावरती यश मिळवण्याची इच्छा ठेवतात त्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागतो. या अभिनेत्रींचे समोरील आलेले अनुभव खूपच भयंकर आहेत.
आजवर अनेक बॉलिवूड अभिनेत्रीने आपल्या कास्टिंग काऊच बद्दल आलेल्या कटू अनुभवाबद्दल सांगितले आहे. सुरवीन चावला, कंगना रणौत, राधिका आपटे, चित्रांगदा सिंग यांनीही कास्टिंग काउच प्रकरणी आपला अनुभव शेअर केले आहे. आणि आता अजून एका अभिनेत्रीने याबद्दल आपला अनुभव सांगितला आहे.
बॉलीवूडची खल्लास गर्ल म्हणजेच ईशा कोप्पीकरने आपल्या अनुभवाबद्दल विधान केलं आहे. आजवर अनेकवेळा या अभिनेत्रीने बॉलीवूड आणि साऊथ दोन्ही सिनेसृष्टीच वास्तव उघड केलं आहे. यावेळी पुन्हा एकदा इंडस्ट्रीमध्ये तिला आलेल्या कटू अनुभवाबद्दल तिने मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री ईशा कोप्पीकरने आपली खास ओळख निर्माण केली आहे.
केवळ हिंदीच नाही तर साऊथ आणि मराठी मनोरंजनसृष्टीमधे देखील काम केलं आहे. एका बॉलीवूड अभिनेत्याने एकदा तिला एकट्यात कसं तिला भेटायला बोलवलं, आणि त्यानंतर काय झालं याबद्दल ईशाने अतिशय धक्कादायक खुलासा केला आहे. लव्ह यु लोकतंत्र या चित्रपटात ईशा कोप्पीकर शेवटची दिसली होती.
धाहनम या हिंदी आणि तमिळ भाषेतील क्राईम थ्रिलर वेब सीरिजमध्ये ईशा दिसली होती. 1998 मध्ये एक था दिल एक थी धडकन या चित्रपटातून ईशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. फिजा, प्यार इश्क और मोहब्बत, कंपनी, कांटे, पिंजर आणि दिल का रिश्ता यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. तिने 2009 मध्ये हॉटेलियर टिमी नारंगशी लग्न केलं.
ईशाला रियाना नावाची सात वर्षांची मुलगी आहे. एका मुलाखतीत ईशा म्हणाली की, ”2000 साली एका प्रसिद्ध निर्मात्याने मला फोन केला होता. तुला अभिनेत्याच्या गुड बुकमध्ये असणं आवश्यक आहे, असं त्यांनी त्यावेळी मला सांगितलं. याचा अर्थ मला माहित नव्हता. म्हणून, मी अभिनेत्याला कॉल केला, ज्याने मला त्याला एकटं भेटायला सांगितलं.
स्टाफशिवाय खाजगी मिटींगसाठी त्याने मला बोलावलं होतं.’ पुढे अभिनेत्रीने सांगितलं की, ‘त्यावेळी त्याच्यावर फसवणूकीचा आरोप केला गेला होता. त्याने मलाला खाजगी मिटींगसाठी बोलावलं. त्यानंतर मी निर्मात्याला फोन केला आणि सांगितले की मी माझ्या टॅलेंट आणि लूकमुळे ईथपर्यंत आले आहे. जर मला चांगलं काम मिळालं तर ते खूप चांगलं होईल. मात्र त्यानंतर मला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं.’ खरं तर इंडस्ट्रीच भयानक वास्तव समोर आलेल्या नंतर ईशा खूप जास्त दुःखी झाली होती. त्यानंतर तिचा भ्रमनिरास झाला आणि ती अधिक सावध झाली.